प्रश्नः
लग्नामध्ये एकदेह होण्याचा काय अर्थ आहे?
उत्तरः
“एकदेह” ही संज्ञा हव्वाच्या निर्मितीच्या वेळी उत्पत्ती मधून आली. उत्पत्ती 2:21-24 एका प्रक्रियेचे वर्णन करते ज्यामध्ये देवाने आदम झोपला असताना त्याची फासळी काढून त्यापासून हव्वाची निर्मिती केली. आदमने ओळखले की हव्वा ही त्याचाच भाग होती—वस्तुस्थितीमध्ये ते “एकदेह” होते. “एकदेह” या संज्ञेचा अर्थ जसे आपले शरीर एक संपूर्ण अस्तित्व आहे ज्याला तुकड्यांमध्ये विभागता येत नाही आणि तरीही संपूर्ण असते, म्हणून लग्नाच्या नात्यात सुद्धा ते तसेच असावे असा देवाचा उद्देश होता. आता इथून पुढे दोन अस्तित्व नसणार (दोन व्यक्ती), परंतु आता ते एक अस्तित्व (लग्न झालेले जोडपे) आहेत. या नवीन ऐक्याचे असंख्य पैलू आहेत.
जोपर्यंत भावनिक ओढीचा संबंध आहे, नवीन एकक सर्व जुण्या आणि भविष्यातील नात्यांमध्ये श्रेष्ठत्व घेते (उत्पत्ती 2:24). लग्न झालेले काही जोडीदार नवीन जोडीदारापेक्षा त्यांच्या पालकांच्या संबंधांवर अधिक जोर देणे सुरु ठेवतात. ही लग्नातील अनर्थाची कृती आहे आणि “सोडणे आणि जडून राहणे” या देवाच्या मूळ उद्देशाच्या विपरीत आहे. अशीच समान समस्या विकसित होते, जेंव्हा एक जोडीदार त्याच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराकडे जाण्याऐवजी मुलांकडे ओढला जातो.
भावनिकदृष्ट्या, आत्मिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, आणि इतर सर्व मार्गाने जोडप्याला एक व्हायचे आहे. अगदी जसे शरीराचा एक अवयव शरीराच्या दुसऱ्या अवयवांची काळजी घेतो (पोट शरीरासाठी अन्नाचे पचन करते, मेंदू संपूर्ण चांगल्यासाठी शरीराचे मार्गदर्शन करतो, हात शरीराच्या फायद्यासाठी काम करतात , इत्यादी), तसेच लग्न झालेल्या प्रत्येक जोडीदाराने दुसऱ्या जोडीदाराची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक जोडीदाराने कमावलेल्या पैश्याला “स्वतःचे” पैसे म्हणून नाही; तर “आपले” पैसे म्हणून बघितले पाहिजे. इफिस 5:22-23 आणि नीतिसुत्रे 31:10-31 हे अनुक्रमे पतीच्या आणि पत्नीच्या “ऐक्याच्या” भूमिकेच्या उपयोजानांना देतात.
शारीरिकदृष्ट्या, ते एकदेह होतात, आणि त्या एकदेहाचा परिणाम त्यांच्या मुलांमध्ये पाहवयास मिळतो, जे त्यांच्या ऐक्याने निर्माण होतात; आता ही मुले विशिष्ठ करून त्यांच्या ऐक्याचा विशेष अनुवांशिक शृंगार धारण करतात. अगदी त्यांच्या नात्यातील लैंगिक पैलूंमध्ये, पती आणि पत्नीने त्याच्या शरीराला त्यांचे स्वतःचे न समजता ते त्याच्या जोडीदाराचे आहे असे समजले पाहिजे (1 करिंथ 7:3-5). तसेच त्यांनी स्वतःच्याच आनंदाकडे लक्ष नाही दिले पाहिजे, परंतु त्यांच्या जोडीदाराला आनंद देण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
हा एकोपा आणि एकमेकांना फायदा करून देण्याची इच्छा ही मनुष्य पापामध्ये पडल्यापासून आपोआप येत नाही. उत्पत्ती 2:24 (KJV) मध्ये पुरुषाला त्याच्या पत्नीशी “जडून राहण्यास” सांगितले होते. या शब्दाच्या मागे दोन संकल्पना आहेत. एक त्याच्या पत्नीला “चिकटून” राहणे, हे एक चित्र जे दर्शविते की लग्नाचे बंधन किती मजबूत आहे. दुसरा पैलू म्हणजे पत्नी “झाल्यनंतर कठोर पाठपुरावा करणे” हा आहे. हे “झाल्यानंतर कठोर पाठपुरावा करणे” हे विवाहबाह्यच्या पलीकडले आहे आणि ते विवाहाकडे घेऊन जाते, आणि ते विवाह असेपर्यंत सुरु राहते. शारीरिक कल हा जोडीदारासाठी चांगले काय आहे ते समजून करण्याऐवजी “जे मला चांगले वाटते ते करण्याकडे” असतो. आणि एकदा का “मधुचंद्राचा काळ संपला” की या आत्म-केंद्रीपणाच्या चाकोरीमध्ये सामान्यपणे लग्न अडकतात. प्रत्येक जोडीदाराने त्यांच्या गरजा कश्या पूर्ण होत नाहीत याकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांच्या जोडीदाराच्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
दोन लोकांनी एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी एकत्रित राहणे जितके छान आहे, तितकेच छान देवाकडे लग्नासाठी उच्च बोलावणे आहे. जरी ते लग्नाआधी त्यांच्या व्ययक्तिक जीवनातून ख्रिस्ताची सेवा करत होते (रोम 12:1-2), आता एक एकक म्हणून त्यांना ख्रिस्ताची सेवा करायची आहे आणि त्यांच्या मुलांना देवाची सेवा करण्याकरिता वाढवायचे आहे (1 करिंथ 7:29-34; मलाखी 2:15; इफिस 6:4). प्रेषित 18 मधील प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला हे याचे चांगले उदाहरण असू शकतात. एक जोडपे म्हणून जेंव्हा एखादे जोडपे ख्रिस्ताची सेवा एकत्रिपणे चालू ठेवतात, तेंव्हा आनंद जो आत्मा देतो तो त्यांच्या लग्नाला भरून टाकतो (गलती 5:22-23). एदेन बागेमध्ये, तेथे तीनजण उपस्थित होते (आदम, हव्वा, आणि देव), आणि तेथे आनंद होता. म्हणून, जर आज लग्नाच्या केंद्रस्थानी देव असेल तर तेथे आनंद सुद्धा असतो. देवाशिवाय, खरा आणि संपूर्ण एकोपा शक्य नाही.
English
लग्नामध्ये एकदेह होण्याचा काय अर्थ आहे?