प्रश्नः
लग्नासाठी योग्य वेळ कोणती आहे?
उत्तरः
लग्नाची योग्य वेळ ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये असाधारण असते. परिपक्वतेचा स्तर आणि आयुष्याचे अनुभव हे बदलणारे घटक आहेत; काही लोक लग्नासाठी वयाच्या 18 व्या वर्षी तयार असतात, आणि काही लोक कधीच तयार नसतात. जसे अमेरिकेमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 50 टक्क्याहून जास्त झाले आहे, हे स्पष्ट आहे की, आपल्या समाजातील अनेकजण लग्नाकडे सार्वकालिक वचनबद्धता म्हणून बघत नाहीत. तथापि, हा जगाचा दृष्टीकोन आहे, जो नेहमीप्रमाणे देवाच्या दृष्टीकोनाच्या विरुद्ध आहे (1 करिंथ 3:18).
यशस्वी लग्नासाठी एक भक्कम पाया अत्यावश्यक आहे, आणि एखाद्याने संभाव्य जीवन साथीला भेटण्यास किंवा तारीख देण्यास सुरवात करण्याच्या आधीच तो पक्का केला पाहिजे. आपल्या ख्रिस्तामधील चालीमध्ये फक्त दर रविवारी सभेला जाणे आणि पवित्र शास्त्राच्या अभ्यासामध्ये सामील होणे यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टींचा समावेश असला पाहिजे. आपला देवाशी व्ययक्तिक संबंध असला पाहिजे आणि तो फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे आणि त्याची आज्ञा पाळण्याद्वारे येतो. आपण लग्नाच्या नात्यात जाण्यापूर्वीच याबद्दल शिक्षण आणि देवाचा दृष्टीकोन जाणून घेतला पाहिजे. लग्नासाठी वचनबद्ध होण्याच्या अगोदर एखाद्या व्यक्तीला हे माहित असायला हवे की, पवित्र शास्त्र लग्नाबद्दल, वचनबद्धतेबद्दल, लैंगिक संबंधांबद्दल, पती आणि पत्नीच्या भूमिकेबद्दल, आणि देवाच्या आपल्याकडूनच्या अपेक्षांबद्दल काय सांगते. आदर्श भूमिका असलेली लग्न झालेली कमीत कमी एक ख्रिस्ती जोडी असणे महत्वाचे आहे. यशस्वी लग्नासाठी काय लागते, घानिष्टता कशी निर्माण करावी (शारीरिक संबंधापलीकडे), विश्वास किती अमूल्य आहे इत्यादी प्रश्नांची उत्तरे एक वयोवृद्ध झालेली जोडी देऊ शकते.
ज्यांचे लग्न होणार आहे अशा जोडीने याची खात्री करून घेणे गरजेचे आहे की ते एकमेकांना चांगले ओळखतात. त्यांना लग्न, वित्तीय, सासरचे लोक, मुलांचे संगोपन, शिस्त, पती आणि पत्नीच्या जबाबदाऱ्या, दोघांपैकी एकजण किंवा दोघेजण घराच्या बाहेर जाऊन काम करणार आहेत, आणि समोरच्या व्यक्तीचा आत्मिक स्तर याबद्दलचे एकमेकांचे दृष्टीकोन ठाऊक असले पाहिजेत. ते ख्रिस्ती आहेत या त्यांच्या पालकांच्या शब्दावर विश्वास ठेऊन अनेक लोक लग्न करतात, आणि नंतर त्यांना कळून येते की ती केवळ ओठांची बडबड होती. लग्नाचा विचार करणाऱ्या प्रत्येक जोड्याने ख्रिस्ती विवाह समुपदेशक किंवा पाळक यांच्याकडून समुपदेशन घेणे जरुरी आहे. वस्तुस्थितीमध्ये, अनेक पाळक जोपर्यंत एखाद्या जोडीबरोबर समुपदेशनासाठी अनेक वेळा भेटत नाहीत तोपर्यंत ते लग्न लावत नाहीत.
लग्न हे केवळ वचनबद्धता नाही तर तो देवाबरोबरचा एक करार आहे. तुमचा जोडीदार श्रीमंत, गरीब, निरोगी, आजारी, वजनदार, बारिक, किंवा कंटाळवाणा कसाही असला तरीही तुमचे उर्वरित आयुष्य त्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर घालवण्याचे हे वचन आहे. एक ख्रिस्ती लग्न प्रत्येक परिस्थितीमध्ये टिकले पाहिजे, ज्यामध्ये भांडणे, राग, विध्वंस, निराशा, कटुता, व्यसन, आणि एकटेपणाचा समावेश होतो. अगदी शेवटचा संकेत म्हणून सुद्धा, लग्नाचा अशा संकल्पनेमध्ये प्रवेश नाही झाला पाहिजे जिथे घटस्फोट हा पर्याय असेल. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की, देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत (लूक 18:27), आणि यामध्ये निश्चितच लग्नाचा समावेश होतो. जर एखाद्या जोडीने सुरवातीलाच वचनबद्ध राहण्याचा आणि देवाला प्रथमस्थान देण्याचा निर्णय घेतला तर, दुःखीकष्टी परिस्थितीमध्ये सुद्धा घटस्फोट हा अटळ उपाय आशु शकणार नाही.
याची आठवण असणे महत्वाचे आहे की, देव आपल्याला आपल्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देऊ इच्छितो, परंतु हे तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा आपल्या इच्छा त्याच्या इच्छांशी जुळतील. लोक बऱ्याचदा लग्न करतात कारण त्यांना ते “योग्य वाटले.” भेटी होण्याच्या आणि लग्नाच्या सुद्धा सुरवातीच्या दिवसांमध्ये, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला येताना बघता आणि तुमच्या पोटात गुदगुल्या व्हायला लागतात. प्रणय त्याच्या शिखरावर असतो, आणि तुम्ही “प्रेमात” असल्याच्या भावनेला ओळखता. अनेकांची अपेक्षा असते की ही भावना कायम अशीच रहावी. वस्तुस्थिती आहे की ती नाही राहत. जशा त्या भावना फिक्या होत जातात तसा त्याचा परिणाम निराशा आणि घटस्फोट सुद्धा होऊ शकतो, परंतु तेच यशस्वी लग्नामध्ये त्यांना हे ठाऊक असते की दुसऱ्या व्यक्तीबरोबर असण्याच्या उत्सुकतेचा अंत नाही. त्याऐवजी, त्या भावना खोलवर रुजणाऱ्या प्रेमाला, मजबूत वचनबद्धतेला, अजून भक्कम पायाला, आणि अतूट सुरक्षेला मार्ग करून देतात.
पवित्र शास्त्र याबाबतीत स्पष्ट आहे की, प्रेम हे भावनेवर अवलंबून नाही, जेंव्हा आपल्याला आपल्या शत्रूंवर प्रेम करायला सांगितले तेंव्हा हे स्पष्ट झाले (लूक 6:35). जेंव्हा आपण पवित्र आत्म्याला आपल्यामधून कार्य करण्यास परवानगी देतो, तारणाच्या फळाला रुजवतो, तेंव्हाच खरे प्रेम शक्य आहे (गलती 5:22-23). स्वतःसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी मरण्याचा आणि देवाने आपल्यामधून प्रकाषण्याचा हा निर्णय आहे जो आपण दररोज घेतो. दुसऱ्यांवर कसे प्रेम करावे याबद्दल पौल आपल्याला 1 करिंथ 13:4-7 मध्ये सांगतो: “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मरत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते; ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वासंबंधाने धीर धरते.” 1 करिंथ 13:4-7 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे जेंव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करण्यास तयार होतो तीच लग्नासाठी योग्य वेळ आहे.
English
लग्नासाठी योग्य वेळ कोणती आहे?