settings icon
share icon
प्रश्नः

एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने काय करावे जर तिचे किंवा त्याचे लग्न अविश्वासू व्यक्ती बरोबर झाले?

उत्तरः


अविश्वासू व्यक्ती बरोबर लग्न होणे हे ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील सर्वात अवघड आव्हान असू शकते. लग्न हा एक पवित्र करार आहे जो दोन लोकांना एका देहामध्ये जोडतो (मत्तय 19:5). एका विश्वासुला आणि एका अविश्वासुला शांततेत ऐक्यामध्ये राहणे हे अतिशय अवघड असू शकते (2 करिंथ 6:14-15). जर लग्नानंतर एक जोडीदार ख्रिस्ती बनला तर, दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहण्याचा अंतर्गत संघर्ष लगेचच स्पष्ट होतो.

अशा परिस्थितीमध्ये असणारे ख्रिस्ती लाग्नामधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात, कारण त्यांची अशी खात्री असते की हाच एकमेव मार्ग आहे ज्याने ते खरोखर देवाला सन्मान देतील. तथापि, त्याचे वचन, याच्या विपरीत सांगते. आपल्या परिस्थितीत समाधानी राहणे इतकेच नव्हे तर अशा आव्हानात्मक परिस्थितीमधून त्याचे गौरव होईल याचे मार्ग शोधणे देखील अतिशय महत्वाचे आहे (1 करिंथ 7:17). 1 करिंथ 7:12-14 मध्ये पवित्र शास्त्र अशा लोकांना संबोधित करते ज्यांनी अविश्वासू व्यक्तीबरोबर लग्न केले आहे: “...जर कोणाएका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर असली आणि ती त्याच्याजवळ नांदावयास राजी असली तर त्याने तिला सोडू नये. आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर असून तिच्याजवळ राहावयास राजी असेल त्याला तिने सोडू नये. कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे...”

ख्रिस्ती लोक ज्यांनी अविश्वासू व्यक्ती बरोबर लग्न केले आहे त्यांनी ख्रिस्ताचा उघडपणे स्वीकार करता यावा आणि देवाच्या उपस्थितीच्या प्रकाशात जीवन जगता यावे त्यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना सक्षम करावे अशी प्रार्थना करणे गरजेचे आहे (1 योहान 1:7). त्यांनी त्यांचे हृदय परिवर्तन करण्यासाठी आणि पवित्र आत्म्याची फळे उत्पन्न करण्यासाठी देवाच्या कायापालट करणाऱ्या सामर्थ्याचा शोध घेतला पाहिजे (गलती 5:22-23). एका ख्रिस्ती पत्नीकडे तिच्या अविश्वासू पतीच्या प्रती सुद्धा नम्र हृदय असणे अत्यंत आवश्यक आहे (1 पेत्र 3:1), आणि तिने देवाच्या जवळ राहणे आणि असे करण्यासाठी त्याच्या कृपेवर अवलंबून असणे गरजेचे आहे.

ख्रिस्ती लोक एकाकी जीवन जगण्यासाठी नाहीत; त्यांनी बाहेरील स्त्रोतांकडून जसे की मंडळी आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारे समूह यांच्याकडून सहाय्यता मिळवणे गरजेचे आहे. एका अविश्वासू व्यक्तीबरोबर लग्न केल्यामुळे नात्यातील पवित्रतेमध्ये कोणताही बदल होत नाही, म्हणून प्रत्येक ख्रिती व्यक्तीची तिच्या किंवा त्याच्या जोडीदारासाठी प्रार्थना करून आणि ख्रिस्ताच्या प्रकाशाला अधिक तेजोमय रीतीने चमकू देऊन एक उत्तम उदाहरण स्थापित करणे ही प्राथमिकता असली पाहिजे (फिलीप्पैं 2:14). कदाचित सत्य 1 पेत्र 3:1 मध्ये सापडेल—हेच की अविश्वासू जोडीदाराला “जिंकता येते”—हे प्रत्येक ख्रिस्तीचे ध्येय आणि आशा असू दे ज्यांनी अविश्वासू बरोबर लग्न केले आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने काय करावे जर तिचे किंवा त्याचे लग्न अविश्वासू व्यक्ती बरोबर झाले?
© Copyright Got Questions Ministries