प्रश्नः
माणूस देवाशिवाय जगू शकतो काय?
उत्तरः
शतकानुशतके नास्तिक आणि अज्ञेयवादी यांच्या दाव्यांविरूद्ध मनुष्य परमेश्वरावाचून जगू शकत नाही. देवाला मान्य न करता मनुष्याचे एक नश्वर अस्तित्व असू शकते, परंतु ते देवाच्या सत्यतेशिवाय असू शकत नाही.
निर्माणकर्ता म्हणून, देवाने मानव जीवनाची उत्पत्ती केली. मनुष्य देवाशिवाय अस्तित्त्वात असू शकतोे असे म्हणणे म्हणजे घड्याळ घड्याळ निर्मात्याशिवाय किंवा कथा सांगणार््याशिवाय कथा अस्तित्त्वात असू शकते असे म्हणणे होय. ज्याच्या प्रतिरूपात आम्हास घडविण्यात आले आहे त्या देवाप्रत आपल्या अस्तित्वाविषयी आम्ही ऋणी आहोत (उत्पत्ति 1:27). आम्ही त्याचे अस्तित्व मान्य करीत असू किंवा नसू, आपले अस्तित्व देवावर अवलंबून आहे.
पोषण देणारा म्हणून देव सतत जीवन देत असतो (स्तोत्र 104:10-32). तो जीवन आहे (योहान 14:6), आणि ख्रिस्त आपल्या सामथ्र्याने सर्व सृष्टीचा सांभाळ करतो (कलस्सै 1:17). देवाचा नाकार करणारे देखील त्याच्याकडून त्यांचा आहार प्राप्त करतात: “अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो” (मत्तय 5:45). माणूस देवाशिवाय जगू शकतो असा विचार करणे म्हणजे सूर्यफूल प्रकाशावाचून किंवा गुलाब पाण्यावाचून जगू शकतो असे समजणे होय.
तारणरा म्हणून, देव जे विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन देतो. ख्रिस्तामध्ये जीवन आहे, जो मनुष्यांचा प्रकाश आहे (योहान 1:4). येशू आला तो यासाठी की आम्हाला जीवन प्राप्त व्हावे आणि “विपुल जीवन प्राप्त व्हावे” (योहान 10:10). जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवनाचे वचन लाभले आहे (योहान 3:15-16). मनुष्यास जगण्यासाठी - खरोखर जगण्यासाठी - त्याने ख्रिस्ताला जाणले पाहिजे (योहान 17:3).
देवाशिवाय माणसाला फक्त शारीरिक जीवन आहे. देवाने आदाम आणि हव्वेला चेतावणी दिली की ज्या दिवशी ते त्याला नाकारतील ते “अवश्य मरतील” (उत्पत्ति 2:17). आम्हाला माहित आहे की त्यांनी आज्ञा मोडली, पण त्या दिवशी ते शारीरिकरित्या मरण पावले नाहीत; त्याऐवजी ते आत्मिकरित्या मरण पावले. त्यांच्यातील काहीतरी मरण पावले - त्यांना माहित असलेले आत्मिक जीवन, देवाबरोबरचे सहभागित्व, त्याचा आनंद घेण्याचे स्वातंत्र्य, त्यांच्या आत्म्याचे निर्दोषपण आणि शुद्धता - हे सर्व संपले.
आदाम, ज्याला देवासोबत जगण्यासाठी आणि सहभागित्व करण्यासाठी उत्पन्न करण्यात आले होते, त्याला पूर्णपणे शारीरिक अस्तित्वाचा शाप देण्यात आला. देवाची इच्छा होती की मनुष्याने धूळीपासून गौरवापर्यंत जावे, तो आता मातीपासून मातीसच मिळणार होता. आदामप्रमाणेच, आजही देवावाचून जगणारा माणूस आजही पृथ्वीवरील अस्तित्वात कार्य करतो. अशी व्यक्ती आनंदी वाटत असेल; तथापि, या जीवनातच आनंद आणि सुख आहे. पण तो आनंद आणि सुखसुद्धा देवाशी असलेल्या नात्यावाचून पूर्णपणे मिळू शकत नाही.
जे देवाला नाकारतात ते मनोरंजन आणि आनंदाचे जीवन उपभोगतात. शारीरिक सुखाच्या मागे धावत असल्यामुळे ते निश्चिंत आणि संतुष्ट जीवन जगत आहेत असे दिसते. बायबलमध्ये असे म्हटले आहे की पापामध्ये क्षणिक सुख आहे (इब्री लोकांस पत्र 11:25). समस्या ही आहे की हे जीवन क्षणिक आहे; या जगाचे आयुष्य लहान आहे (स्तोत्र 90:3-12). लवकरच सुखवादी व्यक्तीस दिसून येते की ऐहिक आनंद टिकू शकत नाही (लूक 15:13-15).
तथापि, देवाला नाकारणारा प्रत्येकजण रिक्त सुख शोधणारा नसतो. असे बरेच तारण न पावलेले लोक आहेत जे शिस्तबद्ध, विचारी जीवन जगतात - सुखी आणि परिपूर्ण आयुष्य देखील. बायबलमध्ये काही नैतिक तत्त्वे दिली आहेत जी या जगातील कोणालाही फायदेशीर ठरतील - निष्ठा, प्रामाणिकपणा, आत्मसंयम इ. परंतु, पुन्हा, देवाशिवाय मनुष्याला फक्त हे जग आहे. या जीवनात सहजतेने जगणे म्हणजे आपण नंतरच्या जीवनासाठी तयार आहोत याची शाश्वती नाही. लूक 12:16-21 मधील श्रीमंत शेतकर्याचा दृष्टांत आणि मत्तय 19:16-23 मधील श्रीमंत (परंतु अतिशय नैतिक) तरूणांशी येशूचे संभाषण पहा.
देवावाचून मनुष्य आपल्या जीवनात अगदी अपूर्ण आहे, त्याच्या नैतिक जीवनात देखील. माणसाच्या स्वतःच्या जीवनात शांती नसल्यामुळे तो इतरांशी शांतीने वागू शकत नाही. मनुष्य स्वतःठायी बेचैन असतो कारण त्याला देवाबरोबर शांती नसते. सुखप्राप्तीसाठी आनंद मिळविण्याचा प्रयत्न करणे हे आतील गोंधळाचे लक्षण आहे. इतिहासातील सुखाचा शोध घेणार्यांना असे आढळून आले आहे की जीवनातील तात्पुरते मनोरंजन आणखी नैराश्यास मार्ग दाखवते. “काहीतरी चुकत आहे” ही तीव्र भावना दूर करणे कठीण आहे. राजा शलमोन याने जग जे काही देऊ करीत होते त्याचा पाठपुरावा केला, आणि त्याचा निकाल त्याने उपदेशकाच्या पुस्तकात नोंदला.
शलमोनाला हे समजले की हे ज्ञान निरर्थक आहे, आणि ते स्वतःमध्ये व्यर्थ आहे (उपदेशक 1:12-18). त्याला असे आढळले की सुख आणि संपत्ती व्यर्थ आहे (2:1-11), भौतिकवाद मूर्खपणा आहे (2:12-23) आणि संपत्ती क्षणभंगूर आहे (अध्याय 6).
शलमोनाने असा निष्कर्ष काढला की जीवन ही देवाची देणगी आहे (3:12-13) आणि जगण्याचा एकमेव शहाणपणाचा मार्ग म्हणजे देवाचे भय बाळगणे: “आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बर्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल” (12:13-14).
दुसर्या शब्दांत, भौतिक परिमाणांपेक्षा जीवनासाठी बरेच काही आहे. जेव्हा येशू म्हणतो, “मनुष्य केवळ भाकरीनेच नव्हे तर देवाच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल” (मत्तय 4:4). भाकर नाही (भौतिक) परंतु देवाचे वचन (आत्मिक) आपल्याला जिवंत ठेवते. आपल्या सर्व समस्यांवरील उपचारांसाठी आपण स्वतःमध्ये शोधणे निरुपयोगी आहे. जेव्हा मनुष्य देवाला कबूल करतो तेव्हाच तो जीवन आणि परिपूर्णता प्राप्त करू शकतो.
देवाशिवाय माणसाचे भविष्य नरक आहे. देवाशिवाय माणूस आत्मिकरित्या मृत आहे; जेव्हा त्याचे शारीरिक जीवन संपते तेव्हा तो देवापासून सार्वकालिक विभक्ततेस तोंड देतो. येशूच्या श्रीमंत माणसाच्या आणि लाजरच्या (लूक 16:19-31) दृष्टांतात श्रीमंत माणूस देवाचा विचार न करता सुखाचे आयुष्य जगतो, तर लाजर आपल्या आयुष्यात दुःख भोगतो पण देवाला जाणतो. त्यांच्या मृत्यूनंतरच, दोघांनीही आयुष्यात घेतलेल्या निवडींच्या गांभिर्याची त्यांना खरोखर जाणीव होते, पण आता फार उशीर झाला आहे. श्रीमंत माणसाला हे लक्षात आले की संपत्तीचा मागोवा घेण्यापेक्षा आयुष्यात बरेच काही आहे. दरम्यान, लाजरस सुखलोकात आरामात आहे. दोन्ही पुरुषांसाठी, त्यांच्या पृथ्वीवरील अस्तित्वाचा अल्प कालावधी त्यांच्या आत्म्याच्या कायम स्थितीच्या तुलनेत निस्तेज पडले.
माणूस एक अद्वितीय निर्मिती आहे. परमेश्वराने आपल्या अंतःकरणात सार्वकालिकतेची भावना स्थापित केली आहे (उपदेशक 3:11) आणि त्या शाश्वत भविष्याची जाणीव केवळ परमेश्वरामध्येच पूर्ण होते.
English
माणूस देवाशिवाय जगू शकतो काय?