प्रश्नः
येशूच्या नावात प्रार्थना करण्याचा अर्थ काय आहे?
उत्तरः
येशूच्या नावात प्रार्थना योहान 14:13-14 मध्ये शिकविण्यात आली आहे, "पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नांवानें मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नांवाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन." काही लोक ह्या वचनाचा चुकीचा उपयोग करतात, त्यांस असे वाटते की प्रार्थनेच्या शेवटी "येशूच्या नावात" असे म्हणण्याचा परिणाम जे काही मागितले आहे ते देव नेहमीच देतो असा होतो. हे मुख्यत्वेकरून "येशूच्या नावात" ह्या शब्दांचा उपयोग जादूचे सूत्र म्हणून करण्यासारखे आहे. हे पूर्णपणे पवित्र शास्त्राचा विपरीत आहे.
येशूच्या नावात प्रार्थना करणे म्हणजे त्याच्या अधिकारानिशी प्रार्थना करणे आणि देवपित्याजवळ आमच्या प्रार्थनांनुसार कार्य करण्याची विनंती करणे होय कारण आम्ही त्याचा पुत्र, येशू याच्या नावात येतो. येशूच्या नावात प्रार्थना करणे हे देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करण्यासारखे आहे. "त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जें धैर्य आहे : ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणें कांहीं मागितलें, तर तो आपलें ऐकेल. आणि आपण जें कांहीं मागतों — तें तो ऐकतो, हे — आपल्याला ठाऊक आहे" (योहानाचे 1 ले पत्र 5:14-15). येशूच्या नावात प्रार्थना करणे म्हणजे त्या गोष्टींसाठी प्रार्थना करणे होय ज्याद्वारे येशूला आदर व गौरव प्राप्त होईल.
प्रार्थनेच्या शेवटी "येशूच्या नावात" म्हणणे हे जादूचे सूत्र नव्हे. जर जे काही आम्ही मागतो अथवा प्रार्थनेमध्ये म्हणतो ते देवाच्या गौरवासाठी आणि त्याच्या इच्छेनुसार नसेल, तर "येशूच्या नावात" असे म्हणणे अर्थहीन होय. खरोखर येशूच्या नावात प्रार्थना करणे आणि त्याच्या गौरवासाठी प्रार्थना करणे हेच महत्वाचे आहे, प्रार्थनेचे शेवटी काही शब्द जोडणे नव्हे. प्रार्थनेतील शब्दांचे महत्व नाही, तर प्रार्थनेमागील हेतू महत्वाचा आहे. ज्या गोष्टी देवाच्या इच्छेस अनुरूप आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हा येशूच्या नावात प्रार्थना करण्याचा सार आहे.
English
येशूच्या नावात प्रार्थना करण्याचा अर्थ काय आहे?