settings icon
share icon
प्रश्नः

विवाहपूर्वी एखाद्या दाम्पत्त्याचे एकत्र राहणे चुकीचे आहे काय?

उत्तरः


ह्या प्रश्नाचे उत्तर काहीसे या गोष्टीवर अवलंबून आहे की "एकत्र राहण्याचा" अर्थ काय आहे. जर त्याचा अर्थ लैंगिक संबंध स्थापन करणे असेल, तर ते निश्चितच चुकीचे आहे. पवित्र शास्त्रात विवाहपूर्वी समागमास, इतर सर्व प्रकारच्या लैंगिक अनैतिकतेसोबत वारंवार दोषी ठरविण्यात आले आहे (प्रेषितांची कृत्ये 15:20; रोमकरांस पत्र 1:29; करिंथकरांस 1 ले पत्र 5:1; 6:13, 18; 7:2; 10:8; करिंथकरांस 2 रे पत्र 12:21; गलतीकरांस पत्र 5:19; इफिसकरांस पत्र 5:3; कलस्सैकरांस पत्र 3:5; थेस्सलनीकाकरांस 1 ले पत्र 4:3; यहूदाचे पत्र 7). बायबल विवाहबाह्य (आणि विवाहापूर्वी) पूर्ण संयम राखण्यास प्रोत्साहन देते. विवाहापूर्वी समागम व्यभिचार आणि इतर सर्व प्रकारच्या लैंगिक अनैतिकतेइतकाच चुकीचा आहे, कारण त्या सर्वांत अशा व्यक्तीसोबत लैंगिक संबंध स्थापित करण्याचा समावेश आहे ज्यांच्याशी आपला विवाह झालेला नाही.

जर "एकत्र राहण्याचा" अर्थ एकाच घरात राहणे असेल, तर हा कदाचित वेगळा विषय आहे. शेवटी, स्त्री आणि पुरुषाचे एकाच घरात राहणे काहीही चुकीचे नाही — जर त्यात अनैतिक असे काही घडत नसेल तर. तथापि, समस्या ह्यात उत्पन्न होते की यात अद्याप अनैतिकतेचे रूप आहे (थेस्सलनीकाकरांस 1 ले पत्र 5:22; इफिसकरांस पत्र 5:3), आणि ते अनैतिकतेसाठी मोठी परीक्षा ठरू शकते. बायबल आम्हास सांगते की आम्ही अनैतिकतेपासून दूर पळ काढावा, अनैतिकतेच्या नित्य परीक्षेची स्वतःला संधी देता कामा नये (करिंथकरांस 1 ले पत्र 6:18). यात अविर्भावाची समस्या आहे. जे दाम्पत्त्य एकत्र राहतात त्यांस लैंगिकसंबंध स्थापन करीत असल्याचे मानले जाते — हे फक्त परिस्थितीचे स्वरूप आहे. जरी एकाच घरात राहणे स्वतःठायी पापमय नसले, तरी पापाचा देखावा तेथे असतो. बायबल आम्हास सांगते की आम्ही वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून अथवा देखाव्यापासून वाचले पाहिजे (थेस्सलनीकाकरांस 1 ले पत्र 5:22; इफिसकरांस पत्र 5:3), अनैतिकतेपासून दूर पळ काढला पाहिजे, आणि कोणालाही अडखळण ठरता कामा नये अथवा स्वतःही अडखळू नये. परिणामतः, विवाहाबाहेर स्त्री पुरुषाचे एकत्र राहणे देवास गौरव देणारे नाही.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

विवाहपूर्वी एखाद्या दाम्पत्त्याचे एकत्र राहणे चुकीचे आहे काय?
© Copyright Got Questions Ministries