प्रश्नः
निरंतर प्रार्थना करा याचा अर्थ काय होतो?
उत्तरः
पौलाची 1 थेस्सलनीका करांसपत्र 5:17 मधील “निरंतर प्रार्थना करा” ही आज्ञा गोंधळात टाकणारी आहे. अर्थातच, याचा अर्थ असा होत नाही की आपण संपूर्ण दिवस डोके वाकवून, डोळे बंद करून बसून राहिले पाहिजे. पौल निरंतर बोलण्याचा नाही, तर नेहमी देवाची जाणीव आणि देवाला समर्पित असण्याच्या वृत्तीची जाणीव असण्याचा संदर्भ देत आहे. जागे होण्याचा प्रत्येक क्षण हा या जागरूकतेसह जगला पाहिजे की देव आपल्याबरोबर आहे आणि तो आपल्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये सक्रीय सहभागी आहे.
जेंव्हा आपल्याला चिंता, भीती, निराशा, आणि राग यासारखे विचार येतात, तेंव्हा आपण जाणीवपूर्वक आणि लगेचच आपल्या विचारांना प्रार्थनेमध्ये आणि प्रत्येक प्रार्थनेला उपकाराच्या प्रार्थनेमध्ये बदलले पाहिजे. पौलाने फिलीप्पैंकरांस लिहिलेल्या पत्रामध्ये, तो आपल्याला चिंताक्रांत न होता त्याऐवजी, “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा” (फिलीप्पैकरांस पत्र 4:6) अशी आज्ञा देत आहे. कलस्सैमधील विश्वासणाऱ्यांना त्याने शिकवले की, “प्रार्थनेत तत्पर असा, आणि तिच्यात उपकारस्तुती करीत जागृत राहा” ((कलस्सैकरांस पत्र 4:2). पौल इफिसमधील विश्वासणाऱ्यांना आत्मिक युद्ध लढण्याचे एक हत्यार म्हणून प्रार्थनेकडे बघण्याची विनंती करतो (इफिसकरांस पत्र 6:18). जसा आपला दिवस जात असतो, त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक भयपद परिस्थितीमध्ये, प्रत्येक चिंताक्रांत विचारांमध्ये, आणि प्रत्येक अवांच्छित काम ज्याची देवाने आज्ञा केली आहे यामध्ये प्रार्थना ही आपला सर्वप्रथम प्रतिसाद असायला हवी. प्रार्थनेची कमी आपल्याला देवाच्या कृपेपेक्षा स्वतःवर अधिक अवलंबून राहण्यास कारणीभूत होईल. निरंतर प्रार्थना ही, एक सुगंधासारखी, आणि नेहमी पित्यावर अवलंबून आणि त्याच्याशी संवाद साधणे अशी आहे.
ख्रिस्ती लोकांसाठी, प्रार्थना ही श्वासोच्छवासासारखी असली पाहिजे. तुम्हाला श्वासोच्छवास करण्यासाठी विचार करावा लागत नाही, वातावरण तुमच्या फुफ्फुसांवर दबाव आणते आणि प्रामुख्याने तुम्हाला श्वासोच्छवास करण्यास भाग पडते. म्हणूनच श्वास रोखून धरणे हे श्वास घेण्यापेक्षा अधिक अवघड आहे. त्याचप्रमाणे, जेंव्हा आपला देवाच्या कुटुंबात जन्म होतो, आपण आत्मिक वातावरणामध्ये प्रवेश करतो जेथे देवाची उपस्थिती आणि देवाची कृपा आपल्या जीवनावर दबाव किंवा प्रभाव आणतात. प्रार्थना ही त्या दबावाला सामान्य प्रतिसाद आहे. एक विश्वासी म्हणून, आपण सर्वांनी दैवी वातावरणात प्रवेश केला आहे जिथे आपण प्रार्थनेचा श्वास घेतो.
दुर्दैवाने, बरेच विश्वासी त्यांचा “आत्मिक श्वास” दीर्घ काळापर्यंत असा विचार करून धरून ठेवतात की, देवाबरोबर घालवलेले काही क्षण जिवंत राहण्यासाठी पुरेसे आहेत. परंतु त्यांच्या अशा प्रतिबंधित आत्मिक सेवनाचा परिणाम पापमय इच्छा असा होतो. वस्तुस्थिती ही आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्याला पूर्णपणे कार्यान्वित राहण्यासाठी सतत देवाच्या उपस्थितीमध्ये आणि त्याच्या सत्यांना सतत श्वासाप्रमाणे घेत राहिले पाहिजे.
ख्रिस्ती लोकांसाठी देवाच्या दयेवर-अवलंबून असण्यापेक्षा- तिला गृहीत धरणे हे सोपे वाटते. अनेक विश्वासू भौतिक आशीर्वादाने समाधानी होतात आणि त्यांची आत्मिक इच्छा थोडकी असते. जेंव्हा कार्यक्रम, पद्धती, आणि पैश्याने जर प्रभावी परिणाम मिळत असतील, तर दैवी आशीर्वादाबरोबर मानवी यशाच्या प्रवृत्तीमध्ये गोंधळ असेल. जेंव्हा हे घडते, तेंव्हा देवासाठीची उत्कट इच्छा आणि त्याच्या मदतीसाठीची तळमळ नसेल. सतत, चिकाटीची, निरंतर प्रार्थना ही ख्रिस्ती जीवनाचा एक अत्यावश्यक भाग आहे आणि ती नम्रतेमधून वाहते आणि देवावर अवलंबून आहे.
English
निरंतर प्रार्थना करा याचा अर्थ काय होतो?