प्रश्नः
पवित्र आत्म्याने प्रार्थना करणे म्हणजे काय?
उत्तरः
पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याने प्रार्थना करण्याचा उल्लेक तीन वेळा करण्यात आला आहे. करिंथकरांस पहिले पत्र 14:15 असे म्हणत आहे कि, “तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार; मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार”. इफिसकरांस पत्र 6:18 असे म्हणत आहे कि, “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा”. यहुदाचे पत्र 20 असे म्हणत आहे कि, “प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा.” तर मग, पवित्र आत्म्याने प्रार्थना करणे करणे म्हणजे काय?
ग्रीक भाषेमधून अनुवादित केलेला “ने प्रार्थना करणे” या शब्दाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. याचा अर्थ “च्या मार्गाने,” “च्या मदतीने,” “च्या क्षेत्रात” आणि “च्या संबंधात” असे असू शकतात. आत्म्याने प्रार्थना करण्यामध्ये आपण बोलत असलेल्या शब्दांचा उल्लेख होत नसून आपण प्रार्थना कशी करतो याचा उल्लेख होतो. आत्म्याने प्रार्थना करणे हे आत्म्याच्या अनुवाईने प्रार्थना करणे आहे. ज्या गोष्टींविषयी आत्मा प्रार्थना करण्यास अगुवाई करीत आहे त्यासाठी प्रार्थना करणे. रोमकरांस पत्र 8:26 आपणास असे सांगते कि, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो”.
काही लोक, 1 करिंथकरांस पत्र 14:15 वर आधारित, आत्म्याने प्रार्थना करणे आणि निरनिराळ्या भाषेत प्रार्थना करणे यांस एकत्र करत आहेत. निरनिराळ्या भाषेच्या वरादानाबद्दल चर्चा करताना पौलाने “माझ्या आत्म्याने प्रार्थना” असा उल्लेख केला आहे. करिंथकरांस पहिले पत्र 14:14 मध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती निरनिराळ्या भाषेमध्ये प्रार्थना करत असते तेव्हा माहित नसलेल्या भाषेमध्ये बोलत असल्यामुळे ती व्यक्ती काय बोलत आहे हे तिला ठाऊक नसते. शिवाय, अर्थ सांगणारा नसल्यास काय सांगितले जात आहे हे दुसर्या कोणालाही समजू शकत नाही (1करिंथकरांस 14:27-28). इफिसकरांस पत्र 6:18 मध्ये पौलाने आपणांस “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा” असे निर्देशित केले आहे. जर प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीसह कोणालाही काय सांगितले जात आहे हे समजत नसेल तर आपण सर्व प्रकारच्या प्रार्थनांसह आणि विनंत्यांसह प्रार्थना कशी करावी आणि संतांसाठी प्रार्थना कशी करावी? म्हणूनच, आत्म्याने प्रार्थना करणे हे निरनिराळ्या भाषेमध्ये प्रार्थना करण्याप्रमाणे न समजता आत्म्याच्या आगुवाईनुसार आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करणे असे समजले पाहिजे.
English
पवित्र आत्म्याने प्रार्थना करणे म्हणजे काय?