settings icon
share icon
प्रश्नः

समृद्धी सुवार्तेबद्दल बायबल काय म्हणते?

उत्तरः


समृद्धी सुवार्तेत, ज्यास "विश्वासाचे वचन" देखील म्हटले गेले आहे, विश्वासणार्यास देवाचा उपयोग करण्यास सांगण्यात आले आहे. तथापि बायबल आधारित ख्रिस्ती विश्वासाचे सत्य अगदी विपरीत आहे — देव विश्वासणार्याचा उपयोग करतो. विश्वासाचे वचन अथवा समृद्धी धर्मविज्ञान पवित्र आत्म्याकडे विश्वासणार्याच्या इच्छेनुसार वाटेल त्या कामी लावण्याचे सामथ्र्य म्हणून पाहते. बायबल हे शिकविते की पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे जो विश्वासणार्यास देवाची इच्छा पूर्ण करण्याचे सामथ्र्य देतो. समृद्धी सुवार्ता चळवळ काही विनाशकारक लोभी पंथांशी निकट साम्य ठेवते जिने प्रारंभिक मंडळीत प्रवेश केला होता. पौल आणि इतर प्रेषितांनी अशाप्रकारच्या पाखंडाचा प्रचार करणार्या खोट्या शिक्षकांस जागा दिली नाही अथवा त्यांच्याशी सलोखा केला नाही. त्यांनी त्यांस भयानक खोटे शिक्षक म्हणून ओळखले आणि ख्रिस्ती लोकांस त्यांच्यापासून दूर राहण्याचा आग्रह केला.

पौलाने तीमथ्याला 1 ले पत्र 6:5, 9-11 या वचनात अशा लोकांविरुद्ध तीमथ्याला ताकीद दिली. "मन बिघडलेले" हे लोक नीतिमत्वास लाभ प्राप्त करण्याचे साधन मानीत व संपत्तीसाठी त्यांची इच्छा पाश होती ज्यानेे त्यांस "नाशात व विध्वंसात बुडविले" (वचन 9). संपत्तीचा पीछा पुरविणे ख्रिस्ती लोकांसाठी धोक्याचा मार्ग आहे आणि त्याविषयी देवाने ताकीद दिली आहे: "कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे" (वचन 10). जर संपत्ती हे नीतिमानासाठी योग्य ध्येय असते, तर येशूने त्याचा पाठपुरावा केला असता. पण त्याने तसे केले नाही, तर त्याऐवजी डोके ठेवण्यासाठी देखील त्याला जागा नव्हती हे त्याने अधिक पसंद केले (मत्तय 8:20) आणि आपल्या शिष्यांसही तसे करण्यास शिकविले. हे देखील लक्षात ठेविले पाहिजे की संपत्तीशी संबंध ठेवणारा एकमेव शिष्य होता यहूदा.

पौलाने म्हटले की लोभ ही मूर्तिपूजा आहे (इफिसकरांस पत्र 5:5) आणि अनैतिकतेचा अथवा लोभाचा संदेश आणणार्या कोणत्याही व्यक्तीपासून दूर राहावे असे त्याने इफिसकरांस सांगितले (इफिसकरांस पत्र 5:6-7). समृद्धीची शिकवण देवास स्वतः कार्य करावयास मनाई करते, अर्थात देव सर्वांचा प्रभु नाही कारण जोवर आम्ही त्याला कार्य करावयास मोकळीक देत नाही तोवर तो कार्य करू शकत नाही. विश्वासाच्या वचनाच्या सिद्धांतांनुसार, विश्वास हा देवाठायी विनम्र भरवंसा नव्हे; विश्वास हे सूत्र आहे ज्याद्वारे आपण आध्यात्मिक नियमांशी छेडछाड करतो ज्याविषयी समृद्धी शिक्षक असे शिकवितात की ते विश्वाचे संचालन करतात. जसे "विश्वासाचे वचन" ह्या नावावरून सूचित होते, ही चळवळ शिकविते की विश्वास ही आपण कोणावर भरवंसा ठेवितो अथवा आपण कोणत्या सत्यांचा स्वीकार करतो आणि आमच्या अंतःकरणात त्यांची पुष्टता करतो त्यापेक्षा आपण काय म्हणतो याच्याशी सबंधित बाब आहे.

विश्वासाचे वचन ह्या चळवळीचा प्रिय शब्द आहे "सकारात्मक अंगीकार." हा ह्या शिकवणीचा उल्लेख करतो की स्वतः शब्दांठायी निर्मितीचे सामथ्र्य आहे. विश्वासाचे वचन शिकविणारे हा दावा करतात की, आपण जे काही म्हणता, त्याद्वारे आपल्यासोबत घडणारे सर्वकाही ठरविले जाते. आपले अंगीकार, विशेषेकरून आपण देवातर्फे जी कृपा मागतो, ती सर्वकाही सकारात्मकरित्या बोलली पाहिजे आणि न अडखळता. मग देवाला उत्तर देण्याची गरज भासते. (जणूकाही मनुष्य परमेश्वराकडून कोणत्याही गोष्टीसाठी जाब मागू शकतो!) अशाप्रकारे, आम्हास आशीर्वाद देण्याची देवाची क्षमता आमच्या विश्वासावर अवलंबून असल्यासारखे वाटते. याकोब 4:13-16 ही वचने स्पष्टपणे ह्या शिकविणीचे खंडन करतात. "अहो! जे तुम्ही म्हणता की, आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारांत कमाई करू, त्या तुम्हाला उद्यांचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहा, ती थोडावेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते." भविष्यात आपल्या बोलण्याद्वारे गोष्टी अस्तित्वात आणणे तर दूर, उद्या काय होईल अथवा आम्ही जीवंत राहू किंवा नाही ते देखील आम्हास माहीत नसते.

संपत्तीच्या महत्वावर जोर देण्याऐवजी, बायबल त्याचा पाठपुरावा करण्याविरुद्ध ताकीद देते. विश्वासणार्यांस, विशेषरित्या मंडळीतील पुढार्यांस (तीमथ्याला 1 ले पत्र 3:3), पैश्याच्या लोभापासून मुक्त राहिले पाहिजे (इब्री लोकांस पत्र 13:5). पैश्याचा मोह सर्वप्रकारच्या वाईटास प्रवृत्त करतो (तीमथ्याला 1 ले पत्र 6:10). येशूने ताकीद दिली आहे, "सांभाळा! सर्वप्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही" (लूक 12:15). विश्वासाचे वचन ह्या जीवनात पैसा व संपत्ती प्राप्त करण्यावर जोर देते त्या विपरीत येशूने म्हटले, "पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात, आणि चोर घर फोडून चोरी करतात" (मत्तय 6:19). समृद्धीची शिकवण आणि प्रभु येशू ख्र्रिस्ताची सुवार्ता यातील विसंगत विरोधाभास मत्तय 6:24 मधील येशूच्या शब्दांत उत्तमरित्या मांडण्यात आला आहे, "तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही."

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

समृद्धी सुवार्तेबद्दल बायबल काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries