प्रश्नः
पत्नी शोधताना मी तिच्यामध्ये काय पाहायला हवे?
उत्तरः
येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाशी असलेल्या आत्मिक नातेसंबंधाच्या बाहेर एखाद्या मनुष्याचे सर्वात महत्वाचे वैयक्तिक नाते कोणते असेल तर, ते त्याचे त्याच्या पत्नीसोबत असलेले नाते. पत्नी शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये, एखाद्या स्त्रीमध्ये पहायचा उच्च सिद्धांत म्हणजे तिचा येशू ख्रिस्तावर असलेला वैयक्तिक विश्वास. प्रेषित पौल आपल्याला सांगतो की अविश्वासणाऱ्या बरोबर “असमान रीतीने जोडलेले” असे असू नका (2 करिंथ 6:14). जो पर्यंत एका स्त्रीचे आणि पुरुषाचे या महत्वपूर्ण मुद्द्यावर एकमत होत नाही तोपर्यंत एक दैवी आणि परिपूर्ण लग्न घडू शकत नाही.
तथापि, सहविश्वासूबरोबर लग्न करणे हे “समान रीतीने जोडलेले” असल्याच्या पूर्ण अनुभवाची हमी देत नाही. एक स्त्री ही ख्रिस्ती आहे याचा अर्थ असा होत नाही की ती तुमच्यासाठी आत्मिकरीतीने अपरिहार्यपणे योग्य जोडीदार आहे. जसे तुमचे अध्यात्मिक ध्येय आहेत तसेच तिचे पण आहेत काय? तुम्ही ज्या सिद्धांतावर विश्वास ठेवता त्याच सिद्धांतावर तिचा विश्वास आहे काय? जशी तुमची देवासाठी तीव्र भावना आहे तशीच तिची सुद्धा आहे काय? संभाव्य पत्नीचे गुण अत्यंत महत्वपूर्ण आहेत. बरेच पुरुष फक्त भावनिक किंवा शारीरिक आकर्षनासाठी लग्न करतात आणि ती अपयशाची कृती असू शकते.
कोणते असे दैवी गुण आहेत ज्यांना एखादा पुरुष त्याच्या पत्नीमध्ये पाहू शकतो? वचन आपल्याला काही मार्गदर्शक तत्वे देते ज्यांचा उपयोग आपण दैवी स्त्रीचे चित्र तयार करण्यासाठी करू शकतो. ती पहिल्यांदा देवाबरोबरच्या तिच्या वैयक्तिक नातेसंबंधात समर्पित असली पाहिजे. प्रेषित पौल पत्नींना सांगतो की, ज्या प्रकारे त्या देवाच्या अधीन आहेत त्याच प्रकारे त्यांनी त्यांच्या पतीच्या अधीन असले पाहिजे (इफिस 5:22-24). जर एखादी स्त्री देवाच्या अधीन नसेल तर, तिच्या आत्मिक आरोग्यासाठी तिच्या पतीच्या अधीन जाणे ती आवश्यक मानणार नाही. जोपर्यंत आपण देवाला त्याने स्वतः आपल्याला भरण्याची परवानगी आपण त्याला देणार नाही, तोपर्यंत आपण कोना एकाच्या अपेक्षांना पूर्ण करू शकणार नाही. एक स्त्री जिच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी देव आहे ती पत्नी होण्यासाठी चांगली उमेदवार आहे.
पौल मंडळींमधील पुढाऱ्यांबद्दलच्या त्याच्या सूचनांमध्ये स्त्रीसाठी सुद्धा काही विशेष गुणांना सांगतो. “तसेच, स्त्रिया गंभीर असाव्या, चहाड नसाव्या, नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्या” (1 तीमथ्या 3:11). दुसऱ्या शब्दात, ही अशी स्त्री आहे जी अति गर्विष्ठ नाही, कधी बोलायचे आणि कधी शांत राहायचे हे तिला ठाऊक आहे, आणि ती तिच्या पतीच्या बाजूची तिची जागा आत्मविश्वासाने घेण्यास सक्षम आहे. ती अशी स्त्री आहे जिचे पहिले लक्ष्य तिच्या देवाबरोबरच्या नातेसंबंधांवर आणि तिच्या आत्मिक वाढीवर केंद्रित आहे.
लग्नाच्या जबाबदाऱ्या पतीवर जास्त असतात, कारण देवाच्या क्रमामध्ये त्याने पतीला त्याच्या पत्नीवर आणि त्याच्या कुटुंबावर मुख्य असे नेमले आहे. हे मुख्य पद ख्रिस्त आणि मंडळीमधील नातेसंबंधाच्या नंतर तयार केले गेले आहे (इफिस 5:25-35). हे असे नातेसंबंध आहे जे प्रेमात मुळावलेले आहे. जसे ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम केले आणि तिच्यासाठी स्वतःला दिले, तसेच पती जसा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो तसेच त्याने त्याच्या पत्नीवर सुद्धा केले पाहिजे. म्हणून, एखाद्या मनुष्याच्या लग्नाच्या आणि कुटुंबाच्या यशासाठी त्याच्या देवाबरोबरचा वैयक्तिक आत्मिक नातेसंबंधाला सर्वोच्च महत्व आहे. आपल्या लग्नाच्या उन्नतीसाठी बलिदान देण्याची तयारी आणि सेवक होण्याचे निवडण्याचे सामर्थ्य हे एका परिपक्व आत्मिक मनुष्याची जो देवाचा सन्मान करतो त्याची चिन्हे आहेत. पवित्र शास्त्रातील गुणांच्या आधारावर शहाणपणाने पत्नीची निवड करणे हे महत्वाचे आहे, परंतु पुरुषाची स्वतःची सुरु असलेली आत्मिक वाढ आणि त्याच्या आयुष्यात देवाच्या असलेल्या इच्छेला त्याचे समर्पण हे देखील तितकेच महत्वाचे आहे. एक मनुष्य जो त्याने जसे असावे अशी देवाची इच्छा आहे त्याचा शोध घेतो, तो त्याच्या पत्नीला जशी ती असावी अशी देवाची इच्छा आहे तशी बनण्यास, आणि जशी देव, त्याची, आणि त्याच्या पत्नीची इच्छा आहे तसे ऐक्यामध्ये लग्नाला बांधण्यास सक्षम असतो.
English
पत्नी शोधताना मी तिच्यामध्ये काय पाहायला हवे?