प्रश्नः
पवित्र शास्त्र आत्म्याचे झोपी जाणे याबद्दल काय म्हणते?
उत्तरः
आत्म्याचे झोपी जाणे” हा असा विश्वास आहे की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याचा/तिचा आत्मा पुनरुत्थान आणि अंतिम न्यायापर्यंत “झोपी जातो”. “आत्म्याचे झोपी जाणे” हि संकल्पना पावित्र शास्त्रीय नाही. पवित्र शास्त्र जेंव्हा मृत्यूच्या संबंधात “झोपी” गेलेल्या व्यक्तीचे वर्णन करते (लूक 8:52; 1 करिंथकरांस पत्र 15:6) तेंव्हा याचा अर्थ शब्दशः झोपणे असा होत नाही. झोपी जाणे हे मृत्यूचे वर्णन करण्याचा एक मार्ग आहे कारण मृत शरीर झोपलेली असल्यासारखी दिसत असते. आपला मृत्यू होतो त्याच क्षणी आपण देवाच्या न्यायला सामोरे जातो (इब्री लोकांस पत्र 9:27). विश्वास ठेवणाऱ्यांसाठी शरीरामध्ये अनुपस्थित असणे म्हणजे देवाबरोबर उपस्थित असणे होय (2 करिंथकरांस पत्र 5:6-8, फिलिप्पैकरांस पत्र 1:23). विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी मृत्यू म्हणजे नरकातील कायमची शिक्षा होय (लूक 16:22-23).
अंतिम पुनरुत्थान होईपर्यंत, तात्पुरते स्वर्ग-सुखलोक (लूक 23:43; 2 करिंथकरांस पत्र 12:4) आणि तात्पुरते नरक-अधोलोक (प्रकटीकरण 1:18; 20:13-14) आहे. लूक 16:19-31 मध्ये स्पष्टपणे दिसून येते की सुखलोकात किंवा अधोलोकात लोक झोपलेले नाहीत. एखाद्या व्यक्तीचे मृतक शरीर झोपत असताना त्याचा आत्मा सुखलोकात किंवा अधोलोकात असतो असे म्हटले जाऊ शकते. पुनरुत्थानाच्या वेळी हे शरीर “जागे” होते आणि स्वर्गात किंवा नरकात असो, अनंतकाळपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या सार्वकालिक शरीरात त्याचे रूपांतर होते. जे सुखलोकात होते त्यांना नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वीवर पाठविले जाईल (प्रकटीकरण 21:1). जे अधोलोकात होते त्यांना अग्नीच्या तळ्यात टाकले जाईल (प्रकटीकरण 20:11-15). एखद्या व्यक्तीने तारणासाठी येशू ख्रीस्तांवर विश्वास ठेवला आहे कि नाही यावर त्याचे संपूर्ण अंतिम आणि गंतव्य अवलंबून आहे.
English
पवित्र शास्त्र आत्म्याचे झोपी जाणे याबद्दल काय म्हणते?