पाप्याची प्रार्थना म्हणजे काय?प्रश्नः पाप्याची प्रार्थना म्हणजे काय?

उत्तरः
पाप्याची प्रार्थना म्हणजे प्रार्थना जी माणूस भगवंतासाठी म्हणतो, जेव्हा त्याला समजते की तो पापी आहे आणि त्याला तारणहारची आवश्यकता आहे. पाप्याची प्रार्थना म्हटल्याने काही साध्य होणार नाही. पाप्याची प्रार्थना तेव्हाच परिणामक होऊ शकते जेव्हा माणूस त्याच्या पापीपणाबद्दल जे काही जाणतो, समजतो, आणि त्यावर विश्वास ठेवतो आणि मोक्षाची आवश्यकता जाणतो याच्या सत्यतेचे प्रतिनिधित्व तिच्यात होईल.

पाप्याच्या प्रार्थनेची पहिली बाजू म्हणजे आम्ही सर्वजण पापी आहोत हे समजणे. रोमन्स ३:१० जाहीर करते की, ‘‘ज्याप्रमाणे लिहिले आहे, कोणीच सदाचरणी नाही, नाही, एकही नाही.’’ बायबल हे स्पष्ट करते की आम्ही सर्वांनीच पाप केले आहे. आम्ही सर्वजण पापी आहोत ज्यांना भगवंताच्या दयेची आणि क्षमाशीलतेची आवश्यकता आहे (टायटस ३:५-७). आमच्या पापामुळे, आम्ही चिरंतन शिक्षेस पात्र आहोत (मॅथ्यू २५:४६). पाप्याची प्रार्थना ही निवाड्याऐवजी कृपेसाठी याचना आहे. ती क्रोधाऐवजी दयेसाठी विनंती आहे.

पाप्याच्या प्रार्थनेची दूसरी बाजू म्हणजे आमच्या हरवलेल्या आणि पापयुक्त स्थितीच्या इलाजासाठी भगवंताने काय केले आहे ते समजून घेणे. भगवंताने शरीर धारण करून येशू ख्रिस्ताच्या रूपात मानवी जीवन अंगिकारले (जॉन १:१,१४). येशूने आम्हांला भगवंताच्या सत्याची शिकवण दिली आणि स्वतः सदाचरणी आणि पापरहित जीवन जगला (जॉन ८:४६; २ कोरिन्थियन्स ५:२१). येशूने त्यानंतर आम्हांला पात्र असलेली शिक्षा भोगतांना आमच्याजागी क्रूसावर मरण पत्करले (रोमन्स ५:८). पाप, मृत्यू आणि नरकावर त्याचा विजय सिद्ध करण्यासाठी येशू मरणातून वर आला (कोलोसियन्स २:१५; १ कोरिन्थियन्स पाठ १५). ह्या सर्वांमुळे आम्हांला पापांसाठी क्षमा आणि स्वर्गात चिरंतन निवासाचे वचन मिळू शकते – जर का आम्ही येशू ख्रिस्तामध्ये आमची श्रद्धा ठेवली तर. आम्हांला एवढेच करायचे आहे की त्याने आमच्याजागी मरण पत्करले आणि मरणातून पुन्हा वर आला असा विश्वास ठेवायचा (रोमन्स १०:९-१०). केवळ कृपेमुळेच आम्ही वाचू शकतो, केवळ श्रद्धेद्वारे, केवळ येशू ख्रिस्तामध्ये. एफिसियन्स २:८ जाहीर करते, ‘’श्रद्धेमुळे-कृपादृष्टीने तुम्ही वाचला आहात, आणि हे तुम्हांमुळे नाही, ही भगवंताची देणगी आहे.’’

पाप्याची प्रार्थना म्हणणे म्हणजे भगवंताला केवळ सांगणे आहे की तुम्ही येशू ख्रिस्तावर तुमचा तारणहार म्हणून भरवसा ठेवीत आहात. कोणतेही ‘‘जादूमय’’ शब्द नाहीत ज्याच्यामुळे मोक्ष मिळेल. येशूचे मरण आणि पुनरुत्थान केवळ यांमधील श्रद्धाच आम्हांला वाचवू शकते. जर तुम्ही समजता की तुम्ही पापी आहात आणि तुम्हाला येशू ख्रिस्ताद्वारे मोक्षाची आवश्यकता आहे, तर इथे पाप्याची प्रार्थना आहे जी तुम्ही भगवंतापाशी म्हणू शकताः ‘‘देवा, मला माहित आहे की मी पापी आहे. मला माहित आहे की मी माझ्या पापासाठी शिक्षेस पात्र आहे. परंतु, मी येशू ख्रिस्तामध्ये माझा तारणहार म्हणून श्रद्धा ठेवतो. मी विश्वास ठेवतो की त्याचे मरण आणि पुनरुत्थान यामुळे मला क्षमा मिळाली. माझा वैयक्तिक प्रभू आणि तारणहार म्हणून मी केवळ आणि केवळ येशूमध्येच श्रद्धा ठेवतो. माझे रक्षण करण्यासाठी आणि मला क्षमा करण्यासाठी हे प्रभू तुला धन्यवाद ! आमेन !’’

जे काही तुम्ही इथे वाचले आहे त्याचा तुम्ही ख्राईस्ट साठी निर्णय घेतला आहे का? जर तसे, असेल तर "मी आज ख्राईस्टला स्वीकारले आहे" हे बटण दाबा.भाषा ‘होम पेज’ कडे परत यापाप्याची प्रार्थना म्हणजे काय?