settings icon
share icon
प्रश्नः

शास्त्रसम्मत पवित्र शास्त्र काय आहे?

उत्तरः


“कॅनन” हा शब्द कायद्याच्या नियमातून आला आहे ज्याचा उपयोग पुस्तक विशिष्ट मानकापर्यंत मूल्यांकन केले जाऊ शकते की नाही हे निर्धारित करण्यासाठी केला जात असे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की पवित्र शास्त्रातील लिखाण लिहिण्याच्या क्षणी प्रामाणिक होते. जेव्हा लेखणीने चर्मपत्रास स्पर्श केला तेव्हा पवित्र शास्त्र हे शास्त्र होते. हे फार महत्वाचे आहे कारण ख्रिस्ती विश्वासाची सुरूवात देव, येशू ख्रिस्त किंवा तारण यांची व्याख्या करण्याद्वारे केली जात नाही. ख्रिस्ती विश्वासाचा आधार पवित्र शास्त्राच्या अधिकारामध्ये आढळतो. जर पवित्र शास्त्र काय आहे हे आम्ही समजू शकत नाही, तर आम्ही कोणतेही ईश्वरशास्त्रीय सत्य त्रुटीपासून योग्यरित्या वेगळे करू शकत नाही.

शास्त्रवचनाप्रमाणे कोणत्या पुस्तकांचे वर्गीकरण केले पाहिजे हे निर्धारित करण्यासाठी कोणते माप किंवा मानक वापरले गेले? प्रक्रिया आणि हेतू समजून घेण्यासाठी आणि कदाचित पवित्रशास्त्र देण्याची वेळ समजून घेण्यासाठी महत्त्वाचे वचन आहे यहूदा 3 ज्यात असे म्हटले आहे की खिस्ती विश्वास “एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला” होता. आपला विश्वास पवित्र शास्त्राद्वारे परिभाषित केला गेलेला असल्यामुळे यहूदा मूलतः असे म्हणत आहे की सर्व ख्रिस्ती लोकांच्या हितासाठी एकदा पवित्रशास्त्र दिले गेले होते. अद्याप कोणतीही लपलेली किंवा हरवलेली हस्तलिखिते सापडली नाहीत हे जाणून घेणे आश्चर्यकारक नाही काय, कुठलीही गुप्त पुस्तके नाहीत जी केवळ काही मोजक्या लोकांनाच माहित असतील आणि असे कोणतेही लोक जिवंत नाहीत ज्यांना विशेष स्पष्टीकरण लाभले आहे ज्यासाठी आम्हाला बोध प्राप्त करण्याकरिता हिमालय पर्वतावर जाण्याची गरज आहे? आपल्याला खात्री आहे की देवाने आपल्याला साक्षीवाचून सोडलेले नाही. देव आपले वचन निर्माण करण्यासाठी उपयोग करीत असलेले तेच अलौकिक सामथ्र्य ते जतन करण्यासाठी देखील उपयोग केले जाते.

स्तोत्र 119:160 मध्ये असे म्हटले आहे की देवाचे संपूर्ण वचन सत्य आहे. त्या पूर्वभागापासून सुरूवात करून आपण शास्त्रसम्मत वचनांच्या बाहेरील लेखांची तुलना करून हे पाहू शकतो की ते कसोटीस बसते किंवा नाही. उदाहरणार्थ, बायबल असा दावा करते की येशू ख्रिस्त देव आहे (यशया 9:6-7; मत्तय 1:22-23; योहान 1:1, 2, 14, 20:28; प्रेषितांची कृत्ये 16:31, 34; फिलिप्पै 2:5-6; कलस्सै 2:9; तीत 213; इब्री 1:8; 2 पेत्र 1:1). परंतु पवित्रशास्त्र असल्याचा दावा करणारे बायबलव्यतिरिक्त अनेक ग्रंथ असा वाद घालतात की येशू देव नाही. जेव्हा स्पष्ट विरोधाभास अस्तित्त्वात असतात, तेव्हा स्थापित बायबलवर विश्वास ठेवावा लागेल आणि इतरांना पवित्रशास्त्राच्या बाहेरच ठेवावे लागेल.

चर्चच्या सुरुवातीच्या शतकांत ख्रिस्ती विश्वासणाÚयांजवळ पवित्रशास्त्राच्या प्रती मिळाल्यामुळे काही वेळा ठार मारलेे जात असे. या छळामुळे लवकरच हा प्रश्न आला, “कोणती पुस्तके आपल्या मरण्यास योग्य आहेत?” काही पुस्तकांमध्ये येशूने म्हटलेल्या गोष्टी असू शकतात, परंतु 2 तीमथ्य 3:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्या परमेश्वर निर्मित होत्या का? चर्च परिषदेने सार्वजनिकपणे शास्त्रवचनाची अधिकृत मान्यता ओळखण्यात भूमिका बजावली, परंतु बरेचदा स्वतंत्र चर्च किंवा चर्चच्या गटांनी एखादे पुस्तक त्यांच्या लिखाणावरून ते परमेश्वर निर्मित असल्याचे ओळखले (उदा. कलस्सै 1:16; 1 थेस्सल 5:27). चर्चच्या सुरुवातीच्या शतकांदरम्यान, काही पुस्तके सदा विवादित होती आणि ही यादी सन 303 पर्यंत मुळात निश्चित केली गेली.

जुन्या कराराचा विचार केला असता, तीन महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला गेला: 1) नवीन करारात दोन पुस्तके सोडून जुन्या करारातील प्रत्येक पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे परंतु दोन. 2) मत्तय 23:35 मध्ये जेव्हा येशूने त्याच्या काळातील शास्त्रवचनांमघील पहिल्या वर्णनाचा केले आणि त्यातील एका शेवटच्या वर्णनाचा उल्लेख केला तेव्हा त्याने इब्री कॅननचे प्रभावीपणे समर्थन केले. 3) यहूदी लोक जुन्या करारातील शास्त्रवचने जपण्याबाबत अत्यंत सावध होते आणि कोणते भाग पवित्रशास्त्रात आहेत किंवा कोणते नाहीत यावर त्यांचे फार थोडके वाद होते. रोमन कॅथोलिक अपोक्रायफा या मानकास खरे ठरले नाही आणि पवित्र शास्त्राच्या व्याख्येबाहेर पडले आणि यहूद्यांनी त्याचा कधीही स्वीकार केला नाही.

बायबलमध्ये कोणती पुस्तके आहेत याविषयीचे बहुतेक प्रश्न ख्रिस्ताच्या काळातील आणि त्यानंतरच्या लिखाणांशी संबंधीत आहेत. कोणती पुस्तके नवीन कराराचा भाग म्हणून मानली जावी याविषयी प्रारंभिक चर्चकडे काही विशिष्ट निकष होते. यामध्ये हे समाविष्ट आहेत: येशू ख्रिस्ताचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या एखाद्या व्यक्तीने हे पुस्तक लिहिले होते काय? पुस्तक “सत्य चाचणीत” उत्तीर्ण झाले का? (म्हणजे, शास्त्रवचनांशी आधीच सहमत असलेल्या पवित्रशास्त्राशी त्याचे सामंजस्य बसते काय?). त्यावेळी त्यांनी स्वीकारलेल्या नवीन कराराच्या पुस्तकांनी काळाची कसोटी सहन केली आहे आणि खिस्ती रूढीवाद्यांनी शतकानुशतके फार कमी आव्हानासह त्यांचा स्वीकार केला आहे.

विशिष्ट पुस्तकांच्या स्वीकृतीवरील आत्मविश्वासाचा समय पहिल्या शतकातील प्राप्तकर्त्यांचा आहे ज्यांनी त्यांच्या सत्यतेबद्दल स्वतः साक्ष दिली. याशिवाय, प्रकटीकरणाच्या पुस्तकाची अंतिम वेळची विषयवस्तू, आणि प्रकटीकरण 22:18 मधील पुस्तकाच्या शब्दात भर घालण्याची मनाई, कठोर वाद घालते की त्याच्या लिहिण्याच्या वेळी कॅनन बंद झाला होता (इ.स. 95).

एक महत्त्वपूर्ण ईश्वरविज्ञानविषयक मुद्दा आहे जो चुकता कामा नये. स्वतःला प्रकट करण्यासाठी आणि मानवजातीशी संवाद साधण्यासाठी - देवाने आपला शब्द सहस्रावधीसाठी वापरला आहे. शेवटी चर्च मंडळांनी एखादे पुस्तक पवित्र शास्त्र होते की नाही हे ठरवले नाही; जेव्हा मानवी लेखकाची लिहिण्यासाठी देवाने निवड केली तेव्हा हे निश्चित झाले. शतकानुशतके त्याचे वचन जतन करण्यासह अंतिम परिणाम साध्य करण्यासाठी, देवाने कॅनन अर्थात शास्त्रसम्मत वचनास मान्यता देण्यास प्रारंभिक चर्चच्या परिषदेचे मार्गदर्शन केले.

देवाचे खरे स्वरुप, विश्वाचा आणि जीवनाचा आरंभ, जीवनाचे उद्दीष्ट आणि अर्थ, तारणाचे चमत्कार आणि भविष्यातील घटना (मानवजातीच्या भविष्यासह) यासारख्या गोष्टींविषयी ज्ञानाची प्राप्ती नैसर्गिक निरीक्षणाच्या आणि मानवजातीच्या वैज्ञानिक क्षमतेच्या पलीकडे आहे. आधीच देण्यात आलेले देवाचे वचन, ख्रिस्ती लोकांनी शतकानुशतके मौल्यवान समजलेले आणि वैयक्तिकरित्या लागू केलेले देवाचे वचन, ख्रिस्ताविषयी आपल्याला जे माहित असले पाहिजे त्या सर्व गोष्टी आम्हास समजावून सांगण्यासाठी (योहान 5:18; प्रेषितांची कृत्ये 18:28; गलती 3:22; 2 तीमथ्य 3:15) आणि आम्हाला शिकवण्यासाठी, आम्हाला सुधारण्यासाठी, आणि आम्हाला सर्व नीतिमत्वासाठी शिकविण्यासाठी पुरेसे आहे (2 तीमथ्य 3:16).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

शास्त्रसम्मत पवित्र शास्त्र काय आहे?
© Copyright Got Questions Ministries