मरणानंतर जीवन आहे काय?प्रश्नः मरणानंतर जीवन आहे काय?

उत्तरः
मरणानंतर जीवन आहे काय? बायबल आम्हांला सांगते, ‘‘स्त्रीपासून जन्माला आलेला माणूस थोड्या दिवसांचाच आणि अडचणींनी भरलेला आहे. तो फुलासारखा उमलतो आणि कोमेजून जातो; क्षणभंगुर सावलीसारखा, तो टिकत नाही....जर माणूस मेला तर तो पुन्हा जगणार’’ (जॉब १४:१-२,१४).

जॉबप्रमाणे जवळजवळ आम्हा सर्वांनाच ह्या प्रश्नाने आव्हान दिले आहे. आम्ही मेल्यानंतर आम्हांला नेमके काय होते? आम्ही अस्तित्वात असण्याचेच केवळ थांबते का? जीवन म्हणजे वैयक्तिक मोठेपणा मिळविण्यासाठी पृथ्वीवर जाणे आणि येणे असे परिभ्रमण करणारा दरवाजा आहे का? सर्वजण एकाच जागी जात असतात की आम्ही सर्वजण वेगवेगळ्या जागी जातो? स्वर्ग आणि नरक खरोखरीच आहे का की ती नुसती मनाची स्थिती आहे?

बायबल आम्हांला सांगते, मरणानंतर केवळ जीवनच नव्हे तर चिरंतन जीवन आहे, इतके तेजस्वी की ‘‘कोणत्याही डोळ्याने पाहिले नाही, कोणत्याही कानाने ऐकले नाही, आणि कोणत्याही मनाने कल्पना केली नाही की भगवंताने त्यांच्यासाठी काय निर्माण केले आहे जे त्याच्यावर प्रेम करतात’’ (१ कोरेन्थियन्स २:९). येशू ख्रिस्त, शरीरधारी भगवंत आम्हांला चिरंतन जीवनाची ही भेट देण्यासाठी ह्या पृथ्वीतलावर आला. ‘‘पण, आमच्या अपराधांसाठी त्याला टोचण्यात आले, आमच्या अन्यायांसाठी त्याला अपमानीत करण्यात आले; आणि त्याच्या जखमांमुळे आमचा उपचार होतो’’ (इसाइयाह ५३:५).

आम्हां प्रत्येकास पात्र असलेली शिक्षा येशूने भोगली आणि आपल्या जीवनाचे बलिदान दिले. तीन दिवसांनंतर आत्मा आणि शरीराच्या स्वरूपात थडग्यातून वर येत त्याने मरणावर स्वतःला विजयी सिद्ध केले. तो चाळीस दिवस पृथ्वीवर राहिला आणि स्वर्गातील त्याच्या शाश्वत निवासाकडे जाण्यापूर्वी हजारोजण त्याचे साक्षीदार झाले. रोमन्स ४:२५ सांगते, ‘‘आमच्या पापांसाठी त्याला मृत्युकडे ढकलण्यात आले आणि आमच्या दोषनिराकरणासाठी त्याला पुन्हा जीवन देण्यात आले’’

येशूचे पुनरुत्थान ही एक उत्तमरित्या शब्दबद्ध केलेली घटना आहे. त्याच्या सत्यतेसाठी प्रेषित पॉलने प्रत्यक्षदर्शींना प्रश्न विचारण्याचे आव्हान लोकांना दिले, आणि त्याच्या सत्याशी कोणीही स्पर्धा करू शकले नाही. पुनरुत्थान ही ख्रिश्चन श्रद्धेची कोनशीला आहे; ख्रिस्ताला मरणातून वर काढण्यात आले, त्यामुळे आम्ही श्रद्धा बाळगू शकतो की आमचेही पुनरुत्थान होईल.

ह्याच्यावर विश्वास ठेवत नसलेल्या काही प्रारंभीच्या ख्रिश्चनांस पॉलने ताकीद दिली आहे; ‘‘ख्रिस्ताला मरणातून वर काढण्यात आले अशी शिकवण जर दिली जाते, तर तुमच्यापैकी काहीजण असे कसे म्हणू शकता की मेलेल्यांना पुनरुत्थान नाही? मेलेल्यांना पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तसुद्धा मरणातून वर आला नसता’’ (१ कोरेन्थियन्स १५:१२-३).

ते जे पुन्हा जीवनास वर येतील त्यांच्या भव्य सुगीमधील येशू हा केवळ पहिला होता. शारीरिक मरण एक माणूस, आदम, ज्याच्याशी आम्ही सर्वजण संबंधीत याच्यापासून आले. पण येशू ख्रिस्तामधील श्रद्धेद्वारा भगवंताच्या कुटुंबात स्वीकारलेल्या सर्वांना नवे जीवन देण्यात येईल (१ कोरेन्थियन्स १५:२०-२२). जसे भगवंताने येशूचे शरीर वर काढले, तसेच येशूच्या परत येण्यातून आमच्या शरीरांचेही पुनरुत्थान होईल (१ कोरेन्थियन्स ६:१४).

कालांतराने आमचे पुनरुत्थान होईल, पण आम्ही सर्वजण बरोबर स्वर्गात जाणार नाही. प्रत्येक माणसाने ह्या जीवनातच त्याला किंवा तिला चिरंतनत्वात कुठे जायचे आहे ह्याची निवड केली पाहिजे. बायबल सांगते की आम्हांला एकदाच मरण्याचे नेमून दिले आहे, आणि त्यानंतर येईल निवाडा ( हिब्रू ९:२७). ज्यांनी सदाचरण केले आहे ते सर्वजण चिरंतन जीवनासाठी स्वर्गात जातील, पण अश्रद्धाळूंना चिरंतन शिक्षेसाठी किंवा नरकात पाठविण्यात येईल (मॅथ्यू २५:४६).

नरक, स्वर्गासारखे अस्तित्वाची स्थिती नाही, तर अक्षरशः खरी जागा आहे. ती अशी जागा आहे जिथे दुराचरणी लोक भगवंताकडून न संपणारा असा चिरंतन क्रोधाचा अनुभव घेतील. ते भावनिक, मानसिक आणि शारीरिक यातना सोसतील, लज्जा, पश्चात्ताप आणि तिरस्काराच्या जाणीवेची पीडा त्यांना होईल.

नरकाचे वर्णन तळ नसलेला खळगा ( ल्युक ८:३१, रिवेलेशन ९:१), आणि सल्फरने धगधगणारे आगीचे तळे असा केले आहे, जिथल्या रहिवाशांना दिवसा आणि रात्री, चिरंतन यातना देण्यात येतील (रिवेलेशन २०:१०). नरकात तीव्र दुःख आणि संताप दाखविणारे असे रडणे आणि दात चावणे असेल (मॅथ्यू १३:४२). ही अशी जागा आहे जिथे किडा कधी मरत नाही आणि आग कधी विझत नाही (मार्क ९:४८). भगवंत दुष्टांच्या मरणाचा आनंद लुटत नाही, पण इच्छा ठेवतो की त्यानी वाईटाचा मार्ग सोडावा, जेणेकरून ते जगतील (इझेकियल ३३:११). पण शरण जाण्यासाठी तो आमच्यावर सक्ती करणार नाही; जर आम्ही त्याला नाकारण्याचा पर्याय निवडला तर आम्हांला पाहिजे ते देण्याशिवाय त्याच्याकडे खूपच कमी पर्याय आहेत – त्याच्यापासून दूर राहून जगण्याचा.

पृथ्वीवर जीवन म्हणजे एक परीक्षा आहे, पुढे काय येईल त्याच्यासाठी एक तयारी आहे. श्रद्धावानांसाठी हे भगवंताच्या अगदी जवळच्या उपस्थितीतील चिरंतन जीवन आहे. मग आम्ही सदाचरणी आणि हे चिरंतन जीवन प्राप्त करण्यासाठी लायक कसे बनविले जाऊ? केवळ एकच मार्ग आहे – भगवंताचा पुत्र येशू ख्रिस्तामध्ये विश्वास आणि श्रद्धा ठेवून. येशूने सांगितले आहे, ‘‘मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यामध्ये विश्वास ठेवतो तो जगेल, जरी तो मेला तरी; आणि जो कोणी जगतो आणि माझ्यामध्ये विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही...’’ (जॉन ११:२५-२६).

चिरंतन जीवनाची मोफत भेट सर्वांसाठी उपलब्ध आहे, पण त्यासाठी आम्ही काही ऐहिक सुखे नाकारण्याची आणि आम्हांला भगवंतापाशी त्यागण्याची आवश्यकता आहे. ‘‘जो कोणी पुत्रामध्ये विश्वास ठेवतो त्याला चिरंतन जीवन प्राप्त होईल, आणि जो पुत्राला नाकारणार तो जीवन पाहू शकणार नाही, कारण भगवंताचा क्रोध त्याच्यावर राहील’’ (जॉन ३:३६). आमच्या मरणानंतर आमच्या पापांसाठी पश्चात्ताप करण्याची संधी आम्हांला मिळणार नाही, कारण जेव्हा आम्ही भगवंताला समोरासमोर पाहू तेव्हा त्याच्यामध्ये विश्वास ठेवण्याशिवाय अन्य पर्याय आमच्याकडे असणार नाही. त्याला आता आम्ही श्रद्धा आणि प्रेमासह त्याच्याकडे आलेलो हवे आहे. जर आम्ही येशू ख्रिस्ताचे मरण हे भगवंताविरूद्ध आमच्या पापयुक्त बंडखोरीसाठी चुकते करण्याचे मोल आहे असे मान्य करतो तर आमच्यासाठी पृथ्वीवर अर्थपूर्ण जीवनच नव्हे तर येशूच्या उपस्थितीत चिरकाल जीवनाचीही हमी मिळेल.

जर तुमचा तारणहार म्हणून तुम्हाला येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायचा असेल, तर इथे प्रार्थनेचा नमुना आहे. लक्षात ठेवा, ही किंवा अन्य कोणती प्रार्थना म्हटल्याने तुमचे रक्षण होणार नाही, केवळ ख्रिस्तामध्ये श्रद्धा ठेवल्यानेच तुमचे पापांपासून रक्षण होणार आहे. ही प्रार्थना म्हणजे केवळ भगवंतामध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्याचा आणि तुम्हांला मोक्ष देण्याबद्दल त्याला धन्यवाद देण्याचा मार्ग आहे. ‘’भगवंता, मला माहित आहे मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे आणि शिक्षेस पात्र आहे. पण मला पात्र असलेली शिक्षा येशू ख्रिस्ताने भोगली, जेणेकरून त्याच्यावरील श्रद्धेतून मला क्षमा मिळावी. मी मोक्षाबद्दल तुझ्यामध्ये माझी श्रद्धा ठेवतो. तुझी विलक्षण कृपादृष्टी आणि क्षमाशीलता-चिरंतन जीवनाची देणगी यासाठी तुला धन्यवाद ! आमेन !’’

जे काही तुम्ही इथे वाचले आहे त्याचा तुम्ही ख्राईस्ट साठी निर्णय घेतला आहे का? जर तसे, असेल तर "मी आज ख्राईस्टला स्वीकारले आहे" हे बटण दाबा.भाषा ‘होम पेज’ कडे परत यामरणानंतर जीवन आहे काय?