प्रश्नः
सार्वत्रिकवाद/सार्वत्रिक तारण बायबल आधारित आहे काय?
उत्तरः
सार्वत्रिकवाद ही श्रद्धा आहे की प्रत्येक व्यक्तीचे तारण होईल. आज अनेक लोक आहेत जे सार्वत्रिक तारणावर विश्वास धरतात आणि त्यांचा असा विश्वास आहे की शेवटी सर्व लोक स्वर्गास जातील. कदाचित स्त्री आणि पुरुषांस अधोलोकात सार्वकालिक यातनेचे जीवन घालवावे लागेल ह्या विचाराने काही लोक ह्या विषयावरील पवित्र शास्त्राच्या शिकवणीचा अव्हेर करतात. काही लोक देवाच्या प्रीतीवर आणि करूणेवर गरजेपेक्षा जास्त भर देतात — आणि देवाच्या नीतिमत्वाकडे आणि न्यायाकडे दुर्लक्ष करतात — ज्यामुळे ते असा विश्वास करू लागतात की देव प्रत्येक जीवंत प्राण्यावर दया करील. परंतु पवित्र शास्त्र शिकविते की काही लोक सनातनकाळ अधोलोकात घालवितील.
सर्वप्रथम, बायबल स्पष्टपणे सांगते की तारण न पावलेले सर्वकाळ अधोलोकात राहतील. येशूची आपली वचने ह्या गोष्टीची पुष्टी करतात की तारण पावलेले स्वर्गात जो वेळ घालवितील तो तितकाच असेल जितका की अधोलोकात तारण न पावलेले घालवितील. मत्तय 25:46 म्हणते, "ते तर (तारण न पावलेले) सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील, आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील." ह्या वचनानुसार तारण न पावलेल्यांची शिक्षा नीतिमान लोकांच्या जीवनाइतकीच सार्वकालिक आहे. काहींचा असा विश्वास आहे की जे अधोलोकात आहेत त्यांचे अस्तित्व शेवटी संपुष्टात येईल, पण प्रभु येशू ह्या गोष्टीची पुष्टी करतो की ते सदाकाळ टिकेल. मत्तय 25:41 आणि मार्क 9:44 अधोलोकाचे वर्णन "सार्वकालिक अग्नी" आणि "न विझणारा अग्नी" असे करतात.
आपण ह्या न विझणार्या अग्नीपासून कसे बचावू शकतो? अनेक लोकांचा असा विश्वास आहे की सर्व मार्ग — सर्व धर्म आणि श्रद्धा — स्वर्गाकडे जातात, अथवा ते असा विचार करतात की देव प्रीती आणि दया यांनी इतका युक्त आहे की तो सर्व लोकांस स्वर्गात येण्याची संधी देईल. देव हा निश्चितच प्रेम व दया यांनी युक्त आहे; ह्या गुणांनी त्याला त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त, ह्याला आमच्यासाठी वधस्तंभावर मरावयास पृथ्वीवर पाठविले. प्रेषितांची कृत्ये 4:12 म्हणते, "आणि तारण दुसÚया कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नांव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही." "कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे" (तीमथ्याला 1 ले पत्र 2:5). योहान 14:6 मध्ये, येशू म्हणतो, "मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही." योहान 316, "देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे." जर आपण देवाच्या पुत्राचा अव्हेर करण्याची निवड केली, तर आपण तारणाच्या अटी पूर्ण करीत नाही (योहान 3:16, 18, 36).
अशा प्रकारच्या वचनांनी, हे स्पष्ट होते की सार्वत्रिकवाद आणि सार्वत्रिक तारण ह्या बायबलविपरीत धारणा आहेत. सार्वत्रिकवाद सरळ पवित्र शास्त्राच्या शिकवणीचे खंडन करतो. अनेक लोक ख्रिस्ती व्यक्तींवर असहिष्णु आणि "विश्ेाष" असल्याचा आरोप लावतात, पण हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की ही स्वतः ख्रिस्ताची वचने आहेत. ख्रिस्ती लोकांनी ह्या कल्पना स्वतः तयार केल्या नाहीत; ख्रिस्ती लोक केवळ तेच सांगतात जे प्रभुने आधीच म्हटले आहे. लोक संदेशाचा अव्हेर करण्याची निवड करतात कारण ते त्यांच्या पातकास तोंड देऊ इच्छित नाहीत आणि कबूल करतात की त्यांस तारणासाठी प्रभुची गरज आहे. असे म्हणणे की जे देवाच्या पुत्राद्वारे तारणाच्या देवाने केलेल्या तरतुदीचा अव्हेर करतात त्यांचे तारण होईल देवाच्या पावित्र्यास व न्यायास तुच्छ लेखणे व आमच्यावतीने येशूच्या बलिदानाच्या गरजेचा नाकार करणे होय.
English
सार्वत्रिकवाद/सार्वत्रिक तारण बायबल आधारित आहे काय?