settings icon
share icon
प्रश्नः

पत्नीस आपल्या पतीच्या अधीन राहिले पाहिजे काय?

उत्तरः


अधीनता ही वैवाहिक जीवनाच्या संबंधात एक महत्वपूर्ण बाब आहे. येथे बायबलची स्पष्ट आज्ञा दिलेली आहे : "स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचें मस्तक आहे, तसा पति पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीहि सर्व गोष्टींत आपआपल्या पतीच्या अधीन असावे" (इफिसकरांस पत्र 5:22-24)

पापाचा जगात प्रवेश होण्यापूर्वीही, पुरुष हा मस्तक असल्याचा सिद्धांत होताच (तीमथ्याला 1 ले पत्र 2:13). आदामास सर्वप्रथम घडविण्यात आले, आणि हव्वेला आदामाचा "साहाय्यक" म्हणून घडविण्यात आले (उत्पत्ति 2:18-20). देवाने जगात अनेकप्रकारचे अधिकार स्थापित केले आहेत : समाजात न्याय अमलात आणण्यासाठी आणि संरक्षण देण्यासाठी सरकारे; देवाच्या मेंढरांचे मार्गदर्शन करण्यासाठी आणि मेंढरांस चारण्यासाठी पाळक अथवा मेंढपाळ; पत्नीवर प्रीती करण्यासाठी आणि त्यांचे पोषण करण्यासाठी पती; मुलांस शिकविण्यासाठी पिता. प्रत्येक बाबतीत, अधीनतेची गरज आहे : सरकारप्रत नागरिक, मेंढपाळांप्रत मेंढरे, पतीप्रत पत्नी, पित्याप्रत मूल.

ज्या ग्रीक शब्दाचे ह्यूपोटेसो भाषांतर "अधीन होणे" असे करण्यात आले आहे, तो शब्द क्रियापदाचे पुढे सुरू राहणारे रूप आहे. याचा अर्थ हा की देवाच्या, सरकारच्या, पाळकाच्या, किंवा पतीच्या अधीन राहणे हे एका वेळेचे काम नाही. ही नित्यची प्रवृत्ती आहे, जी नेहमीचे वर्तन ठरते.

अर्थात, सर्वप्रथम, देवाच्या अधीन व्हावयास आम्ही जबाबदार आहोत, केवळ त्याच पद्धतीने आम्ही खरोखर त्याच्या आज्ञेचे पालन करू शकतो (याकोबाचे पत्र 1:21; 4:7). आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने दीन व्हावे, इतरांच्या अधीन राहावयास तयार असावे (इफिसकरांस पत्र 5:21). कौटुंबिक एककांतर्गत अधीनतेच्या संबंधाने, करिंथकरांस 1 ले पत्र 11:2-3 म्हणते, की पतीने ख्रिस्ताच्या अधीन असावे (जसा ख्रिस्त देव पित्याच्या) आणि पत्नीने पतीच्या अधीन असावे.

आज पती आणि पत्नीच्या भूमिकासंबंधाने जगात फार गैरसमज आहेत. बायबलच्या भूमिकांस योग्यप्रकारे समजले जात असतांना देखील अनेक लोक स्त्रियांच्या तथाकथित "स्वातत्र्याच्या" नावाने त्यांचा नाकार करतात, ज्याचा परिणाम म्हणून कुटूंबास हादरा बसतो. यात आश्चर्याची गोष्ट नाही की जग देवाच्या योजनेचा नाकार करते, पण देवाच्या लोकांनी त्या योजनेविषयी उल्लास करावा.

अधीन होणे हा वाईट शब्द नाही. अधीनता हे कनिष्ठतेचे अथवा कमी मूल्याचे प्रतिबिंब नाही. ख्रिस्ताने आपले थोडेही मूल्य न त्यागता, स्वतःला सतत पित्याच्या इच्छेच्या अधीन केले (लूक 22:42; योहान 5:30)।

पतीप्रत पत्नीच्या अधीनतेसंबंधाने जगाच्या चुकीच्या माहितीचा विरोध करण्यासाठी, आम्ही विचारपूर्वक इफिसकरांस पत्र 5:22-24 मधील खालील बाबींकडे लक्ष द्यावे : 1) पत्नीस एका पुरुषाच्या (तिच्या पतीच्या) अधीन राहावयाचे आहे, प्रत्येक पुरुषाच्या नाही. अधीन होण्याच्या भूमिकेचा विस्तार एकंदर समाजातील स्त्रीच्या स्थानापर्यंत नाही. 2) पत्नीने प्रभू येशूची व्यक्तिगत आज्ञा म्हणून पतीच्या अधीन राहावयास तयार असले पाहिजे. ती त्याच्या अधीन राहते कारण ती येशूवर प्रेम करते. 3) पत्नीच्या अधीनतेचे उदाहरण मंडळीचे ख्रिस्ताच्या अधीन राहणे होय. 4) पत्नीच्या योग्यतेविषयी, गुणांविषयी, अथवा मोलाविषयी काहीही म्हटलेले नाही; ती आपल्या स्वतःच्या पतीच्या अधीन राहते हे असे सूचवीत नाही की ती कुठल्याही पद्धतीने कनिष्ठ अथवा कमी मूल्यवान आहे. तसेच या गोष्टीकडे लक्ष द्या की अधीन राहण्याच्या आज्ञेसाठी कोणतीही पात्रता नाही, फक्त "सर्व बाबतीत" अधीन राहावयाचे आहे. अशाप्रकारे, पत्नीने पतीच्या अधीन व्हावे म्हणून त्याला कुठल्या अभिक्षमतेत अथवा बुद्धिमत्ता चाचणीत उत्तीर्ण होण्याची गरज नाही. हे सत्य असू शकते की अनेक बाबतीत नेतृत्व करण्यासाठी ती त्याच्यापेक्षा अधिक गुणवत्ता प्राप्त असेल, पण पतीच्या नेतृत्वाच्या अधीन राहून प्रभूच्या आज्ञेचे अनुसरण करावयाचा ती निर्णय घेते. असे करण्याद्वारे, नीतिमान पत्नी आपल्या अविश्वासू पतीला "शब्दांवाचून" केवळ आपल्या पवित्र वर्तनाने जिंकू शकते (पेत्राचे 1 ले पत्र 3:1).

अधीनता प्रेमळ नेतृत्वाप्रत स्वाभाविक प्रतिसाद असला पाहिजे. जेव्हा पती आपल्या पत्नीवर प्रीती करतो जशी ख्रिस्त आपल्या मंडळीवर करतो (इफिसकरांस पत्र 5:25-31), तेव्हा अधीनता ही पत्नीकडून तिच्या पतीला मिळालेला स्वाभाविक प्रतिसाद असतो. परंतु, पतीची प्रीती असतांनाही अथवा त्याची उणीव असतांनाही, पत्नीला आज्ञा देण्यात आली आहे की तिने "जसे प्रभूच्या" तसे त्याच्या अधीन असावे (वचन 22). याचा अर्थ हा की देवाप्रत तिच्या आज्ञापालनाचा — त्याच्या योजनेचा तिच्याद्वारे स्वीकार — परिणाम पतीप्रत तिच्या अधीनतेत होईल. "जसे प्रभूच्या" ही तुलना पत्नीस हे स्मरण घडवून देते की आणखी उच्च अधिकार आहे ज्यास ती जबाबदार आहे. अशाप्रकारे, पतीच्या "अधीन असण्याच्या" नावात ती दिवाणी कायद्याचे अथवा देवाच्या नियमाचे उल्लंघन करण्यास बाध्य नाही. ज्या गोष्टी योग्य आणि कायदेशीर व देवास आदर देणार्‍या आहेत त्यांच्या ती अधीन राहते. अर्थात, ती गैरवर्तन करण्यासाठी "अधीन राहत" नाही — ते योग्य आणि कायदेशीर व देवास आदर देणारे नाही. गैरवर्तनाचे समर्थन करण्यासाठी "अधीनतेच्या" सिद्धांताचा उपयोग करण्याचा प्रयत्न करणे पवित्र शास्त्राचा विपर्यास करणे आणि वाईटास प्रोत्साहन देणे होय.

इफिस 5 मध्ये पत्नीचे पतीच्या अधीन राहणे पतीला स्वार्थी होण्याची अथवा वर्चस्व गाजविण्याची मुभा देत नाही. त्याची आज्ञा आहे प्रीती करणे (वचन 25), आणि ती आज्ञा पूर्ण करावयास तो देवासमोर जबाबदार आहे. पतीने समंजसपणे, कृपेने, आणि ज्याला त्यास आपला हिशेब द्यावयाचा आहे त्या देवाच्या भयात राहून आपल्या अधिकाराचा उपयोग करावा.

जेव्हा पती आपल्या पत्नीवर अशी प्रीती करतो जशी ख्रिस्ताने आपल्या मंडळीवर केली, तेव्हा अधीन राहणे कठीण जात नाही. इफिसकरांस पत्र 5:24 म्हणते, "तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींत आपआपल्या पतीच्या अधीन असावे." वैवाहिक जीवनात, अधीनता पतीला मान व आदर देण्याचे (पाहा इफिसकरांस पत्र 5:33) आणि ज्यात तो उणा आहे ते पूर्ण करणारे स्थान आहे. कुटूंबाने कसे कार्य केले पाहिजे ही देवाची बुद्धियुक्त योजना आहे.

भाष्यकार मॅथ्यू हेन्री यांनी लिहिले आहे, "स्त्रीला पुरुषाच्या कुशीतून काढण्यात आले. तिला त्याच्या डोक्यातून काढण्यात आले नाही की त्याने तिच्यावर प्रभुत्व गाजवावे, पायातूनही काढण्यात आले नाही की त्याने तिला पायदळी तुडवावे, तर तिला त्याच्या कुशीतून काढण्यात आले की तिने त्याच्या बरोबरीचे असावे, त्याच्या बाहूपाशांखाली असावे की तिचे रक्षण व्हावे, आणि त्याच्या अंतःकरणाच्या जवळ असावे की त्याने तिजवर प्रीती करावी." इफिसकरांस पत्र 5:19-33 मध्ये पती व पत्नीस देण्यात आलेल्या आज्ञेच्या निकट संदर्भात आत्म्याने परिपूर्ण होण्याचा समावेश आहे. आत्म्याने युक्त विश्वासणार्यांनी उपासना करणारे (5:19), उपकारस्तवन करणारे (5:20), आणि नम्र असावे (5:21). मग पौल आत्म्याने युक्त जीवनाचा पुढे विचार करतो आणि 22-24 मध्ये ते पत्नींस लागू करतो. पत्नीने पतीच्या अधीन असावे, स्त्रिया कनिष्ठ आहेत म्हणून नव्हे (बायबल कधीही हे शिकवीत नाही), तर देवाने वैवाहिक नातेसंबंध अशाचप्रकारे घडिले आहेत.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पत्नीस आपल्या पतीच्या अधीन राहिले पाहिजे काय?
© Copyright Got Questions Ministries