प्रश्नः
पोस्टमिलिनेलिझम” काय आहे?
उत्तरः
पोस्टमिलिनेलिझम हे प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 20 व्या अधिकाराचे स्पष्टीकरण आहे ज्यामध्ये ख्रिस्ताचे दुसरे आगमन जे सहस्त्रावधी अर्थात “मिलेनिअम” वर्षानंतर येत आहे, हा ख्रिस्ती लोकांचा समृद्धी आणि वर्चस्वाचा सोनेरी काळ किंवा सोनेरी युग आहे. या शब्दामध्ये शेवटल्या काळासंबंधी अनेक समान दृश्ये आहेत आणि हे प्रीमिलिनेलिझम (ख्रिस्ताचे दुसरे आगमन त्याच्या सहस्त्रावधी वर्ष राज्याच्या अर्थात मिलेनिएल किन्गडम च्या अगोदर होईल आणि ते मिलेनिएल किन्गडम हे शाब्दिक 1000 वर्षांच्या कारकीर्दीचे दृश्य आहे) च्या विरुध्द आणि अमिलिनेलिझम (शाब्दिक सहस्त्रावधी अर्थात मिलेनियम नसलेले) पेक्षा कमी असेल.
पोस्टमिलिनेनिझलिझम चा असा विश्वास आहे की ख्रिस्त काही कालावधीनंतर परत येईल, पण हे शाब्दिक 1000 वर्षे नसतील. जे लोक या दृष्टिकोनाचे अनुसरण करतात ते अजून पूर्ण न झालेल्या भविष्यवाण्यांचा अर्थ साधारण शब्दशः घेत नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 20: 4-6 हि वचने शब्दशः घेऊ नयेत. त्यांचा असा विश्वास आहे की "1000 वर्षे" म्हणजे फक्त "दीर्घ काळ" असा होतो. शिवाय, "पोस्टमिलिनेनिलिझम" मधील उपसर्ग "पोस्ट -" हा ख्रिस्ती लोकांनी (ख्रिस्त स्वत: नाही) या पृथ्वीवर राज्य स्थापित केल्यानंतर ख्रीस्त परत येईल असा दृष्टिकोन दर्शवितो.
पोस्टमिलिनेनिझलिझम च्या धारणाचा असा विश्वास आहे कि हे जग उत्तरोत्तर उत्तम होत जाईल-संपूर्ण पुरावे याउलट आहेत- संपूर्ण जग अखेरीस "ख्रिस्तीकृत" होईल. असे झाल्यानंतर ख्रिस्ताचे आगमन होईल. तथापि, पवित्र शास्त्र अंतिम काळातील जगाचे चित्र याप्रकारे प्रस्तुत करीत नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकातून हे जाणणे सोपे आहे की भविष्यातील त्या काळात जग एक भयानक स्थान असेल. तसेच, पौलाने 2 तीमथ्याला पत्र 3:1-7 मध्ये शेवटल्या काळाचे वर्णन “भयानक वेळा” असे केले आहे.
पोस्टमिलिनेनिझलिझम वर विश्वास ठेवणारे लोक पूर्ण न झालेल्या भविष्यवाण्यांचा अर्थ लावण्यासाठी अशब्दशः स्पष्टीकरण पद्धतीचा वापर करतात आणि बहुतेक वेळेस भविष्यवाण्यांच्या परिच्छेदांचे रूपकात्मक अर्थ लावतात. याची अडचण अशी आहे कि, जर परिच्छेदाचा सामान्य अर्थ सोडला गेला तर त्याचा अर्थ पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ होऊ शकतो. शब्दाच्या अर्थासंदर्भातली सर्व वस्तुस्थिती हरवली जाते. जेव्हा शब्दांचा अर्थ गमावतो, संवाद संपुष्टात येतो. तथापि, अशाप्रकारे भाषा आणि संवाद असण्याची देवाची इच्छा नाही. देव आपल्या लिखित शब्दाद्वारे शब्दांपर्यंत वस्तुनिष्ठ अर्थ ठेवून आपल्याशी संपर्क साधतो, जेणेकरून कल्पना आणि विचार योग्य प्रकारे संवादित करता येतील.
पवित्र शास्त्राचा सामान्य सर्वसाधारण अर्थाची पद्धत पोस्टमिलिनेनिझलिझम ला नाकारून पूर्ण न झालेल्या भविष्यवाण्यांसह सर्व शास्त्रवचनांचा सामान्य अर्थ लावते. आपल्याकडे पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांची शेकडो उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, जुन्या करारात ख्रिस्ताविषयीच्या भविष्यवाण्यांचा विचार करा. त्या भविष्यवाण्या अक्षरशः शब्दशः पूर्ण झाल्या आहेत. कुमारीकेद्वारे ख्रिस्ताचा जन्म विचारात घ्या (यशया 7:14; मत्तय 1:23). आपल्या पापांसाठी त्याच्या मृत्यू विचारात घ्या (यशया 53:4-9; 1 पेत्राचे पत्र 2:24). या भविष्यवाण्या शब्दशः पूर्ण झाल्या आहेत, आणि आणि असे मानण्यास पुरेसे कारण आहे की देव भविष्यातही शब्दशः त्याची वचने पूर्ण करतील. पोस्टमिलिनेनिझलिझम यामध्ये अपयशी ठरते कारण त्यामध्ये पवित्र शास्त्रीय भविष्यवाण्यांचे व्यक्तिपरक स्पष्टीकरण केले जाते आणि असे म्हटले जाते की, सहस्त्रावधी राज्य अर्थात मिलेनिएल किन्गडम स्वतः ख्रीस्ताद्वारे स्थापित करण्यात येण्यात नसून सभेद्वारे ते स्थापित केले जाईल.
English
पोस्टमिलिनेलिझम” काय आहे?