प्रश्नः
सात घातक पापे कोणती आहेत?
उत्तरः
सात घातक पापे ती यादी आहे जिचा उपयोग मूलतः प्रारंभिक ख्रिस्ती शिकवणीत अनुयायांस पापाप्रत पतीत मनुष्याच्या प्रवृत्तीसंबंधाने शिक्षण व आज्ञा देण्यासाठी केला जात असे. सात "घातक" पापांच्या यादीविषयी चुकीची कल्पना ही आहे की ती अशी पापे आहे ज्यांस देव क्षमा करणार नाही. बायबल याविषयी स्पष्ट आहे की देव ज्या एकमेव पापाची क्षमा करणार नाही ते आहे सतत अविश्वास, कारण क्षमा प्राप्त करण्यासाठी देण्यात आलेल्या एकमेव साधनाचा — येशू ख्रिस्ताचा आणि वधस्तंभावरील त्याच्या ऐवजदार मृत्यूचा — ते नाकार करते.
सात घातक पापांची कल्पना बायबलनुसार आहे काय? होय आणि नाही. नीतिसूत्रे 6:16-19 घोषणा करते, "परमेश्वर ज्यांचा द्वेष करितो अशा सात गोष्टी आहेत : 1) उन्मत दृष्टी, 2) लबाड बोलणारी जिव्हा, 3) निर्दोष रक्त पाडणारे हात, 4) दुष्ट योजना करणारे अंतःकरण, 5) दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, 6) लबाड बोलणारा खोटा साक्षी, आणि 7) भावाभावांत वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य." तथापि, ही ती यादी नाही ज्यांस बहुतेक लोक सात घातक पापे म्हणून समजतात.
6 व्या शतकातील महान पोप ग्रेगरीनुसार, सात घातक पापे याप्रमाणे आहेत : अहंकार, हेवा, अधाशीपणा, वासना, क्रोध, लोभ, आणि आळशीपणा. जरी ह्या गोष्टी निश्चितच पापे आहेत, तरीही त्यांस बायबलमध्ये "सात घातक पातके" म्हणून कधीही वर्णन करण्यात आलेले नाही. सात घातक पापांची परंपरागत यादी अस्तित्वात असलेल्या अनेक वेगवेगळ्या पापांचे वर्गीकरण करण्याची उत्तम पद्धत म्हणून कार्य करू शकते. जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या पापास सात वर्गांपैकी एका वर्गात मोडता येते. अधिक महत्वाचे म्हणजे, आम्ही हे समजले पाहिजे की इतर कुठल्याही पापांपेक्षा ही सात पातके अधिक "घातक" नाहीत. सर्व पापांचा परिणाम मृत्यू आहे (रोमकरांस पत्र 6:23).देवाची स्तुती असो, की येशू ख्र्रि्रस्ताद्वारे, आमच्या सर्व पापांची, ज्यात "सात घातक पापांचा" समावेश आहे, क्षमा होऊ शकते (मत्तय 26:28; प्रेषितांची कृत्ये 10:43; इफिसकरांस पत्र 1:7).
English
सात घातक पापे कोणती आहेत?