प्रश्नः
पवित्र शास्त्राच्या अनुसार लग्न कशाने स्थापित होते?
उत्तरः
एका पुरुषाचे आणि एका स्त्रीचे लग्न झाले आहे असे देवाने समजण्यासाठी नेमका कोणता मुद्दा आहे, याबद्दल पवित्र शास्त्र कोठेही स्पष्टपणे सांगत नाही. तेथे तीन सामान्य दृष्टीकोन आहेत: 1) जेंव्हा कायद्याने एका पुरुषाचे आणि स्त्रीचे लग्न होते तेंव्हाच त्यांचे लग्न झाले आहे असे देव समजतो—म्हणजेच, ते कायद्याच्या नजरेत पती आणि पत्नी बनतात. 2) देवाच्या नजरेत पुरुष आणि स्त्रीचे लग्न होते, जेंव्हा ते काही औपचारिक लग्न सोहळा पूर्ण करतात ज्यामध्ये करारातील वचनांचा समावेश असतो. 3) ज्याक्षणी पुरुष आणि स्त्री लैंगिक संबंधांमध्ये अडकतात त्याक्षणी देव त्यांचे लग्न झाले असे समजतो. तीन पैकी प्रत्येक दृष्टीकोनाला पाहूया आणि त्यांच्या मजबुती आणि कमतरता यांचे मूल्यमापन करूया.
1) जेंव्हा कायद्याने पुरुषाचे आणि स्त्रीचे लग्न होते तेंव्हाच त्यांचे लग्न झाले आहे असे देव समजतो. सामन्यता या दृष्टिकोनाच्या आत्मिक समर्थनासाठी सरकारच्या कायद्याचे पालन करण्याच्या आज्ञेला दिले जाते (रोम 13:-7; 1 पेत्र 2:17). युक्तिवाद असा आहे की, जर सरकारने एखाद्या जोडप्याचे लग्न झाले आहे हे मान्य करण्यासाठी त्या जोडप्याने काही कागदपात्रांची किंवा प्रक्रियेची पूर्तता करणे गरजेचे असेल तर त्या जोडप्याने त्या प्रक्रियेस स्वतःस सादर केले पाहिजे. एखाद्या जोडप्यासाठी जोपर्यंत सरकारला आवश्यक असलेल्या गोष्टी देवाच्या वचनाच्या विरोधमध्ये नाहीत आणि ज्या रास्त आहेत तोपर्यंत त्यांनी सरकारला स्वतःस सादर करणे निश्चितच पवित्रशास्त्राच्या अनुसार आहे. रोम 13:1-2 आपल्याला सांगते, “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो; तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील.”
तथापि, या दृष्टीकोनासोबत काही कमतरता आणि संभाव्य समस्या आहेत. पहिली, कोणतेही सरकार संघटीत होण्याच्या आधीपासून लग्न अस्तित्वात आहे. हजारो वर्षापासून, लोक लग्न करत आहेत ज्यामध्ये लग्नाचे प्रमाणपत्र यासारखी कोणती गोष्टच नव्हती. दुसरी, असे काही देश आहेत ज्यामध्ये लग्नाला शासकीय मान्यता नाही, आणि/किंवा लग्नासाठी कायदेशीर गोष्टींची आवश्यकता नाही. तिसरी, असे काही शासन आहेत ज्यांनी लग्नाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी पवित्र शास्त्राच्या विरोधमधील काही गोष्टींचा आवश्यक बाबींमध्ये समावेश केला आहे. उदाहरणार्थ, काही देशांना लग्न मान्य होण्यासाठी ते कॅथोलिक चर्च मध्ये कॅथोलिक शिक्षणानुसार आणि कॅथोलिक याजकाच्या देखरेखीखाली होणे गरजेचे आहे. निश्चितच, ज्यांचे कॅथोलिक चर्चबरोबर आणि लग्नाच्या संस्काराचे कॅथोलिक समज याबाबत अतिशय मतभेद आहेत, त्यांच्यासाठी कॅथोलिक चर्च मध्ये लग्न करणे हे पवित्र शास्त्राच्या विरोधमध्ये असेल. चौथे, पूर्णपणे सरकारी नियमांच्या आधारावर लग्नाला कायदेशीर बनवणे हे अप्रत्यक्षपणे लग्नाच्या वैधानिक व्याखेला मंजुरी देण्यासारखे आहे, ज्यामध्ये चढउतार होऊ शकतो.
2) देवाच्या दृष्टीमध्ये पुरुष आणि स्त्रीचे लग्न होते, जेंव्हा ते काही औपचारिक लग्न सोहळा पूर्ण करतात. काही अर्थ लावणारे देवाचे हव्वेला आदमकडे आणण्याला (उत्पत्ती 2:22) देवाच्या देखरेखीखालचा पहिला विवाह “सोहळा” असे समजतात—पित्याने लग्नामध्ये आपल्या मुलीला देण्याची आधुनिक पद्धत ही देवाच्या एदेनमधील कृतीला प्रतिबिंबित करते. योहानच्या 2 ऱ्या अधिकारात, येशू लग्नात उपस्थित होता. लग्नामधील येशूची उपस्थिती कोणत्याही अर्थाने हे सूचित करत नाही की, देवाला लग्नसोहळा आवश्यक आहे, परंतु हे असे सूचित करते की लग्नसोहळा देवाच्या नजरेमध्ये स्वीकृत आहे. इतिहासातील जवळपास प्रत्येक संस्कृतीमध्ये कोणत्या तरी प्रकारचा औपचारिक लग्नसोहळा आहे असे निरीक्षणास आले आहे. प्रत्येक संस्कृतीमध्ये एखादा कार्यक्रम, कृती, करार, वचन, किंवा घोषणा असते ज्याद्वारे पुरुषाचे आणि स्त्रीचे लग्न झाल्याचे जाहीर करून मान्यता दिली जाते.
3) ज्याक्षणी पुरुष आणि स्त्री लैंगिक संबंधांमध्ये अडकतात त्याक्षणी देव त्यांचे लग्न झाले असे समजतो. काही असे आहेत जे याला या अर्थाने घेतात की एक लग्न झालेले जोडपे हे देवाच्या नजरेत खऱ्या अर्थाने “लग्न झालेले” असे होत नाही जोपर्यंत ते लग्नाला शारीरिकदृष्ट्या उपभोगत नाहीत. बाकीचे असा युक्तिवाद करतात की, जर एखाद्या पुरुषाने आणि स्त्रीने संभोग केला तर देव त्या दोघांचे लग्न झाले असे समजतो. या दृष्टिकोनाचा आधार ही वस्तुस्थिती आहे की पती आणि पत्नीमधील लैंगिक संभोग हा “एकदेह” च्या तत्वाची अंतिम परिपूर्णता आहे (उत्पत्ती 2:24; मत्तय 19:5; इफिस 5:31). या अर्थाने, लैंगिक संभोग हा लाग्नावरील शेवटचा “शिक्का” आहे. तथापि, संभोग लग्नाला स्थापित करतो हा दृष्टीकोन पवित्रशास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. जर एखाद्या जोडप्याचे कायदेशीररीत्या आणि औपचारिकरीत्या लग्न झालेले असले, परंतु काही कारणास्तव त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध स्थापित होऊ शकले नाहीत तर त्या जोडप्याला अजूनही लग्न झालेले असेच मानतील.
आपल्याला माहित आहे की, देव लैंगिक संभोगाला लग्नाच्या समतुल्य या वस्तुस्थितीच्या आधारावर मानत नाही की, जुना करार बऱ्याचदा पत्नीला उपपत्नीपासून वेगळा ठरवतो. उदाहरणार्थ, 2 इतिहास 11:21 एका राजाच्या कौटुंबिक जीवनाचे वर्णन करते: “रहबाम आपल्या सर्व पत्नी व उपपत्नी यांहून अबशालोमची कन्या माका हिजवर अधिक प्रीती करत असे; त्याने अठरा पत्नी व सात उपपत्नी केल्या.” या वचनामध्ये, उपपत्नी ज्यांनी रहबाम राजाबरोबर लैंगिक संबंध ठेवले तरीसुद्धा त्यांना पत्नी म्हणून समजण्यात आले नाही आणि त्यांचा उल्लेख वेगळ्या श्रेणीत केला गेला.
आणखी, 1 करिंथ 7:2 हे सूचित करते की लग्नाआधी लैंगिक संबंध हा अनैतिक आहे. जर लैंगिक संबंधामुळे एखाद्या जोडप्याला लग्न झालेले असे समजले जात असते तर, त्याला अनैतिक समजले गेले नसते, कारण ज्याक्षणी त्या जोडप्याने लैंगिक संबंध स्थापित केला त्याक्षणी त्यांना लग्न झालेले असे समजण्यात आले असते. लग्न न झालेल्या जोडप्यासाठी संभोग करणे आणि त्यांचे लग्न झाले असे स्वतः घोषित करणे, आणि त्याद्वारे भविष्यातील सर्व लैंगिक संबंधांना नैतिक आणि देवाचा सन्मान करणारे असे जाहीर करण्याला पवित्र शास्त्राचा कोणताही आधार नाही.
म्हणून, देवाच्या नजरेत लग्न कशाने स्थापित होते? असे दिसून येते की, खालील तत्वांचे पालन केले पाहिजे: 1) जोपर्यंत आवश्यकता रास्त आहेत आणि पवित्र शास्त्राच्या विरुद्ध नाहीत तोपर्यंत पुरुषाने आणि स्त्रीने ज्या काही औपचारिक शासकीय मान्यता उपलब्ध आहेत त्यांना शोधले पाहिजे. 2) “अधिकृतपणे विवाहित” म्हणून ओळखण्यासाठी सामान्यपणे पुरुषाने आणि स्त्रीने ज्या काही सांस्कृतिक, कौटुंबिक, आणि कराराच्या पद्धती आहेत त्यांचे अनुसरण केले पाहिजे. 3) शक्य असल्यास, पुरुष आणि स्त्रीने लैंगिकदृष्ट्या लग्नाचा उपभोग घेऊन “एकदेह” च्या तत्वाच्या शारीरिक पैलुची पूर्तता केली पाहिजे.
English
पवित्र शास्त्राच्या अनुसार लग्न कशाने स्थापित होते?