प्रश्नः
ख्रिस्ताच्या आगमनाच्या प्रकाशात जीवन आम्ही कसे जीवन जगले पाहिजे?
उत्तरः
आमचा हा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन जवळ आहे, अर्थात, तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो. आम्ही प्रेषित पौलासोबत “धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत” आहोत (तीत 2:13). प्रभू आज कोणत्याही क्षणी परत येऊ शकतो हे जाणून काही जणास हा मोह झाला आहे की जे काही ते करीत आहेत ते थांबवून त्यांनी फक्त त्याची वाट पहावी.
तथापि, येशू आज येऊ शकला असता हे जाणणे आणि हे जाणणे तो आज येईल यांत फरक आहे. येशूने म्हटले, “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही” (मत्तय 24:36). त्याच्या आगमनाची वेळ परमेश्वराने कोणासही प्रगट केलेली नाही, आणि म्हणून जोवर तो आम्हास स्वतःकडे बोलावित नाही, तोवर आम्ही त्याची सेवा करीत राहावे. दहा मोहरांच्या येशूच्या दृष्टांतात, जाणारा राजा आपल्या सेवकांस सांगतो, “मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा” (लूक 19:13).
ख्रिस्ताचे पुनरागमन नेहमीच पवित्र शास्त्रात कार्य करण्यासाठी महान प्रेरणा म्हणून मांडले जाते, कार्य करणे थांबविण्यासाठी नाही. 1 करिंथ 15:58 मध्ये, पौलाने “नेहमी प्रभूच्या कार्यासाठी पूर्णपणे स्वतःला द्या” असे सांगून मंडळीच्या वर आकाशा उचलल्या जाण्यावरील आपली शिकवण समाप्त करतो. 1 थेस्सल 5:6 मध्ये, पौलाने ख्रिस्ताच्या आगमनाबद्दल आपला धडा समाप्त केला: “तर मग आपण झोपी गेलेल्या इतरांसारखे होऊ नये, तर आपण सावध व आत्मसंयमशील राहू या.” माघार घेणे आणि “गड राखणे” हा आमच्यासाठी येशूचा हेतू नव्हता. त्याऐवजी आम्ही काम करू शकतो तोवर आम्ही काम करावे. “रात्र येत आहे, जेव्हा कोणी काम करू शकत नाही” (योहान 9:4).
येशू त्यांच्या जीवनकाळात परत येऊ शकतो या कल्पनेसह प्रेषित जगले व सेवा केली; त्याने आपले श्रम सोडून फक्त “वाट पाहिली” असती तर काय झाले असते? ख्रिस्ताने दिलेली “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा” (मार्क 16:15) ही आज्ञा त्यांनी मोडली असती, आणि सुवार्तेचा प्रसार झाला नसता. प्रेषितांना समजले की येशूच्या जवळ आलेल्या आगमनाचा अर्थ असा आहे की त्यांनी देवाच्या कार्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवले पाहिजे. जणू काही प्रत्येक दिवस त्यांचा शेवटचा दिवस आहे असे समजून त्यांनी संपूर्ण आयुष्य परिपूर्णपणे जगले पाहिजे. आपणसुद्धा प्रत्येक दिवस भेट म्हणून पाहिला पाहिजे आणि त्याचा उपयोग देवाचे गौरव करण्यासाठी केला पाहिजे.
English
ख्रिस्ताच्या आगमनाच्या प्रकाशात जीवन आम्ही कसे जीवन जगले पाहिजे?