माझ्यासाठी योग्य धर्म म्हणजे काय?प्रश्नः माझ्यासाठी योग्य धर्म म्हणजे काय?

उत्तरः
फास्ट फूडची उपहारगृहे आम्हांला हव्या त्याच पद्धतीने खाद्य मागविण्याची मुभा देऊन आम्हांला लोभवितात. काही कॉपी शॉप कॉफीचे शंभरांहून जास्त प्रकार आणि स्वाद देण्याचे फुशारकीने सांगतात. घर आणि कार खरेदी करतो तेव्हासुद्धा आम्ही आम्हांला हवे ते सर्व पर्याय आणि वैशिष्ट्ये शोधत असतो. आम्ही अजूनही केवळ चॉकलेट, व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरीच्या जमान्यात राहात नाही. निवड राजा आहे. तुमच्या वैयक्तीक आवडी आणि गरजांप्रमाणे तुम्ही काहीही शोधू शकता.

मग, तुमच्यासाठी योग्य धर्माविषयी काय? एक अपराधरहित, मागणीरहित आणि करा व करू नकाच्या त्रासदायक बोजारहित धर्माविषयी काय? मी आताच वर्णन केले तसा तो तेथे आहे. पण धर्म ही आईसक्रीमचा स्वाद निवडण्यासारखी बाब आहे का? आमचे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा करणारे कित्येक आवाज आहेत. मग, कोणी येशू ख्रिस्ताला महंमद किंवा कॉनफुशियस, बुद्ध, किंवा चार्ल्स ताझे रसेल, किंवा जोसेफ स्मिथ यांच्यापेक्षा वर का मानावे? शेवटी सर्वच मार्ग स्वर्गाकडे जात नाहीत का? सर्व धर्म मुळात सारखे नाहीत का? सत्य असे आहे, की ज्याप्रमाणे सर्व रस्ते इंडियानाकडे जात नाहीत, तसेच सर्वच धर्म स्वर्गाकडे नेत नाहीत.

केवळ येशूच भगवंताच्या अधिकाराने बोलतो, कारण केवळ येशूनेच मरणावर विजय मिळविला आहे. महंमद, कॉनफुशियस, किंवा इतर सारे आजच्या दिवसाला त्यांच्या कबरींत दफन आहेत. पण येशू, त्याच्या स्वतःच्या सामर्थ्यावर, एका क्रूर रोमन क्रूसावरील मरणाच्या तीन दिवसांनंतर थडग्यापासून दूर गेला. मरणावरील सामर्थ्याचा असा कोणीही आमचे लक्ष वेधण्यास पात्र आहे. मरणावरील सामर्थ्याचा असा कोणीही ऐकण्यास पात्र आहे.

येशूच्या पुनरुत्थानास समर्थन देणारा पुरावा खूप मोठा आहे. प्रथम, येशूचा पुन्हा उदय पाहणारे पाचशेहून जास्त प्रत्यक्षदर्शी तिथे होते ! ही संख्या खूपच आहे. पाचशे आवाजांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तिथे रिकाम्या थडग्याचा मुद्दाही आहे. येशूचे शत्रू त्याचे मस्तक, कुजके शरीर दाखवून त्याच्या पुनरुत्थानाची सर्व चर्चा थांबवू शकले असते, पण दाखविण्यास त्यांच्यासाठी तिथे शरीरच नव्हते ! थडगे रिकामेच होते ! शिष्यांनी शरीर चोरून नेले का? शक्यता कमीच आहे. अशा आकस्मिक संभावना रोखण्यासाठी येशूच्या थडग्याभोवती सशस्त्र पहारा तैनात होता. त्याची अटक आणि क्रूसावर ठोकणे पाहून भयाने पळून गेलेले अगदी जवळचे अनुयायी पाहता त्या घाबरलेल्या हीन कोळ्यांची टोळी प्रशिक्षित आणि व्यावसायिक सैनिकांना भिडली असणे चूकीचेच ठरेल. त्यांच्यापैकी कोणीही आपल्या जीवनाचा बळी देऊन हुतात्मे बनले नसते – जसे त्यांच्यापैकी बहुतेकांनी केले – लबाडीसाठी. वास्तविक साधी गोष्ट आहे, की येशूच्या पुनरुत्थानाचे वर्णन करता येत नाही !

पुन्हा, मरणावरील सामर्थ्याचा असा कोणीही ऐकण्यास पात्र आहे. येशूने मरणावरील त्याचे सामर्थ्य सिद्ध केले; त्यामुळे तो काय सांगतो ते आम्ही ऐकले पाहिजे. येशू स्वतः मोक्षाचा एकमात्र मार्ग असल्याचा दावा करतो (जॉन १४:६). तो मार्ग नाही; तो अनेक मार्गांपैकी एकही नाही. येशू हा मार्ग आहे.

आणि हा तोच येशू सांगतो, ‘‘मेहनत करणारे आणि जड ओझ्याने दबलेले तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, आणि मी तुम्हांला विश्रांती देतो’’ (मॅथ्यू ११:२८). हे जग कणखर आहे आणि जीवन खूप अवघड आहे. आमच्यापैकी बहुतेक खूपच रक्ताळलेले, जखमी आणि युद्धभिरू आहोत. मान्य करता ना? मग तुम्हांला काय पाहिजे? पुनरुज्जीवन की केवळ धर्म? एक जिवंत तारणहार की अनेक मृत ‘‘प्रेषित’’ यांपैकी एक? एक अर्थपूर्ण नाते की रिकामे विधी? येशू पसंती नाही – तो पसंती आहे !

तुम्ही क्षमेसाठी शोध घेत असाल तर येशू हा योग्य ‘‘धर्म’’ आहे (एक्ट्स १०:४३). जर तुम्ही भगवंताशी अर्थपूर्ण नात्यासाठी शोध घेत असाल तर येशू हा योग्य ‘‘धर्म’’ आहे (जॉन १०:१०). तुम्ही स्वर्गात चिरंतन निवारा शोधत असाल तर येशू हा योग्य ‘‘धर्म’’ आहे (जॉन ३:१६). तुमचा तारणहार म्हणून येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवा; त्यासाठी तुम्हांवर पश्चात्तापाची वेळ येणार नाही ! तुमच्या पापांच्या क्षमेसाठी त्याच्यामध्ये विश्वास ठेवा; तुमचा अपेक्षाभंग होणार नाही.

जर भगवंताशी ‘‘योग्य नाते’’ राखण्याची तुमची इच्छा असेल तर इथे एक प्रार्थनेचा नमुना आहे. लक्षात ठेवा, ही किंवा अन्य कोणती प्रार्थना म्हटल्याने तुमचे रक्षण होणार नाही. येशूमध्ये श्रद्धा ठेवल्यानेच पापांपासून तुमचे रक्षण होईल. ही प्रार्थना म्हणजे केवळ भगवंतामध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्याचा आणि तुम्हांला मोक्ष देण्याबद्दल त्याला धन्यवाद देण्याचा मार्ग आहे. ‘’भगवंता, मला माहित आहे मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे आणि शिक्षेस पात्र आहे. पण मला पात्र असलेली शिक्षा येशू ख्रिस्ताने भोगली, जेणेकरून त्याच्यावरील श्रद्धेतून मला क्षमा मिळावी. मी मोक्षाबद्दल तुझ्यामध्ये माझी श्रद्धा ठेवतो. तुझी विलक्षण कृपादृष्टी आणि क्षमाशीलता-चिरंतन जीवनाची देणगी यासाठी तुला धन्यवाद ! आमेन !’’

जे काही तुम्ही इथे वाचले आहे त्याचा तुम्ही ख्राईस्ट साठी निर्णय घेतला आहे का? जर तसे, असेल तर "मी आज ख्राईस्टला स्वीकारले आहे" हे बटण दाबा.भाषा ‘होम पेज’ कडे परत यामाझ्यासाठी योग्य धर्म म्हणजे काय?