settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती व्यक्तीच्या प्लॅस्टिक / सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया करण्याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

उत्तरः


प्लॅस्टिक अर्थात कृत्रिम शस्त्रक्रिया किंवा सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया असलेल्या ख्रिस्ती व्यक्तीला पवित्र शास्त्र विशेषतः संबोधित करत नाही. पवित्र शास्त्रामध्ये असे काहीच नाही, ज्यातून संकेत मिळतील कि प्लॅस्टिक अर्थात कृत्रिम शस्त्रक्रिया स्वतःच चुकीची आहे. तथापि, या प्रक्रियातून जायचे आहे की नाही हे ठरवण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. एखाद्याचे शरीर बदलणे अनैसर्गिक आहे, आणि शारीरिक आणि मानसिक दोन्ही संभाव्य दुष्परिणामांचे नेहमीच धोके असतात. शस्त्रक्रियेशी निगडित सर्व पर्याय, जोखीम आणि दुष्परिणामांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय कोणीही स्वतःला “वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी” राहू देऊ नये. शस्त्रक्रिया करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला त्यासाठी त्याच्या प्रेरणा पूर्णपणे ओळखणे आवश्यक आहे. शारीरिक विकृती असलेल्या अनेक लोकांसाठी-आनुवंशिक असो किंवा अधिग्रहित-समाजात योग्य असणे आणि “सामान्य” वाटणे स्वाभाविक आहे. किरकोळ विकृतीची प्रकरणे देखील आहेत कि ज्यामुळे कोणीतरी स्वतःबद्दल खूप अस्वस्थ वाटेल, जसे की खूप मोठे किंवा कुरूप नाक. परंतु अनेक, जर जास्त नसल्यास, प्लॅस्टिक शस्त्रक्रिया हा शारीरिक मार्गांनी भावनिक पोकळी भरण्याचा, लक्ष वेधण्याचा किंवा इतरांकडून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न आहे.

सर्वात सामान्यपणे केल्या जाणाऱ्या सौंदर्यवर्धक प्रक्रियेमध्ये स्तनाची वाढ/लिफ्ट, लिपोसक्शन (शरीरातील चरबी काढून टाकणे), फेसलिफ्ट, पापणी उचलणे, नितंब आणि शरीराच्या इतर लिफ्ट्स, लेग व्हेन ट्रीटमेंट्स, बोटॉक्स/फॅट इंजेक्शन्स आणि नाक आणि चेहऱ्याचे आकार बदलणे यांचा समावेश आहे. दरवर्षी सुमारे दोन दशलक्ष लोक अशा प्रक्रियांना बळी पडतात, पैसे खर्च करतात आणि वेळ आणि आराम यांचा त्याग करतात. जेव्हा फुशारकी एखाद्या व्यक्तीला शस्त्रक्रिया करण्यास प्रेरित करते, तेव्हा तो/ती स्वतःचा आदर्श बनतो/बनते. पवित्र शास्त्र आपल्याला सावध करते की आपण व्यर्थ किंवा अहंकारी होऊ नये (फिलि. 2:3-4) आणि आपण ज्या पद्धतीने पाहतो त्याकडे लक्ष देऊ नये (1 तीमथ्य 2:9). दुसरी चिंता किंमत असेल. हा एक मोठा विचार आहे कारण बहुतेक लोकांची कुटुंबे असतात आणि प्लॅस्टिक शस्त्रक्रियाचा खर्च कुटुंबाच्या गरजांपुढे कधीही येऊ नये. पवित्र शास्त्र आपल्याला हे देखील सांगते की देवाने आपल्यावर सोपवलेल्या संपत्तीचा सुज्ञपणे वापर करणे आवश्यक आहे (नीतिसूत्रे 11:24-25; लूक 16:10-12).

प्लॅस्टिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या समस्येबद्दल देवाचा सल्ला घेणे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की देव आपल्या प्रत्येक चिंता आणि काळजीची काळजी घेतो, म्हणून आपण आपल्या समस्या त्याच्याकडे नेल्या पाहिजेत (1 पेत्र 5:7). पवित्र आत्मा आणि देवाच्या वचनाचे ज्ञान आणि मार्गदर्शनाद्वारे, आपल्याकडे असे निर्णय घेण्याची क्षमता आहे जे त्याला संतुष्ट आणि सन्मानित करतील. “सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणार्‍या स्त्रीची प्रशंसा होते.” (नीतिसूत्रे 31:30). अगदी सर्वात कुशल सर्जनसुद्धा काळाचा हात रोखू शकत नाही, आणि सर्व सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियांचे शेवटी एकसारखे परिणाम मिळतील—वृद्धत्व. शरीराचे ते उंचावलेले अवयव पुन्हा डगमगतील आणि सौंदर्यप्रसाधने बदललेल्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये अखेरीस सुरकुत्या होतील. आतील व्यक्तीला सुशोभित करण्यासाठी काम करणे अधिक चांगले आहे, “तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंत:करणातील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी.” (1 पेत्र 3:4).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती व्यक्तीच्या प्लॅस्टिक / सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया करण्याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries