settings icon
share icon
प्रश्नः

देवाची इच्छा माझ्या जीवनात काय आहे हे मी कसे जाणून घेऊ शकतो ?

उत्तरः


देवाची इच्छा जाणून घेणे महत्वाचे आहे. येशुने म्हटले जे खरे शिष्य आहेत ते माझ्या पित्याची इच्छा जाणून घेतात :“जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वर्ततो तोच माझा भाऊ बहिण व आई“( मार्क 3:35).दोन मुलांच्या दृष्टांत मध्ये,येशुने महायाजकांना व वडीलधाऱ्याना पित्याची इच्छा ,पूर्ण न केल्या बदल धमकावले “त्यानी पश्चताप व विश्वास न धरल्यामुळे“ (मतय 21:32) सर्वात महत्वाची,गोष्ट पापा बद्दल पश्चताप करणे व ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ही देवाची इच्छा आहे.जर आम्ही सुरुवातीच्या पायरीचे अवंलबन केले नसेल तर आजूनही आम्ही देवाच्या इच्छेला समजू शकलो नाही.

पहिल्यादां ख्रिस्ताला विश्वासाने स्विकारा, त्यामुळे आम्ही देवाचे लेकरे बनणार आहोत(योहान1:12),देवाची इच्छा आम्हाला त्यांच्या मार्गाने चालण्यास मदत करेल(स्त्रोत 143:10). देव त्यांची इच्छा आमच्या पासून लपवून ठेवत नाही; ते तो आम्हाला प्रगट करातो.म्हणून त्यांच्या वचनाद्वारे पुष्कळ मार्गदशन पहिल्या पासून दिले आहे “सर्व स्थितीत उपकारस्मरण करा,तुम्हा विषयी ख्रिस्त येशुमध्ये देवाची इच्छा हीच आहे“(Iथेस्सलनी 3:18)आम्ही सर्वानी चागंले काम करावे(Iपेत्र 2:15)आणि “देवाची इच्छा ही आहे की,तुमचे पवित्रीकरण व्हावे.तुम्ही जारकर्मापासून स्वत: स दुर राखावे”( Iथेस्स लनी 4:3)

देवाची इच्छा अगम्य आणि सिध्द करता येण्य जोगी आहे. रोम 12:2 मध्ये असे म्हटले आहे,“या युगा बरोबर समरुप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वत:चे रुपांतर होऊ दया यासाठी की, देवाची उत्तम ग्रहणीय–व परिपूर्ण इच्छा काय आहे.समजून घ्यावे“ या उत्तऱ्या मध्ये महत्वाचा क्रम दिला आहे: देवाची लेकरे या युगाबरोबर एकरुप होण्यास नकार देतात त्या एवजी ते स्व:ला आत्म्याद्वारे बदलून टाकतो. त्यामुळे त्यांचे मन देवाच्या वचना नूसार नविन होऊन जाते. तेव्हा ते देवाच्या परिपूर्ण इच्छेला समजू शकतात.

जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेचा शोध करीतो,त्या विषयी आम्हाला पूर्ण खात्री व्हायला पाहिजे ज्याच्या विषयी पवित्र शास्त्र आम्हाला कोणती गोष्ट करण्याकरीता मना करित आहे. आम्हाला माहित आहे: की, त्याची इच्छा आमच्यासाठी नाही कि आम्ही बँकेत चोरी करणारे व्हावे -त्यासाठी आम्हाला प्रार्थना करण्याची गरज नाही.त्याप्रमाणे आम्हाला ही खात्री होणे आवश्यक आहे की,ज्या गोष्टीवर आम्ही लक्ष लावत आहोत .त्याबदल देवाचे गौरव इतराची आध्यात्मिक उन्नतीसाठी मदत करीत आहोत

देवाची इच्छा जाणून घेणे पुष्कळदा कठीण होते.कारण त्यामध्ये धीर धरण्याची आवश्यकता आसते. देवाची इच्छा एकाच वेळी जाणून घ्यावी हे आम्हाला स्वाभाविक रित्या वाटते पण तसे होत नाही. तर तो त्याची इच्छा आमच्या पावला पावलावर प्रगट करतो- तो प्रत्येक पाऊलावर प्रगट करितो.यासाठी की, आम्ही विश्वासने चालावे – आणि तो असे होऊ देतो की,आम्ही त्याजवर विश्वास ठेवावा.सर्वात महत्वाची ही आहे की,आम्ही भविष्यातील गोष्टीविषयी त्याच्या मार्गदर्शनाची वाट पाहवी व चागल्या कामात व्यस्त होतो जे आम्हाला माहित आहेत ते करण्यात(याकोब4:17).

पुष्कळदा आम्हला वाटते देवाने आम्हाला काही सुचना करावी - कोठे काम करावे,कोठे रहावे, कोणासंगती लग्न करावे, कोणती गाडी विकत घ्यावी, इत्यादी. परंतू देवाने आम्हाला निवड करण्यासाठी मान्यता दिली,जर आम्ही त्याच्या आधिन असलो तर तो आम्हाला चुकीची निवड करण्यास मना करीतो.( पाहा प्रेषीत 16:6-7)

जितकी जास्त आम्ही एखादया व्यक्ती विषयी माहिती करुन घेतो,तीतके त्यांच्या इच्छेविषयी आम्ही परिचित होतो. उदा.साठी एक लहान मुलगा एका गर्दीअसलेल्या सडकेच्या दुसऱ्या बाजूला पडलेल्या चेंडूकडे पाहून तो ते घेण्यासाठी धावत नाही. कारण त्याला माहिती आहे की “त्यांचे वडील ते त्याला करु देत नाही.”मग तो आपल्या वडीला जवळ जावून त्या विशेष परिस्थिती बद्दल मार्गदर्शन घईल आणि त्याला हे माहित आहे. त्यांचे वडील काय म्हणणार आहेत आणि हे सत्य देवा संगती आमच्या नात्या मध्ये आहे. जेव्हा आम्ही देवाच्या संगती चालण्यास सुरुवात करीतो. जेव्हा त्यांच्या वचनाचे आज्ञा पालन करीतो. व त्याच्या आत्म्यावर निर्भय राहातो.आम्हाला ठावूक होते की, ख्रिस्ताचे मन आम्हाला देण्यात आले आहे.(Iकरीथ 2:16) आम्ही त्याला ओळखतो आम्हाला त्याची इच्छा ओळखण्यास मदत होते. आम्हाला देवाचे मार्गदर्शन तुरंत प्राप्त होते.“सात्वीकाची धार्मीकता त्याचा मार्ग निट करते, पण दुर्जन आपल्या दृष्टतेने पतन पावेल” (निती 11:5)

जर आम्ही प्रभु संगती जवळून चालत असू व आपल्या त्यांची इच्छा पूर्ण व्हावी. यासाठी आपली इच्छा असेल तर देव त्यांची इच्छा त्यांच्या अंतकरणात पूर्ण करेल देवाच्या इच्छा प्राप्त करण्याची चावी म्हणजे आमच्या इच्छेनेच न होणे ही आहे.“परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल व तो तुझे मनोरत पूर्ण करील“(स्त्रोत 37:4)

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवाची इच्छा माझ्या जीवनात काय आहे हे मी कसे जाणून घेऊ शकतो ?
© Copyright Got Questions Ministries