प्रश्नः
नरकामध्ये शिक्षेचे वेगवेगळे स्तर आहेत काय?
उत्तरः
नरकामध्ये शिक्षेचे वेगवेगळे स्तर आहेत ही संकल्पना प्रामुख्याने दी डिव्हाईन कॉमेडी या पुस्तकातून मिळवलेली आहे, ज्याला डॅन्ट अॅलिघिएरि याने 1308 आणि 1321 यादरम्यान लिहिले. कवितेमध्ये, रोमी कवी विर्गील डॅन्टचे नरकाच्या नऊ मंडळाद्वारे मार्गदर्शन करतो. ही मंडळे समकेंद्री, दुष्टपणा क्रमशः वाढत जाण्याचे प्रतिनिधित्व करणारी आणि त्याचा कळस पृथ्वीच्या मध्याशी आहे, जेथे सैतानाला बंधनात ठेवले आहे अशी आहेत. प्रत्येक मंडळाच्या पाप्याला त्यांच्या गुन्ह्याला साजेशी शिक्षा दिली जाते. प्रत्येक पाप्याला त्याने जे मुख्य पाप केले आहे त्याद्वारे अनंतकाळापर्यंत पीडा होत राहते. डॅन्टच्या अनुसार, मंडळांची श्रेणी पहिल्या मंडळापासून सुरु होते, जेथे बाप्तिस्मा न झालेले आणि सद्गुणी मूर्तिपूजक वास करतात, ते नरकाच्या केंद्रबिंदूपर्यंत आहे जी अशा लोकांसाठी राखीव आहे ज्यांनी अंतिम पाप—देवाशी विश्वासघात हे केले आहे.
जरी पवित्र शास्त्र विशिष्टपणे असे सांगत नाही, तरी असे सूचित करते की नरकामध्ये वेगवेगळ्या स्तराच्या शिक्षा आहेत. प्रकटीकरण 20:11-15 मध्ये, लोकांचा न्याय, “जसे पुस्तकात त्यांनी जी कृत्ये केली ती लिहिली होती त्यावरून केला” (प्रकटीकरण (20:12). या न्यायाच्या वेळी त्या सर्व लोकांना अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. (प्रकटीकरण 20:13-15). म्हणून, कदाचित, न्यायाचा हेतू हा नरकातील शिक्षा किती कठोर आहे हे निश्चित करणे आहे. प्रकरण कोणतेही असो, अग्नीच्या सरोवरापेक्षा किंचित कमी गरम भागात फेकले जाणे हे अजूनही अनंतकाळापर्यंत ज्यांच्या नशिबात आहे त्यांच्यासाठी हे सांत्वन काही अधिक कामाचे नाही.
नरकामध्ये वेगवेगळ्या स्तराच्या शिक्षा असतील याचा दुसरा निर्देश येशूच्या शब्दात सापडतो: “आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहित असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील. परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहित नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याकडून पुष्कळच अधिक मागतील” (लूक 12:47-48).
नरकामध्ये शिक्षेच्या कितीही पायऱ्यांचा समावेश असला तरी, हे स्पष्ट आहे की नरक ही जागा टाळायची आहे.
दुर्दैवाने, पवित्र शास्त्र असे सांगते की अनेक लोक त्यांचा शेवट नरकात करतील: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आंत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत” (मत्तय 7:13-14). प्रत्येकाने एक प्रश्न विचारला पाहिजे “मी कोणत्या मार्गावर आहे?” जे “अनेक” रुंद मार्गावर आहेत त्यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे—त्या सर्वांनी ख्रिस्त हाच स्वर्गामध्ये जाण्याचा एकमेव मार्ग आहे हे नाकारले आहे. येशूने म्हंटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही” (योहान 14:6). जेंव्हा त्याने म्हंटले तोच एकमेव मार्ग आहे, तेंव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ तंतोतंत तसाच होतो. येशू ख्रिस्ताला सोडून दुसऱ्या “मार्गाचे” अनुसरण करणारा प्रत्येकजण नाशाच्या रुंद मार्गावर आहे, आणि जरी नरकामध्ये शिक्षेचे वेगवेगळे स्तर असले किंवा नसले तरीही तो त्रास हा भीषण, भयंकर, सार्वकालिक, आणि अटळ आहे.
English
नरकामध्ये शिक्षेचे वेगवेगळे स्तर आहेत काय?