प्रश्नः
मी देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करीत आहे हे मला कसे समजेल?
उत्तरः
मनुष्याचे सर्वोच्च उद्दीष्ट म्हणजे देवाचे गौरव असावे (1 करिंथकरांस पत्र 10:31), आणि यामध्ये देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करणे देखील समाविष्ट आहे. प्रथम, आपण ज्ञान मागितले पाहिजे. “जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो” (याकोबाचे पत्र 1:5). ज्ञान मागत असताना आपण असा देखील विश्वास ठेवला पाहिजे की देव दयाळू आहे आणि आपल्या प्रार्थनांचे उत्तर देण्यास तयार आहे: “पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे” (याकोबाचे पत्र 1:6; मार्क 11:24 देखील पहा). म्हणून, देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करण्यामध्ये ज्ञान मागणे (देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी) आणि विश्वासाने मागणे (देवाच्या इच्छेवर विश्वास ठेवण्यासाठी) यांचा समावेश होतो.
येथे सात पवित्र शास्त्रीय सूचना आहेत ज्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांना देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करण्यास मार्गदर्शन करतील:
1) पवित्र शास्त्र ज्या गोष्टींबाबत प्रार्थना करण्याची आज्ञा देते त्या गोष्टींसाठी प्रार्थना करा. आपल्या शत्रुंसाठी प्रार्थना (मत्तय 5:44); सेवाकार्यासाठी लोक पाठविण्यासाठी प्रार्थना (लूक 10:2), आपण परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना (मत्तय 26:41), सुवार्ता प्रचारकांसाठी प्रार्थना (कलस्सैकरांस पत्र 4:3; 2 थेस्सलनीकाकरांस पत्र 3:1), सरकारी अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना (1 तीमथी 2:1-3); सतावातून मुक्तीसाठी प्रार्थना (याकोबाचे पत्र 5:13), आणि सह विश्वासी लोकांच्या आरोग्यसाठी प्रार्थना (याकोबाचे पत्र 5:16) इत्यादी बाबींसाठी प्रार्थना करण्यास सांगण्यात आले आहे.
2) पवित्र शास्त्रातील दैवीय लोकांचे अनुसरण करा: पौलाने इस्राएलच्या तारणासाठी प्रार्थना केली (रोमकरांस पत्र 10:1). दाविदाने जेंव्हा पाप केले तेंव्हा त्याने दयेसाठी आणि क्षमेसाठी प्रार्थना केली (स्तोत्रसंहिता 51:1-2). सुरुवातीच्या सभेने साक्ष देण्यास धैर्य प्रदान होण्यासाठी प्रार्थना केली (प्रेषित 4:29). या प्रार्थना देवाच्या इच्छेनुसार होत्या आणि आजही अशाच प्रार्थना केल्या जाऊ शकतात. पौल आणि सुरुवातीच्या मंडळीप्रमाणे आपणही नेहमीच इतरांच्या तारणासाठी प्रार्थना केल्या पाहिजेत. स्वतःसाठी, दाविदाने केल्याप्रमाणे आपणही आपल्या पापांबद्दल नेहमी जागरूक राहून आपल्या देवाबरोबरच्या नात्यामध्ये अडथळा आणू नये आणि आपल्या प्रार्थनांना आडकाठी होऊ नयेत यासाठी ते देवासोर आणले पाहिजे.
3) योग्य प्रेरणा घेऊन प्रार्थना करा. स्वार्थी हेतू देव आशीर्वादित करीत नाही. “तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता” (याकोबाचे पत्र 4:3). आपण देखील प्रार्थना केली पाहिजे, पण आपले मोठ्याने प्रार्थना केलेले शब्द लोकांकडून ऐकले जावेत आणि त्यांनी आपणास “आत्मिक” म्हणून पहावे म्हणून नसून आपल्या प्रार्थना गुप्तपणे असाव्यात जेणेकरून आपला स्वर्गीय पिता त्या गुप्तपणे एकूण उघडपणे अशीर्वात देईल (मत्तय 6:5-6).
4) इतरांसाठी क्षमेच्या भावनेने प्रार्थना करा (मार्क 11:25). इतरांबद्दल कटुता, संताप, बदला किंवा द्वेषभावनेची मनोवृत्ती आपल्या अंतःकरणाला देवाच्या अधीनतेने प्रार्थना करण्यापासून रोखते. ज्याप्रमाणे आपल्या आणि दुसऱ्या ख्रिस्ती व्यक्तीमध्ये वाद असल्यास आपण देवाला अर्पणे देऊ नये असे आपणास सांगण्यात आले आहे (मत्तय 5:23-24), त्याच प्रकारे जोपर्यंत आपण आपल्या ख्रिस्ती भाऊ-बहिणी बरोबर समेट करीत नाही तोपर्यंत देवाला आपली प्रार्थनारूपी भेट ग्रहणीय नाही.
5) आभार प्रदर्शनासह प्रार्थना करा (कलस्सैकरांस पत्र 4:2; फिलीप्पैकरांस पत्र 4:6-7). आपल्या इच्छेमुळे किंवा गरजांमुळे आपण कितीही लादले गेलेलो असलो तरी देवाचे आभार मानण्यासाठी आपण नेहमी काहीतरी शोधू शकतो. प्रीतीची मुक्तता करणाऱ्या जगात राहणारा सर्वात महान पीडित आणि ज्याच्यासमोर स्वर्गातील प्रस्ताव आहे त्याला देखील देवाचे आभार मानण्याचे कारण आहे.
6) चिकाटीने प्रार्थना करणे (लूक 18:1; 1 थेस्सलनीकाकरांस पत्र 5:17). आपल्या प्रार्थना चिकाटीच्या प्रार्थना असून त्वरित उत्तर मिळाले नाही म्हणून आपण निराश होता कामा नये किंवा आपण खचलो जाता कम नये. देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करण्याचा एक भाग असा विश्वास ठेवणे हि आहे की, देवाचे उत्तर “होय,” “नाही” किंवा “थांबा” असे असले तरी आपण त्याचे निर्णय स्वीकारतो त्याच्या इच्छेला अधीन जातो आणि प्रार्थना करत राहतो.
7) प्रार्थनेमध्ये देवाच्या आत्म्यावर विसंबून राहणे. हे एक अद्भुत सत्य आहे कि: “आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो. आणि अंतर्यामे पारखणार्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो” (रोमकरांस पत्र 8:26-27). आम्हाला प्रार्थना करण्यामध्ये आत्म्याचे सहाय्य आहे. आपल्या मनातील निराशेच्या किंवा दु:खाच्या वेळी जेव्हा आपल्याला वाटते की आपण “प्रार्थना करू शकत नाही”, तेव्हा पवित्र आत्मा खरोखर आपल्यासाठी प्रार्थना करतो हे जाणून आपल्याला दिलासा मिळतो! आपल्याकडे किती अद्भुत देव आहे!
आपण देहामध्ये नव्हे तर आत्म्याने चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला काय आश्वासन मिळते! मग आपण आत्मविश्वास बाळगू शकतो की पवित्र आत्मा आपल्या प्रार्थना स्वर्गीय पित्यासमोर त्याच्या इच्छेने आणि त्याच्या वेळेमध्ये सादर करण्यामध्ये आपले काम पूर्ण करीत असून आपण त्या ज्ञानावर विश्रांती प्राप्त करू शकतो कि तो आपल्यासाठी सर्व गोष्टी चांगल्या करण्यासाठी काम करीत आहे (रोमकरांस पत्र 8:28).
English
मी देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करीत आहे हे मला कसे समजेल?