settings icon
share icon
प्रश्नः

अन्य भाषेत प्रार्थना करणे म्हणजे काय? अन्य भाषेत प्रार्थना करणे विश्वासणारा आणि परमेश्वर यांच्यातील प्रार्थना भाषा आहे काय?अन्य भाषेत प्रार्थना करणे स्वतःच्या उन्नतीसाठी आहे का?

उत्तरः


पाश्र्वभूमी म्हणून, कृपया अन्य भाषेत बोलण्याच्या कृपादानावरील आमचा लेख वाचा. अन्य भाषेत प्रार्थना करण्याचे पुरावे म्हणून उद्धृत केलेले चार मुख्य परिच्छेद आहेत: रोम 8:26; ं1 करिंथ 14:4-17; इफिस 6:18; आणि यहुदा वचन 20;. इफिस 6:18 आणि यहूदा 20 मध्ये “आत्म्याने प्रार्थना” करण्याचा उल्लेख आहे. तथापि, प्रार्थनेची भाषा म्हणून अन्य भाषा “आत्म्याने प्रार्थना करण्याचा” संभाव्य अर्थ नाही.

रोम 8:26 आपल्याला शिकवते, “तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतोय कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाहीय पण आत्मा स्वतरू अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो.” दोन मुख्य मुद्द्यांवरून हे संभवत नाही की रोम. 8:26 अन्यान्य भाषेचा उल्लेख प्रार्थना भाषा म्हणून करतो. सर्वप्रथम, रोम. 8:26 मध्ये असे म्हटले आहे की ”कण्हणारा“ आत्मा आहे, विश्वासणारा नाही. दुसरे म्हणजे, रोम. 8:26 मध्ये असे म्हटले आहे की आत्म्याचे “कण्हणे” ”अनिर्वाच्य“ आहे. अन्य भाषेत बोलण्याचे सार म्हणजे शब्द उच्चारणे.

यावरून आपल्याला 1 करिंथ. 14:4-17 ची आणि विशेषेकरून वचन 14: ”कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही.“ 1 करिंथ. 14:14 मध्ये “अन्य भाषेत प्रार्थना” करण्याचा स्पष्ट उल्लेख करते. याचा अर्थ काय? प्रथम, संदर्भाचा अभ्यास करणे खूपच महत्वाचे आहे. प्रथम करिंथ. अध्याय 14 हा मुख्यतः अन्य भाषेत बोलण्याची आणि भविष्यवाणीच्या कृपादानाची तुलना आहे. वचन 2-5 हे स्पष्ट करते की पौल भविष्यवाणीस अन्य भाषेच्या कृपादानापेक्षा श्रेष्ठ कृपादान मानतो. त्याचवेळी, पौल अन्यान्य भाषेचे मूल्य सांगतो आणि घोषित करतो की तो इतरांपेक्षा अधिक भाषांमध्ये बोलतो याबद्दल त्याला आनंद वाटतो (वचन 18).

प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 मध्ये अन्य भाषा बोलण्याच्या पहिल्या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे. पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रेषित निरनिराळ्या भाषा बोलू लागले. प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 हे स्पष्ट करते की प्रेषित मानवी भाषेत बोलत होते (प्रेषितांची कृत्ये 2:6-8). प्रेषित अध्याय 2 आणि 1 करिंथकरांच्या 14 व्या अध्यायात ”भाषा“ म्हणून अनुवादित केलेला शब्द ग्लोसा आहे ज्याचा अर्थ “भाषा” आहे. हा शब्द आहे ज्यामधून आपल्याला आपला इंग्रजी शब्द ग्लाॅसरी म्हणजे ”शब्दकोष“ प्राप्त होते. अन्य भाषेत बोलणे अशा भाषेत बोलण्याची योग्यता होती जी बोलणाऱ्यास माहित नाही, यासाठी की अशा व्यक्तीला सुवार्ता सांगता यावी जो ती भाषा बोलतो. करिंथच्या बहुसांस्कृतिक क्षेत्रात असे दिसते की अन्य भाषेचे कृपादान विशेषतः मौल्यवान आणि प्रमुख होते. करिंथ येथील विश्वासणारे अन्य भाषेच्या कृपादानाचा परिणाम म्हणून सुवार्ता आणि देवाचे वचन अधिक चांगल्याप्रकारे प्रचार करू शकत होते. तथापि, पौलाने अत्यंत स्पष्टपणे स्पष्ट केले की अन्य भाषा वापरत असतांनाही, त्याचा अर्थ लावायचा किंवा “भाषांतरित” (1 करिंथ. 14:13, 27) करणे आवश्यक होते. करिंथचा विश्वासणारा अन्य भाषा बोलत असे, ती भाषा बोलणाऱ्या एखाद्याला देवाची सत्यता घोषणा करीत असे, आणि मग तो विश्वासणारा किंवा चर्चमधील दुसरा विश्वासणारा जे काही बोलले गेले होते त्याच्या अर्थ सांगत असे यासाठी की संपूर्ण सभा काय बोलली हे समजू शकेल.

तर मग, अन्य भाषेत प्रार्थना करणे म्हणजे काय, आणि अन्य भाषेत बोलण्यापेक्षा हे कसे वेगळे आहे? प्रथम करिंथ. 14:13-17 असे सूचित करते की अन्य भाषेत प्रार्थना करण्याचा अर्थ देखील काढला जाणे आवश्यक आहे. याचा परिणाम म्हणजे, असे वाटते की अन्य भाषेत प्रार्थना करणे म्हणजे देवाला प्रार्थना अर्पण करणे होते. ही प्रार्थना ती भाषा बोलणाऱ्यास सेवा प्रदान करीत असे, परंतु त्याचा अर्थ लावण्याची देखील गरज असे जेणेकरून संपूर्ण मंडळीची प्रगती व्हावी.

हे भाषांतर अन्य भाषेत प्रार्थना करण्यास प्रार्थना भाषेच्या दृष्टीने पाहतात त्यांच्याशी सहमत नाही. या वैकल्पिक आकलनाचा सारांश खालीलप्रमाणे असू शकतो: अन्य भाषेत प्रार्थना करणे ही विश्वासणारा आणि देव यांच्यातील वैयक्तिक प्रार्थना भाषा आहे (1 करिंथ. 13:1) जिचा उपयोग विश्वासणारा स्वतःची उन्नती करण्यासाठी वापरतो (1 करिंथ. 14:4). हे स्पष्टीकरण पुढील कारणांमुळे बायबलविपरीत आहे: 1) अर्थ सांगायचा असल्यास अन्य भाषेत प्रार्थना करणे खासगी प्रार्थना भाषा कशी असू शकते (1 करिंथ. 14:13-17)? 2) जेव्हा पवित्र शास्त्र म्हणते की आत्मिक कृपादाने स्वतःसाठी नव्हेत तर मंडळीच्या उन्नतीसाठी आहेत तर (1 करिंथ. 12:7) अन्य भाषेत प्रार्थना करणे स्वतःच्या उन्नतीसाठी कसे असू शकते? 3) जर अन्य भाषा “विश्वास न करणार्यांसाठी चिन्ह” असेल तर अन्य भाषेत प्रार्थना करणे ही खासगी प्रार्थना भाषा कशी असू शकते (1 करिंथ. 14:22)? 4) बायबलमध्ये हे स्पष्ट केले आहे की प्रत्येकाला अन्य भाषांचे कृपादान लाभलेले नाही (1 करिंथ. 12:11, 28-30). जर प्रत्येक व्यक्तीस ते लाभत नसेल तर भाषा ती स्वतःच्या उन्नतीचे कृपादान कसे ठरू शकते? आपल्या सर्वांना उन्नतीची अथवा प्रगतीची गरज नाही का?

काही लोक असे समजता की अन्य भाषेत प्रार्थना करणे ही ”गुप्त सांकेतिक भाषा“ आहे जी सैतानास आमच्या प्रार्थनांचा अर्थ समजू देण्यापासून आणि त्याद्वारे आमचा फायदा घेण्यापासून सैतान व त्याच्या दुरात्म्यास थांबविते. ही व्याख्या खालील कारणामुळे बायबल विपरीत आहे: 1) नवा करार सतत अन्यान्य भाषेचे वर्णन मानवी भाषा म्हणून करतो, आणि सैतानास व त्याच्या दुरात्म्यांस मानवी भाषा चांगल्याप्रकारे समजून येते. 2) बायबलमध्ये अगणित विश्वासणार्यांची उदाहरणे आहेत, जे स्वतःच्या भाषेत प्रार्थना करीत, मोठ्याने, सैतान त्यांच्या प्रार्थनेत हस्तक्षेप करील याची त्यांस तमा नव्हती. सैतान आणि/किंवा आम्ही करीत असलेली प्रार्थना ऐकत असले आणि समजत असले तरीही, त्यांना परमेश्वराच्या इच्छेनुसार आमच्या प्रार्थनांची उत्तरे देण्यापासून परमेश्वराच्या मार्गात अडखळण आणण्याचे सामथ्र्य मुळीच नाही. आम्हाला माहीत आहे की परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकतो, आणि हे तथ्य या गोष्टीस अप्रासंगीक करते की सैतान आणि त्याचे दुरात्मे आमच्या प्रार्थना ऐकतात आणि समजतात.

मग आपण त्या अनेक ख्रिस्ती लोकांविषयी काय म्हणावे ज्यांनी अन्य भाषेत प्रार्थना करण्याचा अनुभव केला आणि त्यांस ते व्यक्तिगतरित्या उन्नतीप्रद असल्याचे आढळून आले? सर्वप्रथम, आम्ही आपला विश्वास आणि वागणे पवित्र शास्त्रावर आधारित कराव, अनुभवावर नव्हे. आम्ही आपले अनुभव पवित्र शास्त्राच्या प्रकाशात पाहावे, आमच्या अनुभवांच्या प्रकाशात पवित्र शास्त्राचा अर्थ लावता कामा नये. दुसरे, अनेक संप्रदाय व विश्वधर्म अन्य भाषा बोलण्याच्या/अन्य भाषेत प्रार्थना करण्याच्या घटनांविषयी सांगतात. स्पष्टपणे पवित्र आत्म्याने या विश्वास न करणाऱ्या लोकांस ही कृपादाने दिलेली नाही. तर, असे दिसते की भुते अन्य भाषेत बोलण्याच्या कृपादानांची नकल करण्यात सक्षम आहेत. यामुळे, आपल्याला आपल्या अनुभवांची तुलना शास्त्रवचनांसह अधिक काळजीपूर्वक केली पाहिजे. तिसरे, अभ्यासावरून दिसून आले आहे की अन्य भाषांमध्ये बोलणे/प्रार्थना करणे शिकता येते. ऐकण्याद्वारे आणि अन्य भाषांमध्ये बोलणाऱ्याचे निरीक्षण करून एखादी व्यक्ती अवचेतनपणे ही प्रक्रिया शिकू शकते. ख्रिस्ती लोकांमध्ये अन्य भाषांमध्ये बोलण्याच्या/प्रार्थना करण्याच्या बहुसंख्य घटनांसाठी बहुधा हे स्पष्टीकरण आहे. चैथे, “स्वतःची प्रगती” करण्याची भावना नैसर्गिक आहे. जेव्हा नवीन काहीतरी, रोमांचक, भावनिक आणि/किंवा तर्कसंगत विचारांपासून दूर असे काही अनुभव येतात तेव्हा मानवी शरीर एड्रेनेलीन आणि एंडोर्फिन हे रस तयार करते.

अन्य भाषांमध्ये प्रार्थना करणे हा एक असा विषय आहे ज्या बाबत ख्रिस्ती लोक आदरपूर्णरित्या आणि प्रेमळपणे असहमत होण्यास सहमत होऊ शकतात. इतर भाषांमध्ये प्रार्थना केल्याने तारण निश्चित होत नाही. अन्य भाषांमध्ये प्रार्थना करणे परिपक्व ख्रिस्ती व्यक्तीस अपरिपक्व ख्रिस्ती व्यक्तीपासून दूर करते. व्यक्तिगत प्रार्थना भाषा म्हणून अन्य भाषेत प्रार्थना करण्यासारखी एखादी गोष्ट आहे किंवा नाही ख्रिस्ती विश्वासास मूलभूत नाही. म्हणून, बायबलमधील अन्य भाषेत प्रार्थना करण्याचा अर्थ सांगणे व्यक्तिगत प्रगतीसाठी खासगी प्रार्थना भाषा या कल्पनेपासून दूर नेतो, परंतु आपण हे देखील ओळखतो की असे वागणारे बरेच लोक ख्रिस्तामध्ये आपले भाऊ व बहीण आहेत आणि ते आपल्या प्रेमास आणि आदरास पात्र आहेत.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

अन्य भाषेत प्रार्थना करणे म्हणजे काय? अन्य भाषेत प्रार्थना करणे विश्वासणारा आणि परमेश्वर यांच्यातील प्रार्थना भाषा आहे काय?अन्य भाषेत प्रार्थना करणे स्वतःच्या उन्नतीसाठी आहे का?
© Copyright Got Questions Ministries