settings icon
share icon
प्रश्नः

विवाहाविषयी बायबल काय म्हणते?

उत्तरः


बायबल उत्पत्ति 2:23-24 मध्ये विवाहाच्या उत्पत्तीविषयी लिहिते : "परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनविली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे; हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे." "मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन" (उत्पत्ति 2:18).

पहिल्या विवाहाचे वर्णन करतांना बायबल, हव्वेची ओळख घडवून देण्यासाठी साहाय्यक ह्या शब्दाचा उपयोग करते (उत्पत्ति 2:20). ह्या संदर्भात "साहाय्य" करण्याचा अर्थ "वेढणे, रक्षण करणे अथवा मदत पुरविणे" हा आहे. देवाने हव्वेला आदामाची "अर्धांगिनी" म्हणून, त्याची साहाय्यक आणि मदतगार म्हणून त्याच्याजवळ येण्यास घडविले. बायबल म्हणते की विवाह स्त्री व पुरुषास "एकदेह" करितो. ही एकता लैंगिक घनिष्टतेच्या शारीरिक मिलनात अत्यंत पूर्णपणे प्रगट होते. नवा करार ह्या एकतेसंबंधाने सावधगिरीचा इशारा देते. "ह्यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. ह्यास्तव देवाने जे जोडिले आहे ते माणसाने तोडू नये" (मत्तय 19:6).

पौलाची अनेक पत्रे विवाहाचा आणि या गोष्टीचा उल्लेख करतात की विश्वासणार्यांनी विवाहसंबंधात कसे वागावे. असा एक परिच्छेद आहे इफिसकरांस पत्र 5:22-33. ह्या परिच्छेदाचा अभ्यास केल्यास वैवाहिक जीवन कसे असावे या संबंधी बायबल काय म्हणते याविषयी काही मुख्य सत्ये प्राप्त होतात.

इफिसकरांस पत्र 5, यात बायबल म्हणते की, यशस्वी वैवाहिक जीवनात पती व पत्नी दोघेही काही निश्चित भूमिका पार पाडतात : "पत्नींनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचें मस्तक आहे, तसा पति पत्नीचें मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे" (इफिसकरांस पत्र 5:22-33). "पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीही आपआपल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले" (इफिसकरांस पत्र 5:25). "त्याचप्रमाणे पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करितो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करितो तसे तो करितो" (इफिसकरांस पत्र 5:28-29). "ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील" (इफिसकरांस पत्र 5:31).

जेव्हा विश्वासणारा पती व विश्वासणारी पत्नी बायबलमधील वैवाहिक जीवनाच्या देवाच्या सिद्धांतांची स्थापना करतात, तेव्हा त्याचा परिणाम मजबूत, आरोग्यवान वैवाहिक जीवनात होतो. बायबलवर आधारलेला विवाह ख्रिस्ताला एकत्रपणे पुरुषाचे व स्त्रीचे मस्तक ठरवितो. विवाहासंबंधीच्या बायबलच्या संकल्पनेत पती व पत्नीतील ऐक्याचा समावेश आहे जी ख्रिस्ताचे त्याच्या मंडळीशी असलेल्या ऐक्याचे चित्र मांडते.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

विवाहाविषयी बायबल काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries