प्रश्नः
एकेश्वरवाद सिद्ध करता येतो का?
उत्तरः
“एकेश्वरवाद” हा शब्द “मोनो” म्हणजे “एकटा” आणि “ईश्वरवाद” म्हणजे “देवावर विश्वास” या दोन शब्दांपासून आला आहे. विशेषतः, एकेश्वरवाद म्हणजे एका खऱ्या देवावर विश्वास ठेवणे, जो सर्व सृष्टीचा एकमेव निर्माता, सांभाळणारा आणि न्यायाधीश आहे. एकेश्वरवाद हा “अनेक देवांपैकी एक” या वादापेक्षा भिन्न आहे, जो एकापेक्षा जास्त देवतांवर विश्वास आहे ज्यात एक देव इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. हा बहुदैवत्वाच्या विपरीत आहे, जे एकापेक्षा जास्त देवांच्या अस्तित्वावर विश्वास आहे.
एकेश्वरवादासाठी अनेक युक्तिवाद आहेत, ज्यात विशेष प्रकटीकरण (पवित्र शास्त्र), नैसर्गिक प्रकटीकरण (तत्वज्ञान) तसेच ऐतिहासिक मानववंशशास्त्र यांचा समावेश आहे. हे केवळ खाली थोडक्यात स्पष्ट केले जाईल, आणि ही कोणत्याही प्रकारे पूर्ण यादी मानली जाऊ नये.
एकेश्वरवादासाठी बायबलमधील युक्तिवाद - अनुवाद 4:35 “परमेश्वरच देव आहे व त्याच्याशिवाय दुसरा नाही असे तुला कळावे म्हणून हे तुला दाखवण्यात आले.” अनुवाद 6:4, “हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे.” मलाखी 2:10अ, “आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय? एकाच देवाने आम्हांला उत्पन्न केले नाही काय?” 1 करिंथ 8:6, “तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोतय आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहोत.” इफिस 4:6, “सर्वांवर आणि सर्वांमधून आणि तुम्हा सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.” 1 तीमथ्य 2:5, “कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.” याकोब 2:19, “एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोसय भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.”
अर्थात, अनेक लोकांसाठी, सर्वप्रथम बायबल म्हणते म्हणून फक्त एकच देव आहे असे म्हणणे पुरेसे नाही. याचे कारण बायबल हे त्याचे शब्द आहेत हे सिद्ध करण्याचा देवाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. तथापि, एखादा असा तर्क करू शकतो की बायबलमध्ये सर्वात विश्वसनीय अलौकिक असा पुरावा आहे जो त्यातील शिकवणीची पुष्टी करतो, म्हणून या कारणांवर एकेश्वरवादाचे पुष्टीकरण केले जाऊ शकते. येशू ख्रिस्ताचा विश्वास आणि शिकवणुकीचा असाच एक तर्क असेल, ज्याने आपला चमत्कारिक जन्म, जीवन आणि पुनरुत्थानाच्या चमत्काराद्वारे तो देव आहे हे सिद्ध केले (किंवा कमीत कमी देवाने मान्य केले) देव खोटे बोलू शकत नाही किंवा त्याची फसवणूक होऊ शकत नाही. म्हणूनच, येशूचा जो विश्वास होता आणि तो जे शिकवीत असे ते सत्य होते. म्हणून, ज्या एकेश्वरवादावर येशूचा विश्वास होता आणि जे तो शिकवीत होता, तोे खरा आहे. पवित्र शास्त्र आणि ख्रिस्ताच्या अलौकिक पुष्टीकरणासाठी अपरिचित लोकांसाठी हा वाद फार प्रभावी नसेल, परंतु त्याच्या गुणाशी परिचित असलेल्या व्यक्तीसाठी ही सुरू करण्यासाठी चांगली जागा आहे.
एकेश्वरवादासाठी ऐतिहासिक युक्तिवाद - लोकप्रियतेवर आधारित तर्क अत्यंत संशयित आहे, परंतु जगातील धर्मांवर एकेश्वरवादाचा किती परिणाम झाला आहे हे मनोरंजक आहे. धार्मिक विकासाचा लोकप्रिय उत्क्रांती सिद्धांत सर्वसाधारणपणे वास्तविकतेच्या उत्क्रांतिवादी दृष्टीकोनातून, आणि उत्क्रांती मानववंशशास्त्राच्या पूर्वकल्पनेतून उद्भवतो जो “आदिम” संस्कृतींना धार्मिक विकासाच्या पूर्वीच्या टप्प्यांचे प्रतिनिधित्व करणारे म्हणून पाहतेे. परंतु या उत्क्रांती सिद्धांतातील समस्या अनेक आहेत. 1) ज्या प्रकारच्या विकासाचे त्यात वर्णन केले आहे ते कधीच पाहण्यात आलेले नाही; खरे तर, कोणत्याही संस्कृतीत एकेश्वरवादाकडे उन्नत विकास होताना दिसत नाही - खरे तर उलट परिस्थिती दिसते. २) मानववंशविज्ञानविषयक पद्धतीची “आदिम” व्याख्या तंत्रज्ञानाच्या विकासास बरोबरीची आहे, परंतु दिलेल्या संस्कृतीत बरेच घटक असल्यामुळे हा समाधानकारक निकष नाही. 3) तथाकथित टप्पे बहुतेक वेळेस गहाळ किंवा वगळलेले असतात. 4) अखेरीस, बहुसंख्य संस्कृती त्यांच्या विकासात आरंभीच एकेश्वरवादाचे अवशेष दर्शवितात.
आपल्याला असे दिसून येते की एकेश्वरवादी देव आहे जो वैयक्तिक, पुरुष, स्वर्गात राहणारा आहे, ज्याला उत्तम ज्ञान आणि सामर्थ्य आहे, ज्याने जग निर्माण केले आहे, तो नैतिकतेचा कर्ता आहे ज्यास आपण जबाबदार आहोत आणि ज्याची आज्ञा आपण मोडली आहे आणि अशा प्रकारे आपण त्यापासून दूर गेलो आहोत, परंतु ज्याने समेटाचा मार्ग प्रदान केला आहे. अक्षरशः प्रत्येक धर्म बहुदेवतेच्या अनागोंदीत जाण्याआधी त्याच्या भूतकाळात कधीतरी देवाच्या या स्वरूपाविषयी सांगतो. अशाप्रकारे असे दिसते की बहुतेक धर्मांनी एकेश्वरवादाने सुरूवात केली आहे आणि बहुदेववाद, जीववाद आणि जादूटोण्याकडे “वळले“ आहेत - उलट नाही. (इस्लाम हे एक क्वचितच उदाहरण आहे, जो एकेश्वरवादाकडे वळला). अनेक बहुदेववादी धर्म या चळवळीसह कार्यशीलतेच्या दृष्टीने पाहता एकेश्वरवादी होते किंवा अनेक देवांपैकी एकास कुलदैवत मानून उपासना करीत होते. हा एक दुर्मिळ बहुदेववादी धर्म आहे जो आपल्यातील एका देवताला इतरांवर सार्वभौम मानत नाही आणि साधारण देव केवळ मध्यस्थ म्हणून कार्य करतात.
एकेश्वरवादावर तात्विक/धर्मसैद्धान्तिक युक्तिवाद - एकापेक्षा जास्त देव अस्तित्वात आहेत याच्या अशक्यतेविषयी बरेच तात्विक तर्क आहेत. यातील अनेक गोष्टी वास्तवाच्या स्वरूपाच्या संदर्भात एखाद्याच्या आधिभौतिक स्थितीवर खूप अवलंबून आहेत. दुर्दैवाने, यासारख्या लहानशा लेखात या मूलभूत तत्वज्ञानविषयक मतावर युक्तिवाद करणे आणि नंतर एकेश्वरवादाबद्दल ते काय सांगतात हे दर्शविणे अशक्य आहे, परंतु हे सत्य आहे की हजारो वर्षापूर्वीच्या या सत्यांबद्दल दृढ तात्विक व धर्मसैद्धान्तिक कारणे आहेत. (आणि ते स्वतः प्रमाणित आहेत). थोडक्यात, मग, अन्वेषण करण्यासाठी निवडू शकतात असे तीन तर्क येथे आहेतः
१. जर एकापेक्षा जास्त देव असते, तर एकाधिक निर्मात्यांमुळे आणि अधिकाऱ्यामुळे हे विश्व विस्कळीत झाले असते, परंतु ते विस्कळीत नाही म्हणून, फक्त एकच देव आहे.
२. देव पूर्णपणे परिपूर्ण प्राणी असल्यामुळे, दुसरा देव असू शकत नाही कारण त्यांच्यात काहीतरी फरक असता आणि परिपूर्णतेपेक्षा भिन्न असणे म्हणजे परिपूर्णपेक्षा कमी असणे आणि देव नसणे आहे.
3. देवाचे अस्तित्व अनंत आहे, म्हणून त्याचे भाग असू शकत नाहीत (भाग अनंतत्वात पोहोचण्यासाठी जोडले जाऊ शकत नाहीत). जर देवाचे अस्तित्व केवळ त्याचा एक भाग नसेल (जे अस्तित्त्वात असू शकते किंवा नसू शकते अशा सर्व गोष्टींसाठी आहे) तर त्याचे अनंत अस्तित्व असले पाहिजे. म्हणूनच, दोन अनंत प्राणी असू शकत नाहीत, कारण एकाने दुसर््यापेक्षा भिन्न असला पाहिजे.
एखाद्याला असा युक्तिवाद करायचा आहे की यापैकी बर्याच जणांनी “देवांचा” उप-वर्ग काढून टाकला नाही आणि ते ठीक आहे. जरी हे आपल्याला बायबलदृष्ट्या चुकीचे आहे हे माहित असले, तरी त्यामध्ये सिद्धांतात काहीही चुकीचे नाही. दुसर््या शब्दांत, देव “देवता” असा उप-वर्ग तयार करू शकला असता, परंतु तो तसे करत नाही. जर त्याने असे केले असते, तर हे “देव” केवळ मर्यादित, निर्मित वस्तू असत्या - बहुदा देवदूतांसारखेच (स्तोत्र 82). यामुळे एकेश्वरवादास हानि होत नाही, याचा असा अर्थ नाही की इतर कोणी आत्मिक प्राणी असू शकत नाहीत - फक्त असे की एकापेक्षा जास्त देव असू शकत नाहीत.
English
एकेश्वरवाद सिद्ध करता येतो का?