प्रश्नः
सोडणे आणि जडून राहणे याचा अर्थ काय होतो?
उत्तरः
“यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील” (उत्पत्ती 2:24 केजेव्ही). इतर भाषांतरे “सोडणे आणि जडून राहणे” याला “सोडा आणि संयुक्त व्हा” (एनआयव्ही), “सोडा आणि जोडले जा” (एनएएसबी), आणि “सोडा आणि घट्ट धरून रहा” (ईएसव्ही) असे प्रस्तुत करतात. म्हणून, तुझ्या बापाला आणि आईला सोडून आणि तुझ्या जोडीदाराशी जडून राहणे याचा तंतोतंत अर्थ काय होतो?
उत्पत्ती 2 ऱ्या अधिकारात नोंद केल्याप्रमाणे, देवाने पहिल्यांदा आदमला आणि नंतर हव्वा हिला निर्माण केले. देव स्वतः हव्वाला आदमकडे घेऊन आला. देवाने स्वतः नेमले की, ते पवित्र लग्नामध्ये एकत्रित जोडले जातील. तो बोलला की ते दोघे एकदेह होतील. हे वैवाहिक घानिष्ठतेचे चित्र आहे—प्रेमाची कृती ज्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही समावेश कधीच होत नाही. “जडून राहणे” याचा अर्थ “ला चिकटून राहणे, ला चिकटणे, किंवा च्या बरोबर सामील होणे” असा होतो. हे दोन लोकांचे एका अस्तित्वामध्ये अद्वितीय जोडणे आहे. याचा अर्थ असा आहे की जर गोष्टी बरोबर होत नसतील तर आपण सोडू शकत नाही. यामध्ये गोष्टी स्पष्टपणे बोलणे, गोष्टींद्वारे प्रार्थना करणे, देव तुमच्या दोघांच्या हृदयामध्ये कार्य करेल असा विश्वास ठेऊन सहनशील असणे, जेंव्हा तुम्ही चुकीचे असाल त्यावेळी ते कबूल करण्यास आणि क्षमा मागण्यास सक्षम असणे, आणि नियमितपणे त्याच्या वचनातून सल्ला शोधणे यांचा समावेश होतो.
जर दोघांपैकी एखादा जोडीदार सोडणे आणि जोडणे यामध्ये अपयशी झाला तर, त्याचा परिणाम लग्नामध्ये समस्या असा होतो. जर जोडीदाराने खरोखर त्याच्या पालकांना सोडण्यास नकार दिला तर त्याचा परिणाम वादविवाद आणि तणाव असा होतो. आपल्या पालकांना सोडणे याचा अर्थ त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांच्याबरोबर वेळ न घालवणे असा होत नाही. आपल्या पालकांना सोडणे म्हणजे तुमच्या लग्नामुळे तुमचे एक नवीन कुटुंब तयार झाले आहे हे ओळखणे आणि या नवीन कुटुंबाला आधीच्या कुटुंबापेक्षा अधिक प्राधान्य देणे. जर जोडीदार एकमेकांशी जडून राहण्यात दुर्लक्ष करतील तर त्याचा परिणाम घनिष्ठता आणि एकोप्याची कमतरता असा होतो. तुमच्या जोडीदाराशी जडून राहण्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रत्येक क्षणी असला पाहिजे किंवा तुमच्या लग्नाच्या बाहेर कोणतीही अर्थपूर्ण मैत्री असली पाहिजे असा होत नाही. आपल्या जोडीदाराशी जडून राहणे म्हणजे तुम्ही जोडलेले आहात, प्रामुख्याने, तुमच्या जोडीदाराशी “चिकटलेले” असे आहात हे ओळखणे. जडून राहणे ही लग्नाला घडवण्याची किल्ली आहे ज्याने कठीण काळात सुद्धा ठीकाव धरता येईल आणि ते देव इच्छित असलेले सुंदर नाते असेल.
लग्नातील बंधनामध्ये “सोडणे आणि जडून राहणे” हे ऐक्याचे चित्र आहे जे आपले त्याच्याबरोबर असावे अशी देवाची इच्छा आहे. “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला अनुसरावे, त्याचे भय बाळगावे; त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यालाच चिकटून राहावे” (अनुवाद 13:4 केजेव्ही). याचा अर्थ असा आहे की आपण इतर सर्व देवांना ज्यांनी कोणतेही रूप घेतलेले असू दे सोडावे, आणि त्या एकट्याशी आपला देव म्हणून जडून राहावे. जसे आपण त्याचे वचन वाचतो आणि आपल्यावरील त्याच्या अधिकाराला समर्पित होतो तसे आपण त्याला जडून राहतो. नंतर, जेंव्हा आपण त्याचे जवळून अनुसरण करतो, तेंव्हा आपल्याला असे आढळून येते की, आई आणि बापाला सोडण्याची त्याची सूचना जसे त्याने उद्देशिले होते तसे आपल्या जोडीदाराशी जडून राहण्यासाठीच्या वचनबद्धता आणि सुरक्षितता यांचा शोध घेणे आहे. सोडणे आणि जडून राहणे ही जे लग्न करतात त्यांच्यासाठी देवाची योजना आहे. जेंव्हा आपण देवाच्या योजनेचे अनुसरण करतो, तेंव्हा आपण कधीच निराश होत नाही.
English
सोडणे आणि जडून राहणे याचा अर्थ काय होतो?