settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती व्यक्तीचे गैरख्रिस्ती व्यक्तीसोबत डेटिंग करणे अथवा लग्न करणे योग्य आहे का?

उत्तरः


ख्रिस्ती व्यक्तीसाठी, गैरख्रिस्ती व्यक्तीशी डेटिंग करणे बुद्धीचे नाही, आणि त्याच्याशी विवाह करणे हा पर्याय नाही. करिंथकरांस 2 रे पत्र 6:14 (के.जे.वी.) आम्हास सांगते की आम्ही विश्वास न धरणार्‍याशी "संबंध जोडून विजोड" होऊ नये. येथे चित्र दोन विजोड बैलांचे आहे ज्यांस एकाच जोखडास गुंतण्यात आले आहे. ओझे वाहण्यासाठी एकत्र मिळून काम करण्याऐवजी, ते दोघे एकमेकांविरुद्ध काम करतील. हा परिच्छेद विशिष्टरित्या विवाहाचा उल्लेख करीत नसला, तरीही त्यात निश्चितपणे विवाहाचे अर्थ आहे. हा परिच्छेद पुढे म्हणतो की ख्रिस्ताची बलियाराशी (सैतानाशी) एकवाक्यता होणे शक्य नाही. वैवाहिक जीवनात ख्रिस्ती आणि गैरख्रिस्ती व्यक्तीची आध्यात्मिक एकवाक्यता होऊ शकत नाही. पौल विश्वासणार्यांस या गोष्टीचे स्मरण करून देतो की ते पवित्र आत्म्याचे मंदिर आहेत, जो तारणाच्या वेळी त्यांच्या अंतःकरणात येऊन वास करतो (करिंथकरांस 2 रे पत्र 6:15-17). त्यामुळे, त्यांस जगापासून वेगळे व्हावयाचे आहे — जगात, पण जगाचे नाही — आणि जीवनाच्या अत्यंत घनिष्ट संबंधापेक्षा — विवाहापेक्षा हे कोठेही आणखी अधिक महत्वाचे नाही.

बायबल हे देखील म्हणते, "फसूं नका : 'कुसंगतीने नीति बिघडते'" (करिंथकरांस 1 ले पत्र 15:33). अविश्वासणार्यासोबत कुठलेही घनिष्ट नाते लगेच अशा गोष्टी बदलू शकते जे ख्रिस्तासोबतच्या आपल्या जीवनात अडखळण ठरू शकते. आम्हाला हरविलेल्यांस सुवार्ता सांगण्यास पाचारण करण्यात आले आहे, त्यांच्याशी घनिष्ट संबंध स्थापन करण्यास नाही. अविश्वासणार्यांसोबत चांगली मैत्री स्थापन करण्यात काहीही चुकीचे नाही, पण त्यास मर्यादा असली पाहिजे. जर आपण अविश्वासू व्यक्तीसोबत डेटिंगवर जात असाल, तर आपले प्राधान्य. प्रामाणिकपणे कोणत्या गोष्टीस असेल, प्रेमाराधनास अथवा ख्रिस्तासाठी आत्मे जिंकण्यास? जर आपला विवाह अविश्वासू व्यक्तीसोबत झाला, तर आपण दोघे आपल्या वैवाहिक जीवनात आध्यात्मिक घनिष्टता कशी स्थापन करू शकता? जर आपण विश्वातील सर्वात महत्वाच्या विषयासंबंधी — प्रभु येशू ख्रिस्ताविषयी असहमत असाल, तर आपण उत्तम विवाहाची उभारणी आणि रक्षण कसे करू शकाल?

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती व्यक्तीचे गैरख्रिस्ती व्यक्तीसोबत डेटिंग करणे अथवा लग्न करणे योग्य आहे का?
© Copyright Got Questions Ministries