settings icon
share icon
प्रश्नः

देव आजही चमत्कार करतो का?

उत्तरः


पुष्कळ लोकांची इच्छा असते की परमेश्वराने त्यांच्यासाठी स्वतःला “सिद्ध करण्यासाठी” म्हणून चमत्कार करावे. “जर देव चमत्कार, चिन्ह किंवा अद्भुत कृत्य करीत असेल तरच मी विश्वास ठेवणार!” या कल्पनेचे शास्त्रवचनांद्वारे खंडन करण्यात आले आहे. जेव्हा देवाने इस्राएली लोकांसाठी अदभुत व सामर्थी चमत्कार केले तेव्हा त्यामुळे त्यांनी त्याचे ऐकले काय? नाही, सर्व चमत्कार पाहिले तरीसुद्धा इस्राएली लोकांनी सतत आज्ञा मोडली आणि देवाविरुद्ध बंड केले. ज्या लोकांनी देवाला लाल समुद्र विभागतांना पाहिले तेच लोक नंतर कराराच्या देशातील रहिवाशांवर विजय मिळवण्यास देव सक्षम आहे की नाही याबद्दल शंका घेत होते. हे सत्य लूक 16:19-31 मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या कथेत नरकातील एक मनुष्य अब्राहमाला आपल्या भावांना सावध करण्यासाठी लाजराला मेलेल्यातून परत पाठवायला सांगतो. अब्राहामाने त्या माणसाला सांगितले, “जर त्यांनी मोशे व संदेष्ट्यांचे ऐकले नाही, तर मेलेल्यातून उठला तरी त्यांची खात्री पटणार नाही” (लूक 16:31).

येशूने असंख्य चमत्कार केले, तरीही अनेक लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याने पूर्वी केलेल्या चमत्कारांप्रमाणे जर आज देवाने चमत्कार केले तर त्याचा परिणामही तसाच होईल. लोक थक्क होतील आणि थोड्या काळासाठी देवावर विश्वास ठेवतील. हा विश्वास उथळ होईल आणि काहीतरी अनपेक्षित किंवा भयानक घडले की तो अदृश्य होईल. चमत्कारांवर आधारित विश्वास हा परिपक्व विश्वास नाही. आपल्या पापांसाठी वधस्तंभावर मरण्यासाठी मनुष्य म्हणून येशू ख्रिस्त या नात्याने पृथ्वीवर येणे हा या काळचा सर्वात मोठा चमत्कार परमेश्वराने केला (रोम 5:8) जेणेकरून आपले तारण व्हावे (योहान 3:16). देव अजूनही चमत्कार करतो - त्यापैकी अनेकांकडे कोणाचेही लक्ष नसते किंवा त्यांचा नाकार केला जातो. तथापि, आम्हाला आणखी चमत्कारांची आवश्यकता नाही. आपल्याला जे आवश्यक आहे ते म्हणजे येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तारणाच्या चमत्कारावर विश्वास ठेवणे.

चमत्कारांचा उद्देश चमत्कार करणाऱ्यास प्रमाणित करणे असतो. प्रेषितांची कृत्ये 2:2 जाहीर करते, “तेव्हा अकस्मात मोठ्या वार्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले.” प्रेषितांविषयी सुद्धा हेच म्हटले जाते, “चिन्हे, अद्भुते व महत्कृत्ये ह्यांच्या योगे तुमच्यामध्ये प्रेषिताने करायची चिन्हे पूर्ण धीराने करून दाखवण्यात आली.“ (2 करिंथ 12:12). सुवार्तेविषयी बोलताना, इब्री 2:4 घोषित करते, “त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली.” आपल्याकडे आता येशूचे सत्य शास्त्रात लिहिलेले आहे. आपल्याकडे आता पवित्र शास्त्रात प्रेषितांचे लिखाण आहे. पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे येशू व त्याचे प्रेषित हे आपल्या विश्वासाचा कोनशिला व पाया आहेत (इफिस 2:20). या अर्थाने, यापुढे चमत्कार करण्याची आवश्यकता नाही, कारण येशू आणि त्याच्या प्रेषितांचा संदेश यापूर्वीच शास्त्रवचनांमध्ये सत्यापित झाला आहे आणि अचूकपणे लिहिला गेला आहे. होय, देव अजूनही चमत्कार करतो. त्याचवेळी, आपण बायबलच्या काळात जसे चमत्कार घडत होते तसे घडण्याची अपेक्षा करता कामा नये.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देव आजही चमत्कार करतो का?
© Copyright Got Questions Ministries