प्रश्नः
स्वर्ग वास्तविकतेमध्ये आहे काय?
उत्तरः
स्वर्ग ही निश्चितच अस्तित्वात असलेली जागा आहे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की स्वर्ग हे देवाचे सिंहासन आहे (यशया 66:1; प्रेषित 7:48-49; मत्तय 5:34-35). येशूच्या पुनरुत्थानानंतर आणि तो त्याच्या शिष्यांना पृथ्वीवर दिसल्यानंतर, “त्याला वर स्वर्गात घेतले गेले आणि तो देवाच्या उजवीकडे बसला” (मार्क 16:19; प्रेषित 7:55-56). “खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्यांत ख्रिस्त गेला नाही तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला. (इब्री 9:24). येशू आपल्या वतीने प्रवेश करून आपल्या पुढे फक्त आत गेला नाही, तर तो जिवंत आहे आणि त्याला स्वर्गामध्ये सेवा आहे, तो प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपामध्ये आपला प्रमुख याजक म्हणून सेवा करतो आहे (इब्री 6:19-20; 8:1-2).
येशूने स्वतः आपल्याला सांगितले आहे की देवाच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत आणि तो आपल्यासाठी जागा तयार करावयास जात आहे. आपल्याला त्याच्या शब्दाची खात्री आहे की एक दिवस तो जेथे स्वर्गामध्ये आहे तेथे घेऊन जाण्यासाठी पृथ्वीवर परत येईल (योहान 14:1-4). स्वर्गामधील सार्वकालिक घराचा आपला विश्वास हा येशूच्या स्पष्ट वचनावर आधारित आहे. स्वर्ग ही निश्चितच वास्तविक जागा आहे. स्वर्ग खरोखर अस्तित्वात आहे.
जेंव्हा लोक स्वर्गाच्या अस्तित्वाला नाकारतात, तेंव्हा ते फक्त देवाच्या लिहिलेल्या वचनांना नाकारत नाहीत तर ते त्यांच्या हृदयाच्या आतील उत्कट इच्छेला सुद्धा नाकारतात. पौलाने या समस्येला करिंथकरांस लिहिलेल्या पत्रामध्ये संबोधित केले, आणि त्यांचे मन हरवू नये म्हणून त्यांना स्वर्गाच्या आशेला बिलगून राहण्यास प्रोत्साहन दिले आहे. जरी पृथ्वीवरील स्थितीमध्ये आम्ही “कण्हतो आणि उसासे टाकतो” तरी आपल्याला स्वर्गाची आशा आहे आणि तिथे जाण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक आहोत (2 करिंथ 5:1-4). पौलाने करिंथकरांना त्यांच्या स्वर्गातील सार्वकालिक घराकडे पाहण्याचे आवाहन केले, एक दृष्टीकोन जो त्यांना या जीवनातील अडचणी आणि निराशा यांना सहन करण्यास सक्षम करतो. “कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते; आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत” (2 करिंथ 4:17-18).
जसे देवाने तो आहे हे ज्ञान मनुष्याच्या हृदयामध्ये ठेवले (रोम 1:19-20), तसे आपल्याला स्वर्गाची इच्छा करण्यासाठी “तयार केले” आहे. असंख्य पुस्तकांचा, गाण्यांचा, आणि कलाकार्यांचा हा मुख्य विषय आहे. दुर्दैवाने, आपल्या पापाने स्वर्गाचा मार्ग अडवला. जेणेकरून स्वर्ग हे पवित्र आणि परिपूर्ण देवाचे निवासस्थान आहे, पापाला तेथे जागा नाही, आणि ना त्याला सहन केले जाईल. सुदैवाने, देवाने स्वर्गाचे दार उघडण्यासाठी लागणाऱ्या चावीची तरतूद आपल्यासाठी केलेली आहे—येशू ख्रिस्त (योहान 14:6). जे सर्व त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि पापाच्या क्षमेसाठी त्याला शोधतात त्यांना त्यांच्यासाठी स्वर्गाचे दार पूर्णपणे उघडलेले असे सापडते. कदाचित आपल्या भविष्यातील सार्वकालिक घराचे तेज आपल्या सर्वांना देवाची सेवा विश्वासाने आणि संपूर्ण हृदयाने करण्यास उत्तेजन देत असेल. “म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे; आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे; म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातारीने जवळ येऊ” (इब्री 10:19-22).
English
स्वर्ग वास्तविकतेमध्ये आहे काय?