settings icon
share icon
प्रश्नः

मी ख्रिस्ताच्या पुनरूत्थानावर विश्वास का ठेवावा?

उत्तरः


हे अत्यंत सुनिश्चित तथ्य आहे की येशू ख्रिस्ताला पन्तय पिलाताच्या राज्यात यहूदी महासभेच्या सांगण्यावरून पहिल्या शतकात यहूदिया येथे सार्वजनिकरित्या वधस्तंभावर खिळून मृत्यूदंड देण्यात आला. फ्लेवियस जोसेफस, कर्नेलियस टॅसिटस, समोसताचा लूसियन, मेमोनाईड्स आणि यहूदी सन्हेद्रिनसुद्धा येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या या महत्वपूर्ण ऐतिहासिक पक्षांच्या प्रारंभिक ख्रिस्ती प्रत्यक्ष साक्षी वृतांतांची पुष्टी करतात.

त्याच्या पुनरूत्थानासंबंधाने अनेक पुरावे आहेत ज्यामुळे या विषयास बळकटी प्राप्त होते. न्यायाविषयी असामान्य बुद्धी असलेले आणि अंतर्राष्ट्रीय मुत्सद्दी सर लायनेल लुखू (त्यांच्या अभूतपूर्व 245 संरक्षण खून खटल्याच्या निर्दोष सुटका मिळवून देणारे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड कीर्तीप्राप्त) यांनी पुनरूत्थानाच्या विषयात ख्रिस्ती उत्साह आणि विश्वास याचा सारांश मांडतांना लिहिले आहे, “बचाव पक्षाचा वकील म्हणून मी जगाच्या अनेक भागात जाऊन 42 वर्षे घालवली आहेत आणि अद्याप वकीली करीत आहे. मला अनेक खटल्यांत यश मिळाले आहे आणि मी स्पष्टपणे म्हणतो की येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाचा पुरावा इतका मजबूत आहे की पुराव्याद्वारे तो स्वीकार करावयास बाध्य करतो ज्यामुळे शंकेला जागा राहत नाही.”

धर्मनिरपेक्ष समुदायाचा त्याच पुराव्यांसंदर्भातील प्रतिसाद पद्धतशीर निसर्गवादाच्या त्यांच्या दृढ वचनबद्धतेनुसार उदासीन असल्याचे म्हटले आहे. या शब्दाशी परिचित नसलेल्यांसाठी, पद्धतशीर निसर्गवाद हा केवळ नैसर्गिक कारणे आणि नैसर्गिक कारणांच्या संदर्भात सर्वकाही स्पष्ट करण्याचा मानवी प्रयत्न आहे. जर एखादी कथित ऐतिहासिक घटना नैसर्गिक स्पष्टीकरण (उदा. एक चमत्कारी पुनरुत्थान) नाकारत असेल तर पुराव्यांकडे दुर्लक्ष करून धर्मनिरपेक्ष विद्वान त्याचे सामान्यतः जबरदस्त संशयास्पदरित्या वर्णन करतात, मग ते कितीही अनुकूल व आकर्षक असले तरीही.

आमच्या मते, याउलट ठोस पुरावा विचारात न घेता नैसर्गिक कारणांवर अशी अटूट निष्ठा ही पुराव्यांचा निष्पक्ष (आणि म्हणून पुरेसा) तपास करण्यास अनुकूल नाही. आम्ही डॉ. वेर्नर फॉन ब्राॅन आणि असंख्य इतरांशी सहमत आहोत ज्यांना अद्याप असे वाटते की पुराव्यावर एखाद्या लोकप्रिय तत्वज्ञानाची प्रवृत्ती लादणे वस्तुनिष्ठतेत अडथळा आणते. किंवा डॉ. व्हॉन ब्राॅन यांच्या शब्दांत, “केवळ एका निष्कर्षावर विश्वास ठेवण्यास भाग पाडणे विज्ञानाच्या वस्तुनिष्ठतेचे उल्लंघन करेल.“

इतके म्हटल्यानंतर आता आपण त्या अनेक पुराव्यांचे परीक्षण करू या जे पुनरुत्थानाच्या पक्षात आहेत.

ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा पहिला पुरावा

सुरूवातीस, आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची खरी साक्ष आहे. सुरुवातीच्या ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञांनी शेकडो प्रत्यक्षदर्शींचा उल्लेख केला, ज्यांपैकी काहींनी स्वतःचे कथित अनुभव लिहिले. यापैकी अनेक प्रत्यक्षदर्शींनी त्यांची साक्ष नाकारण्याऐवजी स्वेच्छेने व निर्धाराने दीर्घकाळ अत्याचार व मृत्यू सहन केला. ही वस्तुस्थिती त्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देते आणि त्यांच्या वतिने फसवणूकीस खारिज करते. ऐतिहासिक अभिलेखानुसार (प्रेषितांची कृत्ये -17:1-17; प्लिनीज लेटर्स टू ट्राजन एक्स, 96, इ.) बहुतेक खिस्ती विश्वासणार्यांस आपल्या विश्वासाचा त्याग करण्याद्वारे त्यांचे दुःख संपवता आले. त्याऐवजी असे दिसते की बहुतेकांनी दुःख सहन करण्याची आणि मरेपर्यंत ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची घोषणा करण्याची मृत्यूकडे नेली आहे.

हे मान्य आहे की ख्रिस्तसाक्षी होणे अति उत्तम आहे, पण ते सक्तीचे नाही. एखाद्या विश्वासाचे ते प्रमाणीकरण करत नाही जेणेकरून ते एखाद्या विश्वासणाऱ्यास खरे ठरविल (मूर्त स्वरूपात त्याची प्रामाणिकता दाखवून). सर्वात प्राचीन ख्रिस्तसाक्षींना कोणती गोष्ट असाधारण ठरवीत असेल की ती ही की ते जे सांगत होते ते खरे होते की नाही हे त्यांना ठाऊक होते. त्यांनी एकतर येशू ख्रिस्ताला त्याच्या मृत्यूनंतर जिवंत आणि चांगल्या प्रकारे पाहिले किंवा पाहिले नाही. हे असामान्य आहे. जर हे सर्व खोटे असते तर अनेकांनी त्यांच्या परिस्थितीतही हे कायम का ठेवले असते? छळ, तुरूंग, अत्याचार आणि मृत्यूला तोंड देत ते सर्व जाणूनबुजून अशा गैरफायदेशीर लबाडीला का चिकटून राहिले असते?

11 सप्टेंबर, 2001 रोजी आत्मघाती अपहरणकर्ते निःसंशयपणे ते जे सांगत होते त्यावर विश्वास करीत होते (हे ह्यावरून दिसून येते की त्याकरिता ते मरावयास तयार होते), त्यांना ते माहित असणे शक्य नव्हते आणि ते सत्य आहे की नाही हे देखील त्यांना ठाऊक नव्हते. पिढ्यांपिढ्या त्यांना लाभलेल्या परंपरांवर त्यांनी विश्वास ठेवला होता. याउलट, प्रारंभिक ख्रिस्तसाक्षी ही पहिली पिढी होती. एकतर त्यांनी जे पाहिले असा दावा केला, ते त्यांनी पाहिले होते किंवा त्यांनी ते पाहिले नव्हते.

तथाकथित प्रत्यक्षदर्शीपैकी सर्वात सुप्रसिद्ध म्हणजे प्रेषित होते. पुनरुत्थानांनंतर ख्रिस्ताने त्यांस दिलेेल्या दर्शनापश्चात त्यांच्यात सामुहिकरित्या निर्विवाद घडून आला. त्याच्या वधस्तंभारोहणानंतर लगेच, जीवाच्या भितीने ते जाऊन लपले. पुररुत्थानांनंतर ते रस्त्यावर आले आणि अतोनात छळ होत असतांनाही त्यांनी धैर्याने पुनरुत्थानाची घोषणा केली. त्यांच्या ह्या अचानक आणि नाट्यपूर्ण बदलाचे काय कारण असू शकते? निश्चितच आर्थिक लाभ नाही. प्रेषितांनी पुनरुत्थानाचा प्रचार करण्यासाठी सर्वकाही त्यागिले, त्यांचे जीवनसुद्धा.

ख्रिस्ताच्या पुररुत्थानाचा दुसरा पुरावा

पुनरुत्थानाच्या दुसऱ्या पुराव्याचा संबंध काही संशयवादीचे परिवर्तन होय, त्यात उल्लेखनीय म्हणजे पौल आणि याकोब. पौलाने स्वतः कबूल केले की तो प्रारंभिक मंडळीचा छळ करीत असे. ज्यास तो पुनरुत्थित ख्रिस्ताशी भेट म्हणून वर्णन करतो, त्यानंतर पौलाने मंडळीचा अतोनात छळ करण्यापासून लगेच आणि अतिशय बदल अनुभव केला आणि तो ख्रिस्ती धर्माचा विशेष आणि निस्वार्थ पक्षधर बनला. अनेक प्रारंभिक ख्रिस्ती लोकांप्रमाणे, पौलाने ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाप्रत त्याच्या स्थिर बांधिलकीमुळे दारिद्रय, छळ, मारहाण, तुरुंगवास, आणि मृत्यूदंड सोसला.

याकोब जरी पौलाप्रमाणे शत्रुत्वपूर्ण नसला तरीही नास्तिक होता. पुनरुत्थानांनंतर ख्रिस्ताची भेट झाल्यामुळे तो अपरिहार्य विश्वासणारा, यरूशलेमेतील मंडळीचा पुढारी बनला. प्रारंभिक मंडळीला लिहिलेले एक पत्र अद्याप आमच्याजवळ आहे जे त्याने लिहिले असल्याचे विद्यमान मान्य करतात. पौलाप्रमाणे, याकोबाने आपल्या साक्षीसाठी स्वच्छेने दुःख सोसले आणि मरणपत करले, ही वस्तुस्थिती त्याच्या विश्वासाच्या खरेपणास प्रमाणित करते (पहा The Book of Acts and Josephus’ Antiquities of the Jews XX, ix, 1½.

ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा तिसरा आणि चौथा पुरावा

तिसर्या आणि चौथ्या पुराव्याचा संबंध रिकाम्या कबरेसंबंधी शत्रूचे प्रमाणिकरण आणि ही वस्तुस्थिती होय की पुनरुत्थानावरील विश्वास यरूशलेमात दृढमूल झाला, त्याच्या देह अद्याप कबरेत असतांना जेथे सन्हेद्रिनला ते प्रकाशात आणता आले असते, लोकांसमोर मांडला आले असते, आणि अशाप्रकारे ती लबाडी उघडकीस आणता आली असती. पण त्याऐवजी, सन्हेद्रिनने देह चोरून नेल्याचा शिष्यांवर आरोप लावला, स्पष्टपणे तो देह अदृश्य झाल्याचे स्पष्टीकरण करण्याच्या प्रयत्नात (आणि म्हणून रिकाम्या कबरेचे). रिकाम्या कबरेचे तथ्य आपण कसे समजावू शकतो? येथे तीन अत्यंत सामान्य स्पष्टीकरणे आहेत:

सर्वप्रथम, शिष्यांनी देह चोरून नेला. जर असे असते, तर त्यांना माहित असते की पुररुत्थान ही एक लबाडी आहे. म्हणून त्यासाठी ते दुःख सहावयास व मरावयास इतके इच्छुक नसते. (खर्या प्रत्यक्षदर्शी साक्षीशी संबंधत पहिला पुरावा पहा.) सर्व तथाकथित प्रत्यक्षदर्शींनी जाणले असते की खरोखर ख्रिस्ताला पाहिलेले आणि ते खोटे बोलत आहेत. इतके लोक कारस्तान रचत असतांना निश्चितच कोणीतरी कबूल केले असते, कदाचित स्वतःच्या दुःखाचा शेवट करण्यासाठी नसले तरी आपल्या मित्रांच्या आणि कुटुंबियांचा दुःखाचा अंत करण्यासाठी. ख्रिस्ती विश्वासणार्यांना अत्यंत क्रूर वागणूक देण्यात आली, विशेषेकरून सन 64 मध्ये रोममध्ये लागलेल्या आगीनंतर (आपल्या राजमहालाच्या विस्तारासाठी जागा करण्याकरिता नीरोने आग लावण्याचा आदेश दिला होता, पण स्वतःला निर्दोष ठरविण्याच्या प्रयत्नात त्याने रोममधील ख्रिस्ती लोकांवर आग लावल्याचा आरोप लावला). रोमन इतिहासकार कर्नेलियस टॅसिटस याने रोमन साम्राज्याची बखर या आपल्या पुस्तकात वर्णन केल (आगीच्या प्रसंगानंतर फक्त एक पिढीपश्चात):

”नीरोने आपल्या अपराधाबद्दल घृणास्पद वर्गावर दोष लावला आणि त्यांच्यावर अतोनात अत्याचार केले ज्यांस जनसामान्य ख्रिस्ती म्हणत. क्रिस्टसला, ज्यापासून ख्रिस्ती हे नाव उद्भवले आहे, तिबेरियसच्या कारकिर्दीत आमच्या एका सूबेदाराद्वारे, पंतय पिलाताद्वारे अत्यंत दंड भोगावा लागला, आणि काही क्षणाकरिता ही अत्यंत खोडसळ अंधश्रद्धा ताबयात आणली गेली, पण पुन्हा त्याचा उद्रेक यहूदियामध्येच नव्हे तर रोममध्ये सुद्धा झाला, जिथे जगातील प्रत्येक भागातून घृणास्पद आणि लज्जास्पद सर्व गोष्टींस त्यांचे केंद्र लाभते आणि प्रसिद्धी प्राप्त होते. त्यानुसार, दोषी ठरविलेल्या सर्वांना प्रथम अटक करण्यात आली; त्यानंतर, त्यांच्या माहितीवरून, प्रचंड जनसमुदायास दोषी ठरविण्यात आलेे, शहरास आग लावण्याच्या गुन्ह्यामुळे नव्हे, तर मानवजातीविरूद्ध द्वेषापोटी. त्यांच्या मृत्यूमध्ये प्रत्येक प्रकारची थट्टा केली गेली. प्राण्यांच्या कातड्यांमध्ये त्यांना शिवण्यात आले, त्यांच्यावर कुत्री सोडण्यात आली आणि त्यांना ठार मारले गेले, किंवा त्यांना वधस्तंभावर खिळले गेले, किंवा दिवस मावळल्यानंतर रात्रीचा प्रकाश देण्यासाठी त्यांना आगीत टाकून जाळून टाकण्यात आले.” (।ददंसेए ग्टए 44)

नीरोने ख्रिस्ती लोकांस जिवंत जाळले आणि त्या अग्नीच्या प्रकाशात आपल्या बागेस प्रकाशित केले. खरोखरच एखाद्याने अशा भयानक वेदनाच्या धमकीखाली सत्याची कबुली दिली असती. तथापि, खरी गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रारंभिक ख्रिस्ती व्यक्तीने आपले दुःख संपविण्यासाठी विश्वासाचा त्याग केल्याची नोंद नाही. त्याऐवजी, आपल्याकडे पुनरुत्थानानंतर ख्रिस्ताने दर्शन दिल्याचे आणि शेकडो प्रत्यक्षदर्शी यातना भोगायला आणि मरण्यासाठी इच्छुक होते याचे अनेक अहवाल आहेत.

जर शिष्यांनी शरीर चोरून नेले नाही तर रिकाम्या थडग्याचे आपण कसे स्पष्टीकरण करू शकतो? काहींनी असे सुचवले आहे की ख्रिस्ताने बनावटी मृत्यू सहन केला आणि नंतर थडग्यातून निसटला. हे स्पष्टपणे हास्यास्पद आहे. प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीनुसार ख्रिस्ताला मारहाण केली गेली, छळ करण्यात आला, फटक्याने मारण्यात आले आणि भाला भोसकण्यात आला. त्याला आंतरिक इजा झाली, मोठ्या प्रमाणात रक्त वाहिले, श्वासोच्छ्वास आणि त्याच्या हृदयातून एक भाला सोसावा लागला. येशू ख्रिस्त (किंवा त्या दृष्टीने पाहता कोणताही माणूस) अशा प्रकारच्या परीक्षेत टिकून राहू शकेल, तीन दिवस आणि रात्री वैद्यकीय उपचार, अन्न किंवा पाणी न घेता थडग्यात बसून राहील, विशाल दगड काढ शकेल ज्याने त्याच्या थडग्यावर शिक्कामोर्तब केले, आणि कोणाचाही लक्षात न येता तेथून निसटून जाईल (रक्ताचा माग न सोडता), आणि शेकडो प्रत्यक्षदर्शींना खात्री पटवू शकेल की तो मरणातून पुन्हा जिवंत झाला आहे, आणि त्याची प्रकृती उत्तम आहे , आणि कुठलाही माग न सोडता नंतर अदृश्य होतो असा विश्वास ठेवण्याचे कोणतेही चांगले कारण नाही. अशी कल्पना हास्यास्पद आहे.

ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाचा पाचवा पुरावा

ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाचा पाचवा पुरावा प्रत्यक्षदर्शी साक्षीच्या विशिष्टतेशी संबंधित आहे. पुनरुत्थानाच्या सर्व प्रमुख वृतांतांत, महिलांना प्रथम आणि प्राथमिक प्रत्यक्षदर्शी म्हणून श्रेय दिले जाते. हा एक विचित्र अविष्कार असेल कारण प्राचीन यहूदी आणि रोमन या दोन्ही संस्कृतीत स्त्रियांचा अत्यंत तिरस्कार केला जात असे. त्यांची साक्ष अनिश्चित आणि खारीज करण्यायोग्य मानली जात असे. ही सत्यता लक्षात घेतल्यास, पहिल्या शतकातील यहूदियामध्ये खोटी समजूत मांडणार््या कोणत्याही इसमाने महिलांना त्यांचे प्राथमिक साक्षीदार म्हणून निवडले असेल हे अशक्य आहे. येशूचे पुनरुत्थान झाल्याचा दावा करणाऱ्या सर्व पुरुष शिष्यांपैकी, जर ते सर्व खोटे बोलत असतील आणि पुनरुत्थान घोटाळा असेल, तर त्यांनी सर्वात चुकीच्या-अविश्वसनीय आणि अविश्वासू साक्षीदारांना का निवडले?

डॉ. विल्यम लेन क्रेग स्पष्टीकरण देतात, “जेव्हा आपल्याला पहिल्या शतकातील यहूदी समाजातील स्त्रियांची भूमिका समजते तेव्हा या रिकाम्या थडगेच्या कथेत स्त्रियांना प्रथमतः रिकाम्या थडग्याचे शोध करणारे म्हणून दर्शविले जावे हे खरोखर असामान्य आहे. पहिल्या शतकातील पॅलेस्टाईनमध्ये महिला सामाजिक शिडीच्या अगदी खालच्या पायरीवर होत्या. रब्बींनी मांडलेल्या अनेक जुन्या म्हणी आहेत ज्या म्हणतात “नियमशास्त्राची वचने स्त्रियांना देण्यापेक्षा जाळून टाकण्यात यावी” आणि “धन्य तो पुरुष ज्याला मुलगे आहेत, पण त्याला धिक्कार असो, ज्याची मुली आहेत.“ स्त्रियांची साक्ष इतकी निकामी मानली जात असे की त्यांना यहूदी कायद्याच्या न्यायालयात कायदेशीर साक्षीदार म्हणून मान्यता दिली जात नसे. या प्रकाशात, हे अगदी उल्लेखनीय आहे की रिकाम्या कबरेचे मुख्य साक्षीदार या स्त्रिया आहेत ... नंतरच्या कोणत्याही कल्पित अहवालात पुरुष शिष्यांनी थडगे शोधून काढल्याचे नक्कीच वर्णन केले असावे - उदाहरणार्थ, पेत्र किंवा योहान. रिकाम्या थडग्याच्या स्त्रिया प्रथम साक्षीदार आहेत ही वस्तुस्थिती वास्तविकतेद्वारे स्पष्ट केली गेली आहे - हे आवडो किंवा न आवडो - ते रिकाम्या थडग्याचा शोध लावणारे होते! हे दर्शविते की शुभवर्तमानाच्या लेखकांनी लाजीरवाणी वाटत असले तरीही जे घडले ते विश्वासपूर्वक नोंदवले. हे या परंपरेच्या कल्पित दंतकथेपेक्षा त्याच्या ऐतिहासिकतेस संबोधित करते.” (Dr. William Lane Craig, Lee Strobel द्वारे उद्धृत, The Case For Christ, Grand Rapids: Zondervan, 1998, p. 293)

सारांश

हे पुरावे: प्रत्यक्षदर्शींची (आणि प्रेषितांच्या बाबतीत, लक्षवेधक, स्पष्ट न करता येणारा बदल) मुख्य विरोधकांचे रूपांतरण आणि प्रात्यक्षिक प्रामाणिकपणा- आणि संशयवादींचे - रक्तसाक्षी होणे, रिकाम्या थडग्याचे सत्य, रिकाम्या थडग्याचे शत्रूचे प्रमाणीकरण, हे सर्व यरूशलेमेत घडले जिथे पुनरुत्थानावर विश्वास वाढला आणि भरभराट झाली, ऐतिहासिक संदर्भात दिल्या गेलेल्या स्त्रियांच्या साक्षीचे महत्व, या सर्वांनी पुनरुत्थानाच्या ऐतिहासिकतेची जोरदार साक्ष दिली. आम्ही आमच्या वाचकांना या पुराव्यांचा विचारपूर्वक विचार करण्यास प्रोत्साहित करतो. ते आपल्याला काय सुचवतात? त्यांच्याबद्दल स्वतः विचार केल्यावर, आम्ही सर लिओनेलच्या घोषणेची दृढनिश्चिती करतो:

“येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा पुरावा इतका जबरदस्त आहे की तो पुराव्यानिशी स्वीकृत करण्यास भाग पाडतो ज्यामुळे संशय घेण्यास मुळीच जागा राहत नाही.“

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मी ख्रिस्ताच्या पुनरूत्थानावर विश्वास का ठेवावा?
© Copyright Got Questions Ministries