प्रश्नः
बायबल गर्भपाताविषयी काय म्हणते?
उत्तरः
बायबल भूतविद्या, माध्यमे, आणि परामनोविज्ञान यांचे ठामपणे खंडन करते (लेवीय 20:27; अनुवाद 18:10-13). जन्मपत्रिका, टैरो कार्ड, ज्योतिषशास्त्र, भविष्य सांगणारे, हस्तरेखा पाहणे, आणि मृतांस आवाह्न करणारे याच वर्गात मोडतात. ह्या प्रथा या कल्पनेवर आधारित आहे की देवता, आत्मे, अथवा मृतांची आत्मे सल्ला आणि मार्गदर्शन देऊ शकतात. ही "दैवते" अथवा "आत्मे" दुरात्मे आहेत (करिंथकरांस 2 रे पत्र 11:14-15). मृत प्रियजन आमच्याशी संपर्क करू शकतात हा विश्वास धरण्याचे कुठलेही कारण बायबल आम्हास देत नाही. जर ते विश्वासणारे असतील, तर ते स्वर्गात अत्यंत अद्भुत ठिकाणी प्रेमळ देवाच्या सहभागितेत आनंदानुभव करीत आहेत. जर ते विश्वासणारे नव्हते, तर ते अधोलोकात, कधीही न संपणार्या यातना भोगत आहेत कारण त्यांनी देवाच्या प्रीतीचा अव्हेर केला आणि त्याच्याविरुद्ध विद्रोह केला.
म्हणून, जर आमचे प्रियजन आमच्याशी संपर्क करू शकत नाहीत, तर माध्यमे, भूतविद्या करणारे, आणि परामनोवैज्ञानिक यांस इतकी बिनचूक माहिती कशी मिळते? अनेक परामनोवैज्ञानिकांस पाखंडी म्हणून उघडकीस आणण्यात आले आहे. हे सिद्ध झाले आहे की परामनोवैज्ञानिक एखाद्या व्यक्तीविषयी सर्वसाधारण माध्यमांद्वारे प्रचंड माहिती मिळू शकतात. कधी कधी केवळ काॅलर आयडीच्या माध्यमाने आणि इंटरनेटवर शोधून टेलीफोन क्रमांकाचा उपयोग करून, परामनोवैज्ञानिक नावे, पत्ते, जन्मतारखा, लग्नाच्या तारखा, कुटुंबातील सदस्य, इत्यादी माहिती मिळवू शकतात. तथापि, हे नाकारता येणार नाही की परामनोवैज्ञानिक कधी कधी अशा गोष्टी जाणतात ज्या जाणून घेणे त्यांस अशक्य असावे. त्यांस ही माहिती कोठून मिळते? उत्तर आहे सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांपासून. "ह्यांत आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो. म्हणून त्यांच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तरही मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल" (करिंथकरांस 2 रे पत्र 11:14-15). प्रेषितांची कृत्ये 16:16-18 एका भाकीत सांगणार्याचे वर्णन करते आणि जोवर प्रेषित पौलाने तिच्यातून दुरात्म्यास बाहेर काढले नाही तिला तोवर भविष्य सांगता येत होते.
सैतान हा दयाळू व मदतशील असल्याची बतावणी करतो. तो चांगले असल्याचे दिसण्याचा प्रयत्न करतो. सैतान आणि त्याचे दुरात्मे एखाद्या व्यक्तीस भूतविद्येत, ज्याची देव मनाई करतो, फसविण्यासाठी त्याच्याविषयी मानसिक माहिती देतील. प्रारंभी हे निरागसपणाचे वाटेल, पण लवकरच लोकांस आढळून येईल की त्यांस परामानसिकतेचे व्यसन जडले आहे आणि नकळत ते सैतानास त्यांच्या जीवनांचे नियंत्रण व नाश करण्यास सैतानास मुभा देतील. पेत्राने घोषणा केली, "सावध असा आणि जागे राहा. तुमच्या शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो" (पेत्राचे 1 ले पत्र 5:8). काही बाबतीत हे स्वतः फसलेले आहेत, त्यांस प्राप्त होत असलेल्या माहितीचे खरे स्रोत त्यांस माहीत नाही. काहीही का असेना आणि माहितीचे स्रोत काहीही का असेना, भूतविद्या, जादूटोना, अथवा ज्योतिष यांच्याशी संबंधित असे काहीही माहिती जाणून घेण्याचे दैवीय साधन नाही. आमच्या जीवनासाठी देवाची इच्छा आम्ही कशी ओळखावी असे देवास वाटते? देवाची योजना सरळ, तरीही सामथ्र्यवान आणि प्रभावी आहे: बायबलचा अभ्यास करा (तीमथ्याला 2 रे पत्र 3:16-17) आणि बुद्धिसाठी प्रार्थना करा (याकोब 1:5).
English
बायबल गर्भपाताविषयी काय म्हणते?