प्रश्नः
सर्व पापे देवास समान आहेत काय?
उत्तरः
मत्तय 5:21-28 मध्ये, येशू व्यभिचाराची बरोबरी आपल्या अंतःकरणातील वासनेशी आणि खूनाची बरोबरी आपल्या अंतःकरणात हेवा बाळगण्याशी करतो. तथापि, याचा अर्थ हा नाही की पापे समान आहेत. येशू परूश्यांस हे समजाविण्याचा प्रयत्न करीत होता की एखादे कृत्य खरोखर पूर्ण न करताही, जर आपण ते करण्याची केवळ इच्छा धरली तरीही ते पाप आहे. येशूच्या दिवसातील धार्मिक पुढारी हे शिकवीत की जोवर आपण आपल्या अभिलाषांनुसार कृती करीत नाही तोवर आपणास हव्या त्या गोष्टीचा विचार करणे ठीक आहे. येशू त्यांस हे समजाविण्यावर जोर देत आहे की देव व्यक्तीच्या विचारांचा तसेच त्यांच्या कृत्यांचा न्याय करतो. येशूने जाहीर केले की आमची कृत्ये आमच्या अंतःकरणांत जे काही आहे त्यांचा परिणाम आहे (मत्तय 12:34).
म्हणून, जरी येशूने म्हटले की वासना आणि व्यभिचार ही दोन्ही पापे आहेत, तरीही त्याचा अर्थ हा नाही की ती समान किंवा बरोबर आहेत. एखाद्या व्यक्तीचा केवळ तिटकारा करण्यापेक्षा त्या व्यक्तीचा खरोखर खून करणे हे जास्त वाईट आहे, जरी ती दोन्ही देवाच्या दृष्टीत पापे आहेत. पापांचे प्रमाण आहेत. काही पातके इतर पापांपेक्षा अधिक वाईट आहेत. त्याचवेळी, सार्वकालिक परिणामांच्या आणि तारणाच्या संबंधात, सर्व पापे समान आहे. प्रत्येक पाप सार्वकालिक दंडाज्ञेकडे नेईल (रोमकरांस पत्र 6:23). सर्व पाप, मग ते कितीही "लहान" का असे ना, ते अनंत आणि सनातन देवाविरुद्ध आहे, आणि म्हणून अनंत आणि सार्वकालिक शिक्षेस पात्र आहे. याशिवाय कोणतेही पाप इतके "मोठे" नाही की देव त्याची क्षमा करू शकत नाही. येशूने पापाचा दंड चुकविण्यासाठी मरण पत्करले (योहानाचे 1 ले पत्र 2:2). येशू आमच्या सर्व पापांसाठी मेला (करिंथकरांस 2 रे पत्र 5:21). सर्व पापे देवास समान आहेत काय? होय आणि नाही. कठोरतेच्या दृष्टीने? नाही. दंडाच्या दृष्टीने? होय. क्षमा करण्याचा दृष्टीने? होय.
English
सर्व पापे देवास समान आहेत काय?