settings icon
share icon
प्रश्नः

पूर्वज्ञानानुसार नेमिलेले म्हणजे काय? पूर्वज्ञानानुसार नेमणे बायबल आधारित आहे काय?

उत्तरः


रोमकरांस पत्र 8:29-30 आम्हास सांगते, "कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्यांने त्यांना आगाऊच नेमून ठेवले, ह्यांत हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने अगाऊ नेमून ठेवले, त्यांना त्याने पाचारणही केले; ज्यांना त्याने पाचारण केले, त्यांने नीतिमानही ठरविले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले, त्यांचे त्याने गौरवही केले." इफिसकरांस पत्र 1:5 अणि 11 घोषणा करते, "त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमीले होते...आपल्याला मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो, त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमिलेले असून ख्रिस्ताच्याठायी वतनदार झालो आहो." अनेक लोक देवाच्या पूर्वज्ञानांनुसार नेमण्यासंबंधीच्या सिद्धांताविरुद्ध आहेत. तथापि, पूर्वज्ञानानुसार नेमिले जाणे हा बायबल आधारित सिद्धांत आहे. किल्ली आहे पूर्वज्ञानांनुसार नेमिले जाण्याचा अर्थ काय आहे, हे बायबलच्या आधारे समजून घेणे.

पवित्र शास्त्रात वरील संदर्भात उल्लेखलेले शब्द "पूर्वज्ञानांनुसार नेमिलेले" ग्रीक शब्द प्रूरिझोपासून आहे, ज्याच्या अर्थ आहे "आधीपासून ठरविणे," "नेमणे," "वेळेच्या आधी ठरविणे." म्हणून, पूर्वी नेमिलेले म्हणजे देवाने विशिष्ट गोष्टी वेळेआधी घडण्यासाठी ठरविलेल्या आहेत. देवाने वेळेआधी काय ठरविले. रोमकरांस पत्र 8:29-30 अनुसार, देवाने पूर्वीच हे ठरविले की काही व्यक्ती त्याच्या पुत्राच्या प्रतिरूपात असतील, बोलविले जातील, नीतिमान ठरविले जातील, आणि गौरव प्राप्त करतील. मुख्य म्हणजे, देव पूर्वीच हे ठरवितो की काही लोकांचे तारण होईल. ख्रिस्तामधील विश्वासणारे निवडिले गेले आहेत याचा पवित्र शास्त्रातील अनेक वचने उल्लेख करतात (मत्तय 24:22, 31; मार्क 13:20, 27; रोमकरांस पत्र 8:33, 9:11, 11:5-7, 28; इफिसकरांस पत्र 1:11; कलस्सैकरांस पत्र 3:12; थेस्सलनीकाकरांस 1 ले पत्र 1:4; तीमथ्यास 1 पत्र 5:21; तीमथ्यास 2 पत्र 2:10; तीतास पत्र 1:1; पेत्रास 1 पत्र 1:1-2, 2:9; पेत्रास 2 पत्र 1:10). पूर्वज्ञानांनुसार नेमिले जाणे हा बायबलचा सिद्धांत आहे की देव त्याच्या सार्वभौम इच्छेनुसार काही लोकांस तारण देण्यासाठी निवडितो.

पूर्वज्ञानांनुसार नेमले जाण्याच्या सिद्धांताविरुद्ध सर्वसामान्य आक्षेप हा आहे की तो अन्यायपूर्ण आहे. देवाने काही लोकांस निवडावे आणि इतरांस नव्हे असे का? लक्षात ठेवण्याची महत्वाची गोष्ट ही आहे की कोणीही तारण प्राप्त करावयास पात्र नाही. आम्ही सर्वांनी पाप केले आहे (रोमकरांस पत्र 3:23), आणि सर्वजण सनातन शिक्षेस पात्र आहोत (रोमकरांस पत्र 6:23). याचा परिणाम म्हणून, आम्ही सर्वांनी सनातनकाळ अधोलोकात घालवावा म्हणून आम्हास मोकळीक देण्याबाबत देव पूर्णपणे न्यायी ठरला असता. तथापि, देवाने आमच्यापैकी काहींस तारण देण्यासाठी निवडिले. ज्यांस निवडण्यात आले नाही त्यांच्याबाबतीत तो अन्यायी नाही, कारण ते ज्यास पात्र आहेत ते त्यांस मिळत आहे. काही लोकांप्रत कनवाळू होण्याची देवाची निवड इतरांसोबत अन्याय नाही. देवाकडून काहीही प्राप्त करावयास कोणीही पात्र नाही; म्हणून, जर एखाद्यास देवाकडून काही प्राप्त नसेल तर तो आक्षेप घेऊ शकत नाही. याचे उदाहरण म्हणजे एखादा माणूस वीस लोकांच्या गर्दीतील पाच लोकांस स्वैरपणे पैसे वाटतो. ज्यांना पैसे मिळाले नाहीत अशा पंधरा लोकांनी वाईट वाटून घ्यावे काय? कदाचित असेल. त्यांना वाईट वाटून घेण्याचा हक्क आहे काय? नाही, त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. का? कारण त्या माणसाचे कोणावरही पैश्यांचे कर्ज नाही. त्याने काही लोकांवर कृपा करण्याचा फक्त निर्णय घेतला.

कोण तारण पावले आहे याची जर देव निवड करीत आहे, तर त्याने ख्रिस्ताची निवड करण्याची व त्याच्याठायी विश्वास ठेवण्याची आमची इच्छाशक्ती खचत नाही का? बायबल म्हणते की निवड आमच्या हाती आहे — जे कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवितात त्यांचे तारण होईल (योहान 3:16; रोमकरांस पत्र 10:9-10). बायबल कधीही असे वर्णन करीत नाही की देव त्याच्याठायी विश्वास ठेवणार्या कोणाचा अव्हेर करतो अथवा त्याचा शोध घेणार्या एखाद्याला घालवून लावितो (अनुवाद 4:29). कसे का होईना, देवाच्या रहस्य भेदात, पूर्वज्ञानांनुसार नेमिले जाणे देवाद्वारे ओढल्या जाणार्या व्यक्तीसोबतच (योहान 6:44) आणि तारणाप्रीत्यर्थ विश्वास ठेवण्यासोबत कार्य करीत असते (रोमकरांस पत्र 1:16). कोणाचे तारण होईल हे देव आधीच नेमितो, आणि तारण प्राप्त करण्यासाठी आम्ही ख्रिस्ताची निवड केली पाहिजे. दोन्ही गोष्टी सारख्याच खर्या आहेत. रोमकरांव पत्र 11:33 घोषणा करते, "अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहण, आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!"

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पूर्वज्ञानानुसार नेमिलेले म्हणजे काय? पूर्वज्ञानानुसार नेमणे बायबल आधारित आहे काय?
© Copyright Got Questions Ministries