प्रश्नः
मनुष्याचा प्राण आणि आत्मा यात काय फरक आहे. मनुष्य ही द्विभाजन आहे अथवा त्रिभाजन?
उत्तरः
प्राण आणि आत्मा हे दोन मुख्य अभौतिक पैलू आहेत ज्यांचा संबंध पवित्र शास्त्र मानवजातीशी जोडतो. या दोघांत नक्की काय फरक आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करणे गोंधळात पाडणारे ठरू शकते. "आत्मा" मानवजातीच्या केवळ अभौतिक पैलूचा उल्लेख करतो. मनुष्यांजवळ आत्मा आहे, पण आपण आत्मे नाही. पवित्र शास्त्रात, केवळ विश्वासणार्यांस आध्यात्मिकरित्या जीवंत म्हटले जाते. (1 करिंथ 2:11; इब्री 4:12; याकोब 2:26), तर अविश्वासणार्यांस आध्यात्मिकरित्या मृत मानले जाते (इफिस 2:1-5). पौलाच्या लिखाणात, आत्मिक अथवा आध्यात्मिक विश्वासणार्याच्या जीवनासाठी आधारभूत आहे (कलुस्सै 2:13). आत्मा हे मानवातील ते तत्व आहे जे आम्हास परमेश्वरासोबत घनिष्ठ संबंध स्थापन करण्याचे सामथ्र्य देते. जेव्हा कधी "आत्मा" ह्या शब्दाचा उपयोग केला जातो, तेव्हा तो मानवजातीच्या अभौतिक अंगाचा उल्लेख करतो जो "देवाशी" जोडतो, जो स्वतः आत्मा आहे (योहान 4:24).
"प्राण" हा शब्द मानवजातीच्या अभौतिक आणि भौतिक अशा दोन्ही पैलूंचा उल्लेख करतो. मानवाजवळ आत्मा आहे, याविपरीत मानवजात प्राणी आहेत. अत्यंत मौलिक अर्थाने, "प्राण" शब्दाचा अर्थ होतो "जीवन." तथापि, अत्यावश्यक अर्थापलीकडे, बायबल प्राणाविषयी अनेक संदर्भात बोलते. यापैकी एक आहे पाप करण्याप्रत मानवजातीची उत्सुकता अथवा ओढ (लूक 12:26). मानवजात ही स्वभावतःच वाईट आहे, आणि परिणामस्वरूप आमचे प्राण डागाळलेले आहेत. प्राण्याचे जीवनतत्व भौतिक मृत्यूच्या वेळी निघून जाते (उत्पत्ती 35:18; यिर्मया 15:2). आत्म्याप्रमाणेच, प्राण देखील अनेक आध्यात्मिक आणि भावनात्मक अनुभवांचे केंद्र आहे (ईयोब 30:25; स्तोत्र 43:5; यिर्मया 13:17). जेव्हा कधी "प्राण" ह्या शब्दाचा उपयोग केला जातो. तेव्हा तो संपूर्ण व्यक्तीचा उल्लेख करतो, जीवंत असो अथवा मेल्यानंतर.
प्राण आणि आत्मा परस्पर निगडीत आहेत, पण त्यांस वेगळे करता येते (इब्रीकरांस पत्र 4:12). प्राण हे मानवजातीचे तत्व आहे, प्राण म्हणजे आम्ही जे आहोत ते. आत्मा हा मानवजातीचा तो पैलू आहे जो देवाशी संबंध साधतो.
English
मनुष्याचा प्राण आणि आत्मा यात काय फरक आहे. मनुष्य ही द्विभाजन आहे अथवा त्रिभाजन?