प्रश्नः
प्रार्थना चालणे म्हणजे काय? प्रार्थना चालीवर जाणे पवित्र शास्त्रीय आहे काय?
उत्तरः
प्रार्थना चाल हि एखाद्या ठिकाणावर प्रार्थना करण्याची रीत आहे ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन किंवा विशिष्ट ठिकाणा जवळून जाऊन मध्यस्थीची प्रार्थना केली जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे की एखाद्या जागेजवळ असल्यामुळे त्यांना “जवळून प्रार्थना स्पष्ट प्रार्थना” शक्य होते. प्रार्थना चाल हि वैयक्तिक, सामुहिक किंवा संपूर्ण सभेद्वारे केली जाते. त्याची लांबी गल्ली एवढी कमी तर मैलांएवढी जास्त असू शकते. यामध्ये पाहणे, ऐकणे, गंध, चव या पाच ज्ञानेंद्रियांचा वापर करण्याची कल्पना असून ती मध्यस्थीची प्रार्थना करणाऱ्यांना प्रार्थनेची गरज समजविण्यासाठी वापरली जाते.
उदाहरणार्थ, जर आपण प्रार्थना करण्याच्या गोष्टी शोधत आपल्या शेजारच्या दारावरून चाललो तर आपणाला कदाचित काही अस्वच्छ आणि घाणेरडे ठिकाण आढळू शकते. हे आपल्यास आतील रहिवाशांच्या शारीरिक आणि आत्मिक अशा दोन्ही आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची उत्कंठा देईल. काही समूह प्रार्थना चाल शाळेभोवती करतात, आतील शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता व शांती आणि त्यांच्या शाळेतील दुष्टाच्या योजनांना हाणून पाडण्यासाठी प्रार्थना करतात. काही लोकांना वाटते की ज्या लोकांसाठी आणि ठीकांनासाठी ते प्रार्थना करीत आहेत त्यांचा जवळ जाऊन प्रार्थना केल्यास त्यांची प्रार्थना जास्त निर्देशित आणि प्रभावशाली ठरू शकते.
प्रार्थना चाल ही तुलनेने नवीन घटना आहे, ज्याचे मूळ स्पष्ट झालेले नाही. पवित्र शास्त्राच्या काळात चालणे हे वाहतुकीचे मुख्य साधन होते आणि लोकांनी चालणे आणि प्रार्थना करणे एकाच वेळी केले असावे, तरीही पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थना चालीचा कोणताही नमुना देण्यात आलेला नाही. तथापि, आपण जिचे अनुसरण करावे अशी प्रार्थना चालीविषयी आपणास कोणतीही आज्ञा देण्यात आलेली नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये केल्या गेलेल्या प्रार्थना दुसऱ्या प्रकारे किंवा दुसऱ्या वेळी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांपेक्षा जास्त प्रभावी आहेत असा विश्वास ठेवणे शास्त्रीय नाही. याव्यतिरिक्त, आम्हाला अधिक स्पष्टपणे प्रार्थना करण्यासाठी एखाद्या स्थानाच्या किंवा परिस्थितीच्या जवळ असणे आवश्यक आहे असे आपल्याला वाटत असले, आपल्या सर्वव्यापी स्वर्गीय पित्याला आपल्याला नक्की काय हवे आहे ते माहित आहे आणि त्याच्या परिपूर्ण इच्छेनुसार आणि वेळेनुसार तो त्यास प्रदिसाद देईल. आपल्या प्रार्थनेद्वारे तो आपल्याला त्याच्या योजनांचा भाग बनू देतो ही वस्तुस्थिती त्याच्या फायद्याची नसून आपल्या फायद्याची आहे.
आपणाला “निरंतर प्रार्थना करा” (1 थेस्सलनीकाकरांस पत्र 5:17) अशी आज्ञा देण्यात आलेली आहे, आणि चालणे हे आपण दररोज करत असल्यामुळे चालत प्रार्थना करणे हे निरंतर प्रार्थना करण्याचा एक भागच आहे. देव वेळ, ठिकाण किंवा स्थान याची पर्वा न करता त्याच्यामध्ये बनून राहणाऱ्या सर्वांची प्रार्थना ऐकतो (योहान 15:7). याच बरोबर, प्रार्थना चालीच्या विरोधात नक्कीच कोणतीही आज्ञा नाही आणि ज्या गोष्टी आपल्याला प्रार्थना करण्यास प्रवृत्त करतात त्यांचा विचार करणे योग्य आहे.
English
प्रार्थना चालणे म्हणजे काय? प्रार्थना चालीवर जाणे पवित्र शास्त्रीय आहे काय?