प्रश्नः
सारभूत अर्थात सिनोप्टिक समस्या काय आहे?
उत्तरः
जेव्हा मत्तय, मार्क आणि लुक या पहिल्या तीन शुभवर्तमानांची तुलना केली जाते तेव्हा हे स्पष्ट होते कि यांच्यातील लेखणी आणि अभिव्यक्ती एकमेकांशी अगदी समान आहेत. परिणामी मत्तय, मार्क आणि लुक "सारभूत शुभवर्तमान अर्थात सिनोप्टिक गॉस्पेल" म्हणून संबोधले जाते. सिनोप्टिक शब्दाचा मुळ अर्थ "सामान्य दृश्यासह एकत्र पाहणे" असा होतो. सिनोप्टिक शुभवर्तमानांमधील समानतेमुळे काहींना आश्चर्य वाटले की शुभवर्तमान लेखकांमध्ये एक सामान्य स्त्रोत, ख्रिस्ताच्या जन्माचा, जीवनाचा, सेवाकार्याचा, मृत्युचा आणि पुनरुत्थानाचा दुसरा लेखी वृत्तांत असावा ज्यामधून त्यांनी त्यांच्या शुभवर्तमानासाठी साहित्य प्राप्त केले. सिनोप्टिक शुभवर्तमानांमधील समानता आणि फरक कसे स्पष्ट करावे या प्रश्नाला सिनोप्टिक समस्या म्हणतात.
काहींचा असा युक्तिवाद आहे की मत्तय, मार्क आणि लूक इतके समान आहेत की त्यांनी एकमेकांची शुभवर्तमाने किंवा अन्य सामान्य स्त्रोत वापरला असावा. या कथित "स्त्रोत" ला जर्मन शब्द क्येल्ले मधून "क्यू" ही पदवी देण्यात आली आहे, ज्याचा अर्थ "स्त्रोत" आहे. " क्यू " दस्तऐवजासाठी काही पुरावे आहेत का? नाही, यासाठी कोणताही पुरावा नाही. “क्यू” दस्तऐवजाचा कोणताही भाग किंवा काही हिस्सा कधीच सापडला नाही. आरंभीच्या चर्चच्या वडिलांपैकी कोणीही त्यांच्या लिखाणात शुभवर्तमानाच्या "स्रोत" चा उल्लेख केला नाही. "क्यू" हा उदारमतवादी "विद्वान" चा शोध आहे जे पावित्र शास्त्राची प्रेरणा नाकारतात. त्यांचा असा विश्वास आहे की पावित्र शास्त्र हे साहित्याच्या कार्यापेक्षा दुसरे काही नसून साहित्याच्या इतर कामांवर दिलेल्या टीकेच्या अधीन आहे. पुन्हा, पावित्र शास्त्रसंबंधी, देव परीज्ञान शास्त्रीय किंवा ऐतिहासिकदृष्ट्या "क्यू" दस्तऐवजासाठी कोणताही पुरावा नाही.
जर मत्तय, मार्क आणि लूक यांनी "क्यू" दस्तऐवज वापरला नाही तर त्यांची शुभवर्तमाने इतकी सारखी का आहेत? अनेक संभाव्य स्पष्टीकरण आहेत. हे शक्य आहे की कोणतीही सुवार्ता आधी लिहिली गेली असेल (शक्यतो मार्क, चर्चच्या वडिलांनी मत्तय प्रथम लिहिल्याचा अहवाल दिला असला तरी), इतर शुभवर्तमान लेखकांना त्यामध्ये प्रवेश होता. मत्तय आणि/किंवा लूकने मार्कच्या शुभवर्तमानातील काही मजकूरची नकल केली आणि तो त्यांच्या शुभवर्तमानात वापरला या कल्पनेत कोणतीही अडचण नाही. कदाचित लूकला मार्क आणि मत्तयमध्ये प्रवेश होता आणि त्याने त्यांच्या स्वतःच्या शुभवर्तमानात या दोघांची वचने वापरली. लूक 1:1-4 आपल्याला सांगते, “ज्या गोष्टींसंबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खातरी झाली आहे, त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक ह्यांनी आम्हांला सांगून ठेवलेला वृत्तान्त लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे; ह्यास्तव, थियफील महाराज, मलाही वाटले की, सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्यात; ह्यासाठी की, ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्या लक्षात यावा.”
शेवटी, सिनोप्टिक “समस्या” ही तितकी मोठी समस्या नाही जितकी काही लोक ती सोडवण्याचा प्रयत्न करतात. सिनोप्टिक गॉस्पेल इतके समान का आहेत याचे स्पष्टीकरण असे आहे की ते सर्व एकाच पवित्र आत्म्याने प्रेरित आहेत आणि ते सर्व अशा लोकांनी लिहिले आहेत ज्यांनी साक्षीदार किंवा त्याच घटनांबद्दल सांगितले होते. मत्तयचे शुभवर्तमान प्रेषित मत्तय ने लिहिले होते, जो बारा जणांपैकी एक होती ज्यांनी येशूचे अनुसरण केले आणि त्यांना नियुक्त केले. मार्कचे शुभवर्तमान योहान मार्कने लिहिले होते, जो प्रेषित पेत्राच्या जवळचा सहकारी होता जो बरांपैकी दुसरा होता. लूकचे शुभवर्तमान लूकने लिहिले, जो प्रेषित पौलाचा जवळचा सहकारी होता. त्यांची लेखणी एकमेकांसारखीच असतील अशी अपेक्षा आपण का करू नये? प्रत्येक शुभवर्तमान शेवटी पवित्र आत्म्याने प्रेरित आहे (2 तीमथ्य 3:16–17; 2 पेत्र 1:20–21). म्हणून, आपण सुसंवाद आणि एकतेची अपेक्षा केली पाहिजे.
English
सारभूत अर्थात सिनोप्टिक समस्या काय आहे?