प्रश्नः
मी माझ्या ख्रिस्ती जीवनात आनंदाचा अनुभव कसा करू शकतो?
उत्तरः
आनंद हा असा आहे की ज्याची इच्छा आपण सर्वजण करत असतो परंतु बऱ्याचदा असे दिसून येते की तो धरून ठेवणे अवघड होते. आनंदाचा अनुभव घेणे हा प्रत्येक ख्रिस्ती लोकांच्या जीवनाचा भाग असला पाहिजे. आनंद हे पवित्र आत्म्याचे फळ आहे, देवाचे कार्य केल्याने त्याची आपल्यामध्ये निर्मिती होते, आणि आपल्याविषयी असलेल्या देवाच्या इच्छेचा हा एक भाग आहे.
आपण हे जाणतो की देवामध्ये अतिशय परिपक्व असलेल्या लोकांना सुद्धा आनंदरहित जीवनाच्या काळाचा अनुभव येतो. उदाहरणार्थ, ईयोबाने अशी इच्छा केली की तो कधी जन्मला नसता तर बरे झाले असते (ईयोब 3:11). दावीदाने प्रार्थना केली की त्याला अशा ठिकाणी घेऊन जावे जेथे त्याला वस्तुस्थितीचा सामना करावा लागणार नाही (स्तोत्रसंहिता 55:6-8). एलिया, ज्याने स्वर्गातून अग्नी खाली उतरवून बाल च्या 450 संदेष्ट्यांना हरवल्यानंतर सुद्धा (1 राजे 18:16-46) रानात पळून गेला आणि देवाकडे विंनती केली की त्याने त्याचा प्राण घ्यावा (1 राजे 19:3-5). जर या लोकांनी संघर्ष केला, तर मग आपण आपल्या ख्रिस्ती जीवनात निरंतर आनंदाचा अनुभव कसा घेऊ शकतो?
पहिली गोष्ट जी लक्षात येणे गरजेचे आहे ती म्हणजे आनंद हे देवाचे दान आहे. ग्रीक भाषेमध्ये आनंद या शब्दाचा मूळ शब्द आहे chara अर्थात चारा, जो ग्रीक शब्द charis चारीस ज्याचा अर्थ “कृपा” असा असून याच्याशी तो अधिक जवळून संबंधित आहे. आनंद हे देवाचे दान आणि त्याचबरोबर त्या दानाला आपला प्रतिसाद हे दोन्ही आहे. जेंव्हा आपल्याला देवाच्या कृपेची जाणीव असते आणि आपण त्याच्या अनुग्रहाला पसंत करतो तेंव्हा आनंद येतो.
हे लक्षात ठेवून, हे स्पष्ट आहे की, आनंदाचा अनुभव घेण्याचा एक मार्ग म्हणजे देवावर लक्ष केंद्रित करणे होय. आपल्या अडचणींमध्ये किंवा ज्या गोष्टी आपले समाधान चोरतात त्यांमध्ये राहण्यापेक्षा, आपण देवावर अवलंबून राहू शकतो. यामध्ये असे म्हणायचे नाही की आपण आपल्या असंतोषाला किंवा नकारात्मक भावनांना सामोरे जाऊ नये. अनेक स्तोत्र लिहिणाऱ्या लेखकांचे अनुसरण करून, आपण आपले हृदय देवासमोर मोकळे करू शकतो. आपल्याला त्रास देणाऱ्या सर्व गोष्टी आपण त्याला स्पष्टपणे सांगू शकतो. पण जेंव्हा आपण त्या गोष्टी त्याच्या चरणामध्ये आणतो, तेंव्हा तो कोण आहे याची आठवण ठेवा, आणि त्याच्यामध्ये आनंदी राहा. स्तोत्रसंहिता 3, 13, 18, 43, आणि 103 ही स्तोत्रे उत्तम उदाहरणे आहेत.
जरी पौलाने फिलिप्पैकरांस पत्र तुरुंगातून लिहिले असले, तरी या पुस्तकात आनंदाबद्दल खूप काही सांगितले आहे. फिलिप्पैकरांस पत्र 4:4-8 आपल्याला ख्रिस्ती जीवनात आनंद कसा अनुभवायचा याबद्दल काही मार्गदर्शक तत्वे देते: “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा... प्रभू समीप आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. बंधुंनो शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्यांचे मनन करा”. येथे आपण देवाची स्तुती प्रशंसा करण्याच्या, तो समीप आहे हे सतत, आठवणीत ठेवण्याच्या, आपल्या चिंताविषयी प्रार्थना करण्याच्या आणि आपले मन देवाच्या चांगल्या गोष्टींकडे केंद्रित करण्याच्या महत्वाबद्दल बघतो. जेंव्हा आपण जाणीवपूर्वक देवाची स्तुती करतो तेंव्हा आपण आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. दावीद लिहितो की देवाच्या वचनांचे मनन हृदयाला आनंदित करते (स्तोत्रसंहिता 19:8). आपण प्रार्थनेद्वारे देवाशी संवाद साधून आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. आणि आपण आपले लक्ष कठीण परिस्थिती किंवा असंतोष यावर केंद्रित करण्यापेक्षा देवाच्या गोष्टींवर केंद्रित करून आनंदाचा अनुभव घेऊ शकतो.
येशूने सुद्धा आनंदाबद्दल काही सूचना दिल्या आहेत. योहान 15 मध्ये तो त्याच्यामध्ये राहण्याबद्दल आणि त्याच्या आज्ञा पाळण्याबद्दल बोलला आहे. तो बोलला, “जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत” (योहान 15:9-11). आनंदामध्ये राहण्याची एक चावी म्हणजे देवाच्या आज्ञेत राहणे होय.
ख्रिस्ती जीवनात आनंद अनुभवण्याचा अजून एक मार्ग म्हणजे त्याचा समुदाय. देवाने एलियाला विश्रांती दिली आणि मग त्याच्याकडे त्याच्या मदतीसाठी एक मनुष्य पाठवून दिला ज्याचे नाव अलिशा होते (1 राजे 19:19-21). आपल्याला सुद्धा, ज्यांना आपण आपली दुःखे आणि वेदना सांगू शकतो अशा मित्रांची गरज असते (उपदेशक 4:9-12). इब्री लोकांस पत्र 10:19-25 सांगते, “बंधुजनहो.... आपण प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकाच्या चालींप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. देवाच्या कृपेमुळे, आपण हे जाणतो की आपण प्रार्थनेमध्ये देवाच्या जवळ विश्वासाने जाऊ शकतो (इब्री लोकांस पत्र 10:19). आपण जाणतो की आपण पापापासून शुद्ध झालो आहोत (इब्री लोकांस पत्र 10:22). आणि आपण एका नवीन समुदायात, विश्वासणाऱ्यांच्या कुटुंबात सामील झालो. आपल्या सहकारी विश्वासूबरोबर, आपण देवाच्या चरित्रगुणांवर विश्वास ठेवून आपल्या विश्वासाला दृढ धरून ठेवतो. आपण एक दुसऱ्याला उत्तेजन सुद्धा देतो. ख्रिस्ती लोक ह्या जगाचे नाहीत (योहान 17:14-16; फिलिप्पैकरांस पत्र 3:20). शेवटी आपण आपल्या मूळ रचनेमध्ये पुनर्संचयीत झालेले देवाबरोबर असावे अशी आपली इच्छा आहे. आयुष्य हे एकाकी आणि निरुत्साही असू शकते. बाकीचे आपल्याला सत्याची आठवण करून देण्यासाठी, आपल्याबरोबर आपले ओझे वाहण्यासाठी, आणि पुढे सुरु ठेवण्यास ताकत देण्यासाठी मदत करतात (गलतीकरांस पत्र 6:10; कलस्सैकरांस पत्र 3:12-14).
आनंद हा ख्रिस्ती जीवनाचे प्रमाण-चिन्ह आहे. हे पवित्र आत्म्याचे फळ आणि देवाचे दान आहे. जेंव्हा आपण देव कोण आहे याच्या सत्यावर लक्ष केंद्रित करतो, प्रार्थनेद्वारे त्याच्याशी संवाद साधतो, आणि त्याने दिलेल्या विश्वासणाऱ्यांच्या समुदायावर अवलंबून राहतो तेंव्हा ही भेट उत्तमप्रकारे प्राप्त होते.
English
मी माझ्या ख्रिस्ती जीवनात आनंदाचा अनुभव कसा करू शकतो?