प्रश्नः
मी प्रेमात आहे हे मी कसे जाणू शकतो?
उत्तरः
प्रेम ही अत्यंत प्रबळ भावना आहे. ती आमच्या बहुतेक जीवनांस प्रेरणा देते. आम्ही ह्या भावनेच्या आधारे अनेक महत्वाचे निर्णय घेतो, आणि लग्नसुद्धा करतो कारण आम्हाला वाटते की जे आमचा द्वेष करतात त्यांच्यावर आम्ही प्रीती केली पाहिजे, अगदी तशीच जशी ख्रिस्ताने प्रीतीस पात्र नसणार्यांवर प्रीती केली (लूक 6:35). "प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीति हेवा करीत नाही; प्रीति बढाई मारीत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानिते; ती सर्व काही सहन करिते, सर्व काही खरे मानन्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरिते सर्वासंबंधाने धीर धरिते" (करिंथकरांस 1 ले पत्र 13:4-7).
एखाद्याच्या "प्रेमात पडणे" अत्यंत सोपे असू शकते, पण आम्हाला खरी प्रीती अनुभव होत आहे किंवा नाही हे ठरविण्यापूर्वी काही प्रश्न विचारावयाचे असतात. पहिले म्हणजे, हा व्यक्ती ख्रिस्ती आहे काय, अर्थात त्याने किंवा तिने आपले जीवन ख्रिस्तास दिले आहे काय? ती/तो तारणासाठी केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवितो किंवा ठेवते काय? तसेच, जर आपण एका व्यक्तीस आपले अंतःकरण व भावना देण्याचा विचार करीत असाल, तर आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आपण त्या व्यक्तीस इतर सर्व लोकांपेक्षा मोठे स्थान द्यावयास आणि आपल्या नात्यास केवळ देवानंतरचे स्थान द्यावयास तयार आहात काय? बायबल आम्हास सांगते की जेव्हा दोघा जणांचा विवाह होतो, तेव्हा ते एकदेह होतात (उत्पत्ति 2:24; मत्तय 19:5).
विचार करण्यासारखी दुसरी गोष्ट ही आहे की हा प्रिय व्यक्ती, जोडीदार बनावयास उत्तम उमेदवार आहे किंवा नाही. त्याने/तिने आधीच त्याच्या/तिच्या जीवनात प्रथम आणि महत्वाचे स्थान दिलेले आहे काय? तो/ती त्याचा/तिचा वेळ व ऊर्जा विवाहासाठी जीवनभर टिकणारे नाते स्थापन करण्यास देईल काय? आम्ही एखाद्या व्यक्तीच्या खरोखर प्रेमात आहोत किंवा नाही हे ठरविणारे कोणतेही मापनयंत्र नाही, पण आम्ही आमच्या भावनांचे अनुसरण करीत आहोत अथवा आमच्या जीवनांसाठी देवाचे इच्छेचे पालन करीत आहोत हे ओळखणे महत्वाचे आहे. खरे प्रेम हा निर्णय आहे, फक्त भावना नाही. बायबलनुसार खरे प्रेम एखाद्या व्यक्तीस सर्व वेळ प्रेम करणे होय, फक्त त्या वेळी नाही जेव्हा आपणास "प्रेमात असल्याचे" वाटते.
English
मी प्रेमात आहे हे मी कसे जाणू शकतो?