settings icon
share icon
प्रश्नः

आपण जुन्या कराराचा अभ्यास का केला पाहिजे?

उत्तरः


जुना कराराचा अभ्यास करण्याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे, जुना करार नवीन करारात आढळणार्या शिकवणी व घटनांचा पाया घालतो. बायबल एक प्रगतिशील प्रकटीकरण आहे. जर आपण कोणत्याही चांगल्या पुस्तकाचा पूर्वार्ध वगळला आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर आपणास पात्र, कथानक आणि शेवट समजण्यास कठीण जाईल. त्याचप्रकारे, नवीन करार हा केवळ तेव्हाच पूर्णपणे समजता येईल जेव्हा आपण घटना, पात्रे, नियम, बलिदान प्रणाली, करार आणि जुन्या करारााची अभिवचने यांचा पाया पाहतो.

जर आमच्याकडे फक्त नवीन करार असता तर आपण शुभवर्तमान वाचावयास घेतले असते आणि यहूदी लोक मशीहाची (तारणारा राजा) का वाट पाहत आहेत हे आपल्याला कळले नसते. हा मशीहा का येत आहे हे आम्हाला समजू शकले नसते (यशया 53 पहा), आणि त्याच्याविषयी करण्यात आलेल्या अनेक सविस्तर भविष्यवाण्यांद्वारे नासरेथच्या येशूला मशीहा म्हणून ओळखता आले नसते ख्उदा. त्याचे जन्मस्थान (मीखा ं5:2), त्याची मृत्यूची पद्धत (स्तोत्र 22, विशेषतः वचन 1, 7 आणि 8, 14 आणि 18; 69:21), त्याचे पुनरुत्थान (स्तोत्र 16:10), आणि त्याच्या सेवेचे बरेच तपशील (यशया 9:2; 52:13),.

नवीन करारात सहज उल्लेख केलेल्या यहूदी प्रथा समजून घेण्यासाठी देखील जुन्या कराराचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. परुश्यांनी आपली स्वतःच्या परंपरेची भर घालून देवाचे नियमशास्त्र कसे विकृत केले होते, किंवा मंदिराचे अंगण स्वच्छ करीत असताना येशू इतका का अस्वस्थ झाला, किंवा आपल्या शत्रूंना अनेक उत्तर देत असतांना येशू ज्या वचनांचा वापर करीत असे ते कोठून आले होते ते आम्हाला समजणार नाही.

जुन्या करारात असंख्य तपशीलवार भविष्यवाण्या नोंदवल्या गेल्या आहेत ज्या केवळ तेव्हाच पूर्ण झाल्या असत्या जर बायबल मनुष्याचा शब्द नसून देवाचा शब्द होता (उदा. दानीएल 7 आणि पुढील अध्याय). दानीएलच्या भविष्यवाण्या राष्ट्रांचा उदय आणि पतनावषयी विशिष्ट तपशील देतात. या भविष्यवाण्या इतक्या अचूक आहेत की, खरे तर, नास्तिक लोक विश्वास ठेवण्याची निवड करतात की ते त्या घटनेनंतर लिहिल्या गेल्या आहेत.

आपण जुन्या कराराचा अभ्यास केला पाहिजे कारण त्यात आपल्यासाठी असंख्य धडे आहेत. जुन्या कराराच्या पात्रांच्या जीवनाचे निरीक्षण करून आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनासाठी मार्गदर्शन मिळते. आम्हाला देवावर विश्वास ठेवण्यास सांगण्यात आले आहे (दानीएल 3). आपण आपल्या विश्वासांत दृढपणे उभे राहण्यास (दानीएल 1) आणि विश्वासूपणाच्या प्रतिफळाची वाट पाहण्यास शिकतो (दानीएल 6) आपण इतरांस दोष देण्याऐवजी लवकर आणि प्रामाणिकपणे पाप कबूल करणे चांगले आहे हे शिकतो (1 शमुवेल 15). आम्ही शिकतो की आपण पापाशी खेळता कामा नये, कारण ते आपल्याला शोधून काढेल (शास्ते 13; 16). आम्ही शिकतो की आपल्या पापाचा परिणाम फक्त आपल्यासाठीच नाही तर आपल्या प्रियजनांसाठी सुद्धा होतो (उत्पत्ति 3)) आणि याउलट, आपल्या चांगल्या वागणुकींचेही आपल्यासाठी आणि आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी प्रतिफळ आहे (निर्गम 20:5,6).

जुन्या कराराचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला भविष्यवाणी समजण्यास मदत होते. जुन्या करारामध्ये देव यहूदी राष्ट्रासाठी अजून पूर्ण करेल अशी अभिवचने आहेत. जुना करार यातनाची दीर्घ काळ, ख्रिस्ताच्या भावी 1,000 वर्षाच्या शासनकाळाद्वारे यहूद्यांस दिलेल्या आपल्या अभिवचनांची पूर्तता कशी होते आणि बायबलची समाप्ती काळाच्या सुरुवातीस न उलगडल्या गेलेल्या गोष्टी कशा उघडकीस आणते ते प्रकट करते.

सारांश रूपात, जुना करार आम्हाला परमेश्वरावर प्रेम कसे करावे आणि त्याची सेवा कशी करावी हे शिकण्याची संधी देते आणि हे देवाच्या चरित्राबद्दल अधिक प्रकट करते. हे पवित्र पुस्तकांमध्ये बायबलमध्ये अद्वितीय का आहे याची वारंवार पूर्तता केलेल्या भविष्यवाणीद्वारे दिसून येते; केवळ तेच असे म्हणण्यास सक्षम आहे की जे दावा ते करते तसे ते आहे: देवाचे परमेश्वर निर्मित वचन. थोडक्यात, जर आपण अद्याप जुन्या कराराच्या पृष्ठांवर लक्ष दिले नसेल, तर देवाने तुमच्यासाठी जे काही उपलब्ध केले आहे त्यास आपण मुकत आहा.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आपण जुन्या कराराचा अभ्यास का केला पाहिजे?
© Copyright Got Questions Ministries